AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नोकरीसाठी मुलाखतीला जात आहात? मग करा वास्तुशास्त्रात सांगितलेला हा सोपा उपाय, यश तुमचंच

अनेकांना असं वाटतं की वास्तुशास्त्र हे केवळ घराशी संबंधित आहे, जसं की घराची रचना कशी असावी? तुमच्या घरात असलेल्या विविध वस्तू ठेवण्यासाठी योग्य दिशा कोणती? याबद्दलच वास्तुशास्त्रात मार्गदर्शन करण्यात आलं आहे. मात्र तसं नाहीये, तर तुमच्या कष्टाला नशीबाची साथ मिळावी यासाठी देखील वास्तुशास्त्रात काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत.

नोकरीसाठी मुलाखतीला जात आहात? मग करा वास्तुशास्त्रात सांगितलेला हा सोपा उपाय, यश तुमचंच
job Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 04, 2026 | 9:04 PM
Share

या जगात मेहनतीशिवाय कोणतीही गोष्ट मिळत नाही. तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट प्राप्त करता किंवा एखाद्या क्षेत्रात यश मिळवता त्यामागे तुमची अनेक वर्षांची मेहनत असते, परिश्रम असतात. परंतु जर तुमच्या या कष्टाला नशीबाची साथ मिळाली तर हे यश तुम्हाला अधिक लवकर मिळू शकतं. अनेकदा आपण खूप कष्ट करतो. प्रचंड मेहनत करतो, परंतु आपल्याला काही यश मिळत नाही. त्यामागे तुमच्या घरात निर्माण झालेली नकारात्मक शक्ती देखील असू शकते. जेव्हा घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते, तेव्हा त्या ऊर्जेचा परिणाम हा तुमच्यावर होतो. यालाच आपण वास्तुदोष असं म्हणतो. जर घरात वास्तुदोष निर्माण झाला तर तुमच्या प्रगतीच्या मार्गात अडथळे येऊ शकतात. ते दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रात काही सोपे उपाय सांगितले आहेत. तुम्ही जेव्हा नोकरीसाठी मुलाखतीला जातात तेव्हा त्यामध्ये तुम्हाला यश मिळावं, तुम्हाला चांगली नोकरी मिळावी, यासाठी वास्तुशास्त्रात काही सोपे उपाय सांगितले आहेत, त्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

तुम्ही जेव्हा एखाद्या ठिकाणी नोकरीसाठी मुलाखतीला जाणार आहात, त्यावेळी तुम्ही वास्तुशास्त्रात सांगितलेले काही उपाय केल तर त्याचा तुम्हाला निश्चितच फायदा होऊ शकतो. तुम्ही ज्या दिवशी मुलाखतीला जाणार आहात, त्या दिवशी सकाळीच उठा, अंघोळ केल्यानंतर ईशान्य दिशेला बसून तुमच्या इष्ट देवतेचा जप करा. ईशान्य दिशा ही देवाची दिशा असते, त्यामुळे देवाचा जप करताना किंवा पूजा करताना नेहमी ईशान्य दिशेकडे तोंड करून बसावं, असं वास्तुशास्त्र सांगतं, तसेच पूजा झाल्यानंतर ईशान्य दिशेलाच एक दिवा लावा. मुलाखतीमध्ये यश मिळवण्यासाठी देवाकडे प्रार्थना करा, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

दुसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे जेव्हा तुम्ही मुलाखतीला जाणार असाल तेव्हा तुमच्या मनात कसलेही नकारात्मक विचार ठेवू नका. मनात पॉझिटिव्ह विचारच ठेवा. आपल्याला मुलाखतीमध्ये यश मिळणार आहे, असा आत्मविश्वास ठेवा. कारण तुमच्या मनातील विचारांचा तुमच्यावर प्रभाव पडत असतो. त्याचबरोबर तुम्ही जेव्हा मुलाखतीसाठी जात आहात, त्यावेळी खिशात तुळशीचे दोन ते तीन पान ठेवा, महत्त्वाच्या कामाला बाहेर जाताना नेहमी आपला उजवा पाय आधी बाहेर टाकावा. तसेच मुलाखतीसठी जाताना फार भडक रंगाचे कपडे घालू नका, त्याऐवजी थोडे लाईट रंगाचे कपडे घाला, त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण!
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा Video समोर
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिया सुळेंनी पक्षातील Inside Story सांगितलीच
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले...
थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
मोठी बातमी! थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?
आधी शिंदेंकडून मोठ्या गिफ्टच्या चर्चा आता थेट मुख्यंमंत्र्यासोबत... ओम
आधी शिंदेंकडून मोठ्या गिफ्टच्या चर्चा आता थेट मुख्यंमंत्र्यासोबत... ओमराजे CM भेटीत असं काय घडलं?