AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Price Today : चांदीला लकाकी, सोने वधारले: प्रमुख शहरातील भाव एका क्लिकवर

आज (सोमवारी) चांदीच्या भावात 300 रुपयांची वाढ दिसून आली. प्रति किलो चांदींचा भाव 62,000 रुपयांवर पोहोचला. काल (शुक्रवारी) चांदीचा भाव 61,700 रुपये प्रति किलो नोंदविला गेला होता.

Gold Price Today : चांदीला लकाकी, सोने वधारले: प्रमुख शहरातील भाव एका क्लिकवर
सोने
| Edited By: | Updated on: Jan 17, 2022 | 7:29 PM
Share

नवी दिल्ली- सोन्याच्या भावात (Gold price) आज (सोमवारी) किंचित तेजी दिसून आली. राजधानी दिल्ली मध्ये शुक्रवारी सोन्याच्या बाजार 100 रुपयांच्या वाढीसह बंद झाला. गेल्या आठवड्याच्या (शुक्रवार) तुलनेत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा भाव (Gold rate today) 100 रुपयांनी वधारला. ‘गुड रिटर्न’ वेबसाईटच्या वृत्तानुसार, 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा 47,090 रुपयांवर पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील मौल्यवान धातूंच्या किंमतीमधील (Gold price in Delhi) तेजीचा परिणाम देशांतर्गत बाजारावर दिसून येत आहे. सोन्यासोबत चांदीच्या भावातही तेजीचं चित्र दिसून आलं. आज (सोमवारी) चांदीच्या भावात 300 रुपयांची वाढ दिसून आली. प्रति किलो चांदींचा भाव 62,000 रुपयांवर पोहोचला. काल (शुक्रवारी) चांदीचा भाव 61,700 रुपये प्रति किलो नोंदविला गेला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भाव 1,826 डॉलर प्रति औंस आणि चांदीच्या भाव 23.19 डॉलर प्रति औंसवर स्थिर राहिला.

देशातील प्रमुख शहरातील सोने-चांदीच्या भावाविषयी माहिती देणाऱ्या ‘गूडरिटर्न्स डॉट कॉम’ वेबसाईटवर प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याच्या किंमती पुढीलप्रमाणे:

चेन्नईत सोन्याचे दर: ₹45,340 मुंबई सोन्याचे दर: ₹47,090 दिल्ली सोन्याचे दर: ₹47,140 कोलकाता सोन्याचे दर: ₹47,190 बंगळुरु सोन्याचे दर: ₹44,990 हैदराबाद सोन्याचे दर: ₹44,990 केरळ सोन्याचे दर: ₹44,990 पुणे सोन्याचे दर: ₹46,450

सोन्याचे भाव एका मिस्ड् कॉलवर:

तुम्ही घरबसल्या सोन्याचे भाव मिळवू शकतात. 8955664433 या क्रमांवर मिस्ड् कॉल देण्याद्वारे तुम्हाला मेसेज प्राप्त होतील. तुम्ही प्रमुख शहरातील सोन्याचे भाव तपासू शकतात.

सोन्याची शुद्धता ‘अ‍ॅप’ वर? केंद्रीय ग्राहक आणि अन्न मंत्रालयाने BIS-केअर मोबाईल अ‍ॅप लाँच केलं आहे. या अ‍ॅपद्वारे सोनं खरंच किती शुद्ध आहे, याबाबतची माहिती मिळणार आहे. त्यामुळे सोन्यात इतर धातूंच मिश्रण करुन लुबाडणाऱ्यांना चांगलाचा धडा मिळणार आहे. सोनं कितपत शुद्ध आहे, याची खरंच योग्य माहिती दिली तर या अ‍ॅपला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे (BIS care app will tell how pure is gold).

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.