AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mahila Samman Scheme : या योजनेत मिळेल मोठा परतावा, असा होईल फायदा

Mahila Samman Scheme : या आर्थिक वर्षात केंद्र सरकारने महिलांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी महिला सन्मान बचत योजना सुरु केली आहे. या योजनेत मोठा परतावा मिळणार आहे. मोठा फायदा होणार आहे.

Mahila Samman Scheme : या योजनेत मिळेल मोठा परतावा, असा होईल फायदा
| Updated on: Jun 15, 2023 | 7:57 PM
Share

नवी दिल्ली : महिला सन्मान बचत योजना केंद्र सरकारची महत्वकांक्षी योजना आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली होती. ही योजना केवळ महिलांसाठी आहे. एक रक्कमी रोख भरल्यानंतर हमीपात्र रक्कम लाभार्थ्याच्या खात्यात जमा होते. महिला सम्मान बचत प्रमाणपत्र योजना (MSSC) या 1 एप्रिल 2023 रोजीपासून सुरु करण्यात आली.या योजनेत महिला वा लहान मुलीच्या नावे 31 मार्च 2023 पासून दोन वर्षांसाठी खाते उघडता येईल. या योजनेत मोठा परतावा मिळणार आहे. मोठा फायदा होणार आहे.

येथे उघडा खाते महिला सम्मान सेव्हिंग सर्टिफिकेट योजना कोणतीही महिला अथवा लहान मुलीच्या नावे पालकांना सुरु करता येईल. योजनेतंर्गत 31 मार्च 2023 पासून दोन वर्षांसाठी खाते उघडता येईल. या योजनेत गुंतवणूकदारांना एकल प्रकारचे खाते उघडता येईल. खाते पोस्ट ऑफिस अथवा बँकेत उघडता येईल.

दोन लाख करा जमा या योजनेवर गुंतवणूकदारांना 7.5 टक्के निश्चित व्याज मिळेल. दोन वर्षांच्या कार्यकाळात, महिला अथवा लहान मुलींच्या नावे दोन लाख रुपयांपर्यंत ठेव ठेवता येईल. या योजनेत कमीत कमी 1,000 रुपये तर जास्तीत जास्त 2 लाख रुपये जमा करता येतील. वार्षिक 7.5 टक्के व्याज तिमाहीत जमा करता येईल.

एकूण किती रक्कम मिळणार गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर व्याजाची रक्कम मिळेल. या योजनेत एखाद्या लाभार्थ्याने 2 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर पहिल्या तिमाहीत या रक्कमेवर 3,750 रुपयांचे व्याज मिळेल. दुसऱ्या तिमाहीच्या शेवटी या रक्कमेवर दुसऱ्या गुंतवणुकीवर 3,820 रुपये व्याज मिळेल. यापद्धतीने ज्यावेळी बाँड मॅच्युर होईल, तेव्हा दोन लाख रुपयांचे, एकूण 2,32,044 रुपये मिळतील.

व्याजावर टीडीएस सीबीडीटीने 16 मे 2023 रोजी एक अधिसूचना काढली आहे. त्यानुसार मिळालेल्या व्याजावर कर सवलत मिळणार नाही. जर कोणत्याही आर्थिक वर्षात या योजनेतील व्याजाचा आकडा 40 हजार रुपयांपेक्षा अधिक असेल तर कलम 194ए अंतर्गत टीडीएस द्यावे लागेल.

इतकी काढता येईल रक्कम या योजनेत गुंतवणूकदारांना दोन वर्षांपर्यंत रक्कम ठेवता येईल. गरजेच्यावेळी रक्कम काढता येईल. खाते उघडल्यानंतर त्यांना एक वर्षानंतर खात्यातील रक्कम काढता येईल. एकावेळी खातेदार 40 टक्क्यांपर्यंत रक्कम काढू शकेल. लेखा कार्यालयात त्यासाठी फॉर्म क्रमांक 3 जमा करावा लागेल. त्यानंतर रक्कम प्राप्त होईल.

करा खाते बंद

  1. खातेदाराचा मृत्यू झाल्यास तेव्हा खाते बंद करता येईल
  2. खातेदार गंभीर आजारी असेल, त्याला असाध्य रोग असल्यास
  3. लहान मुलीचा मृत्यू झाल्यास, त्याचा नावाचे खाते बंद करता येईल
  4. आर्थिक विवंचना असेल, त्यासंबंधीची अडचण पटवून दिल्यास खाते बंद होईल
  5. इतर काही कारण असेल तर व्याजदराच्या अटींची पुर्तता करुन खाते बंद होईल

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?