KVP NSC Online Account | किसान विकास पत्रासह राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रात गुंतवणूक झाली सोपी, ही अपडेट माहिती आहे का?

KVP NSC Online Account | किसान विकास पत्रासह (KVP) राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रात (NSC) गुंतवणूक आता सोप्पी झाली आहे. कशी करता येईल या योजनांमध्ये गुंतववणूक, चला तर समजून घेऊयात.

KVP NSC Online Account | किसान विकास पत्रासह राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रात गुंतवणूक झाली सोपी, ही अपडेट माहिती आहे का?
आता ऑनलाईन बचतImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 21, 2022 | 2:41 PM

KVP NSC Online Account | किसान विकास पत्रासह (KVP) राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रात (NSC) गुंतवणूक आता सोप्पी झाली आहे. ‘आझादी का अमृत महोत्सवा’च्या निमित्ताने पोस्ट ऑफिसने स्मार्ट गुंतवणूकदारांसाठी ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. आता ग्राहकांना या योजनेत ऑनलाईन गुंतवणूक (Online Investment) करता येणार आहे. त्यांना टपाल कार्यालयात ऑनलाईन खाते उघडता येईल. इंटरनेट बँकिंगच्या (Internet Banking) माध्यमातून ग्राहकांना ही सुविधा मिळणार आहे. 18 ऑगस्ट रोजी याविषयीची अधिसूचना काढण्यात आली आहे. पोस्ट ऑफिसच्या इंटरनेट बँकिंगचा उपयोग घेणाऱ्या ग्राहकांना ही सुविधा मिळाली आहे. हे ग्राहक आता NSC आणि KVP योजनेची खाती ऑनलाइन उघडू आणि ती बंद करू शकतात. 5 वर्षे या अल्पबचत खात्यात गुंतवणूक करता येते.

किसान विकास पत्र

किसान विकास पत्र किंवा KVP ही पोस्ट ऑफिसमध्ये चालवली जाणारी अल्पकालीन बचत ठेव योजना आहे. या योजनेतंर्गत ग्राहकाला चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळतो. या योजनेवर 30 सप्टेंबरपर्यंत 6.9% व्याज मिळत आहे. या योजनेत ग्राहकाला खाते उघडल्यापासून पुढील 9 वर्षे आणि 5 महिने गुंतवणूक करता येते.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र(NSC) हे टपाल कार्यालयातून जारी करण्यात आलेले बचत रोखे आहेत. ही देखील पोस्ट ऑफिसची बचत योजना आहे. सध्या NSC वर 6.8% व्याज दिले जात आहे. या योजनेत चक्रवाढ व्याज मिळते. खाते उघडल्यानंतर पुढील 5 वर्षांत खाते परिपक्व होते.

हे सुद्धा वाचा

या गोष्टी लक्षात ठेवा

1 जुलै 2015 नंतर NSC किंवा KVP घेतल्यासच ऑनलाइन सेवेचा लाभ घेता येईल. 1 जुलै 2016 पूर्वी NSC आणि KVP बचत प्रमाणपत्र नियमांप्रमाणे बंद होतील. पोस्ट ऑफिस इंटरनेट बँकिंग खात्याच्या आधारे NSC खाते उघडले जाऊ शकते. इंटरनेट बँकिग आधारे पोस्ट खात्यात बचत खाते ज्या नावे असेल तेच नाव या योजनांच्या खात्याला असेल.

पोस्ट ऑफिसमध्ये KVP, NSC खाते असे ऑनलाइन सुरु करा

पोस्ट ऑफिस इंटरनेट बँकिंगमध्ये लॉग इन करा

‘जनरल सर्व्हिसेस’ वर जा. नंतर ‘सर्व्हिस रिक्वेस्ट’ वर जा आणि शेवटी ‘नवीन विनंती’ वर जा

NSC खाते उघडण्यासाठी, ‘NSC’ खात्यावर क्लिक करा. KVP खाते उघडण्यासाठी, ‘KVP खाते’ वर क्लिक करा

NSC खाते उघडण्यासाठी असलेली रक्कम जमा करा. योजनेतंर्गत, किमान 1000 अथवा 100 रुपयांच्या पटीत रक्कम जमा करा

पोस्ट ऑफिस बचत खात्याशी लिंक केलेले डेबिट खाते निवडा

अटी व शर्तीं वाचून क्लिक करा आणि स्वीकारा

ऑनलाइन खाते बंद करा

ट्रान्झॅक्शन पासवर्ड टाका आणि सबमिट बटण दाबा

दोन्ही खाते ऑनलाइन कसे बंद करावे

पोस्ट ऑफिस इंटरनेट बँकिंगमध्ये लॉग इन करा

‘कॉमन सर्व्हिसेस’ अंतर्गत, ‘सर्व्हिस रिक्वेस्ट’ > ‘नवीन विनंती’ वर क्लिक करा

NSC साठी ‘NSC अकाउंट क्लोजर’ आणि KVP साठी ‘KVP अकाउंट क्लोजर’ वर क्लिक करा

राष्ट्रीय बचत खाते आणि किसान विकास पत्राचे खाते जे बंद करायचे आहे, ते निवडा आणि पुढील प्रक्रिया करा

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.