चांदी खरेदी करताय? ज्वेलर्सला विचारा हे प्रश्न, कधीच होणार नाही फसवणूक!

चांदीच्या किमतीत अचानक मोठ्या प्रमाणात घसरल्या आहेत. परिणामी चांदीची खरेदी पुन्हा एकदा वाढण्याची अपेक्षा आहे. तुम्हीही चांदीचे दागिने किंवा वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर त्यावेळी या 5 महत्वाच्या टिप्स लक्षात ठेऊनच चांदीचे दागिने व वस्तू खरेदी करा.

चांदी खरेदी करताय? ज्वेलर्सला विचारा हे प्रश्न, कधीच होणार नाही फसवणूक!
sliver
| Edited By: | Updated on: Feb 02, 2026 | 8:07 PM

सोन्याचे भाव गगनाला भिडले आहे. प्रति तोळ सोनं हे लाखोच्या घरात पोहोचले आहे. तर सोन्याच्या भावात जास्त वाढ झाल्याने साहजिकच अनेकजण हे चांदीचे दागिने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढत आहे. त्यात काही दिवसांपूर्वी चांदीच्या किमतीतही मोठी वाढ झाली होती. सध्या चांदीच्या किमती पुन्हा एकदा घसरल्या आहेत आणि लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने खरेदी पुन्हा वाढू शकते. तर चांदीचे दागिने खरेदी करताना काही खबरदारी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्ही जर चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि त्यात तुमची फसवणूक होऊ नये असं वाटत असेल तर या 5 टिप्स लक्षात ठेवा. चला तर मग आजच्या लेखात आपण या टिप्सबद्दल जाणून घेऊयात.

भारतीय घरांमध्ये सोन्या-चांदीचे दागिने खास प्रसंगी, विशेषतः लग्न समारंभात परिधान केले जातात. तर या लग्नाच्या हंगामात ग्राहकांसाठी चांदीच्या किमतीत झालेली घसरण ही एक स्वागतार्ह दिलासा आहे, परंतु खरेदी करताना नुकसान टाळण्यासाठी काही लहान गोष्टी लक्षात ठेवा.

हॉलमार्क तपासणी आवश्य करा

सोने खरेदी करताना अनेकजण त्याच्या शुद्धतेकडे खूप लक्ष देतात. यासाठी कॅरेटपासून ते हॉलमार्कपर्यंत सर्व काही तपासले जाते. त्याचप्रमाणे चांदी खरेदी करताना, तुम्ही नेहमी BIS हॉलमार्क पहावा. हे चांदीच्या शुद्धतेची हमी देते. जरी हे बहुतेकदा पर्यायी असले तरी हॉलमार्क असलेली चांदी खरेदी करावी.

संख्यांकडे लक्ष द्या

दागिने खरेदी करताना अनेकदा आपण किंमत, डिझाइन आणि वजन यावर लक्ष केंद्रित करत असतो. त्याचबरोबर तुम्ही संख्या किंवा ग्रेडकडे देखील लक्ष दिले पाहिजे. 9999 आणि 9995 हे चांदीचे ग्रेड नाणं, भांडी वा वस्तू खरेदी करण्यासाठी सर्वोच्च दर्जाचे मानले जातात. तर 990 आणि 925 हे चांदीचे ग्रेड दागिन्यांसाठी आदर्श आहेत. खरं तर 925 ग्रेड चांदीची किंमत साधारणपणे 92.5% स्टर्लिंग चांदीइतकीच असते.

मेकिंग चार्जेस समजून घ्या

सोने असो वा चांदी तुम्ही जर दागिने बनवायला देत असाल तर वेगळा मेकिंग चार्ज लागू होतो. जास्त पैसे गमावू नयेत म्हणून चांदीचे दागिने खरेदी करण्यापूर्वी मेकिंग चार्जची चौकशी करणे महत्वाचे आहे. तसेच तुम्ही इतर अनेक ठिकाणी मेकिंग चार्जेसबद्दल विचारपूस करा जेणेकरून तुम्हाला एक अचूक अंदाज येईल.

जर्मन चांदीमधला फरक ओळखा

आजकाल अनेकजण हे जर्मन चांदीकडे अधिकाधिक वळत आहेत. पण लक्षात ठेवा की जर्मन चांदी ही खरी चांदी नाही. जर्मन चांदी ही एक चांदीचा प्रकार आहे, परंतु ती स्टर्लिंग चांदी किंवा नियमित चांदीच्या श्रेणीत येत नाही. स्टर्लिंग चांदी शुद्ध चांदी इतर मिश्रधातूंमध्ये मिसळून तयार केली जाते. जर्मन चांदी कधीकधी पितळ किंवा तांबे सारख्या धातूंसाठी वापरली जाते ज्यांना चांदीने पॉलिश केले जाते.

योग्य बिल घेण्यास विसरू नका

ज्वेलर्स अनेकदा ग्राहकांना सांगतात की कच्चे बिलामुळे किंमत कमी होईल आणि यामुळे आपल्यापैकी जण पक्का बिल घेण्यापासून दूर राहतात. तथापि, तुम्ही असे करू नये. सोने असो वा चांदी मौल्यवान दागिने किंवा इतर कोणतीही वस्तू खरेदी करताना पक्के बिल असणे आवश्यक आहे. यामुळे भविष्यात वस्तू विकताना किंवा एक्सचेंज करताना कोणतेही अडथळे येणार नाही.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)