LIC Premium : कशाला मारता चकरा, घर बसल्या जमा करा विमा हप्ता

LIC Premium : आता विमा हप्ता तुम्हाला घर बसल्या जमा करता येणार आहे.

LIC Premium : कशाला मारता चकरा, घर बसल्या जमा करा विमा हप्ता
Follow us
| Updated on: Jan 30, 2023 | 6:06 PM

नवी दिल्ली : आधुनिक काळात तंत्रज्ञान आणि सुविधा हातात हात घालून तुमच्या दिमतीला हजर आहेत. त्याचा योग्य उपयोग केल्यास तुमचा फायदा होतो. तुम्हाला गुंतवणूक (Investment) करण्यासाठी बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. भारतीय जीवन विमा महामंडळाच्या (Life Insurance of India-LIC) विविध योजना आहेत. त्यात बचतीसह विम्याचे संरक्षण मिळते. एलआयसी पॉलिसी खरेदीनंतर त्याचा हप्ता भरण्यासाठी, पेमेंट करण्यासाठी एलआयसीच्या कार्यालयात अथवा एजंटकडे जावे लागते. एकवेळ अशी होती की, हप्ता भरण्यासाठी एलआयसीच्या कार्यालयात रांगेत उभे रहावे लागत होते. पण आता विविध पेमेंट अॅप आणि गेटवेमुळे (LIC Premium Through UPI) काही मिनिटांतच पेमेंट होते. त्यासाठी एलआयसीच्या कार्यालयात जाऊन चकरा मारण्याची गरज नाही.

युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस (Unified Payment Interface) म्हणजे युपीआयद्वारे एलआयसीच्या पॉलिसीचे पेमेंट करता येते. भारतात गेल्या काही वर्षांपासून युपीआयचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आता ग्राहक खिशात रोख रक्कम ठेवण्याऐवजी पेटीएम, फोन पे, गुगल पे यांच्यामार्फत सहज प्रीमियम भरु शकतात.

त्यामुळे एलआयसीचा प्रीमियम जमा करण्यासाठी तुम्हाला एलआयसीचे कार्यालय, एजंटकडे चकरा मारण्याची गरज नाही. यासंबंधीची प्रक्रिया ही अत्यंत सोपी आहे. त्याआधारे तुम्ही सहज एलआयसी पॉलिसीचा हप्ता घरबसल्या जमा करु शकता.

हे सुद्धा वाचा

एलआयसी प्रीमियमचे पेमेंट करण्यासाठी सर्वात अगोदर फोन पे अॅप (Phone Pe App) उघडा. यामध्ये इन्शुरन्स प्रीमियम पेमेंटचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. त्यानंतर एलआयसी पॉलिसीचा क्रमांक, ई-मेल आयडी टाकून confirm वर क्लिक करा.

ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पेमेंटचा पर्याय दिसेल. हा पर्याय निवडा. त्यानंतर तुमचे क्रेडिट आणि डेबिट कार्ड तपशील भरा. तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल. तो जमा करा. तुमच्या बँकेतून रक्कम कपात होऊन एलआयसीचा प्रीमियम जमा होईल.

पेटीएमद्वारे प्रीमियम जमा करण्यासाटी सर्वात अगोदर पेटीएम अॅप सुरु करा. त्यानंतर एलआयसी इंडियाचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. याठिकाणी तुमचा एलआयसी पॉलिसी क्रमांक टाका आणि संपूर्ण तपशील टाका. त्यानंतर Proceed For Payment चा पर्याय निवडा. त्यानंतर पेमेंट पर्याय निवडा. युपीआयचा पिन टाकल्यानंतर डेबिट अथवा क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट होईल.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.