‘ओमिक्रॉन’चं मळभ हटलं: सलग पाचव्या दिवशी मार्केटमध्ये तेजी, टाटा स्टील चकाकले!

काल (बुधवारी) माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तीन दिग्गज कंपन्या टीसीएस, इन्फोसिस आणि विप्रो यांनी आर्थिक तिमाहीची आकडेवारी घोषित केली. टीसीएस आणि इन्फोसिसच्या नफ्यात मोठी वाढ दिसून आली. टीसीएसला 9,769 कोटी आणि इन्फोसिसला 5,809 कोटींचा नफा झाला. आज मार्केटला आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये सावरल्याचं चित्र होतं. मात्र, विप्रो शेअर्स 6 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले.

‘ओमिक्रॉन’चं मळभ हटलं: सलग पाचव्या दिवशी मार्केटमध्ये तेजी, टाटा स्टील चकाकले!
शेअर बाजार
| Edited By: | Updated on: Jan 13, 2022 | 6:45 PM

नवी दिल्ली– आशियाई बाजारातील तेजीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. सलग पाचव्या दिवशी शेअर्स बाजारामध्ये तेजीचे वातावरण दिसून आले. प्रमुख निर्देशांक बीएसई (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्ये (NSE) वाढीचा आलेख चढाच राहिला. सेंन्सेक्स 85.26 अंकाच्या वाढीसह (0.14%) 61,235.30 वर बंद झाला. निफ्टी 45.45 अंकांच्या तेजीसह (0.25%) 18,257.80 वर बंद झाला. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा परिणाम शेअर्स बाजारावरुन दिसून येत आहे. काल (बुधवारी) सेंन्सेक्स 533.15 अंकाच्या वाढीसह (0.88 टक्के) 61,150.04 वर बंद झाला होता. निफ्टी 156.60 अंकांच्या वाढीसह (0.87 टक्के) 18,212.35 पोहोचला होता. गेल्या वर्षी ऑक्टोबर नंतर निफ्टीने पहिल्यांदाच 18,200 टप्पा पार केला होता. टाटा स्टीलच्या (TATA STEEL) शेअर्समध्ये 6.40% ची वाढ नोंदविली गेली. टीसीएस व इन्फोसिसच्या (INFOSYS) शेअर्समध्ये एक टक्का वाढ दिसून आली.

विप्रोची, बँकिंग घसरण:

काल (बुधवारी) माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तीन दिग्गज कंपन्या टीसीएस, इन्फोसिस आणि विप्रो यांनी आर्थिक तिमाहीची आकडेवारी घोषित केली. टीसीएस आणि इन्फोसिसच्या नफ्यात मोठी वाढ दिसून आली. टीसीएसला 9,769 कोटी आणि इन्फोसिसला 5,809 कोटींचा नफा झाला. आज मार्केटला आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये सावरल्याचं चित्र होतं. मात्र, विप्रो शेअर्स 6 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले. बँकिंग क्षेत्रातील सर्वाधिक शेअर्समध्ये घसरण नोंदविली गेली.

आजचे टॉप परफॉर्मर:

• टाटा स्टील (6.40%)
• सन फार्मा (3.53%)
• लार्सेन(2.30%)
• महिंद्रा अँड महिंद्रा (1.66%)
• लार्सेन(1.49%)

आजची सर्वाधिक घसरणीचे शेअर्स

• विप्रो
• एशियन पेंट्स
• एचडीएफसी बँक
• कोटक महिंद्रा
• इंड्सइंड बँक

गेल्या पाच दिवसांतील सेन्सेंक्सची आकडेवारी दृष्टीक्षेपात-

• 13 जानेवारी 61,235.30
• 12 जानेवारी 61,150.04
• 11 जानेवारी 60,616.89
• 10 जानेवारी 60,395.63
• 09 जानेवारी 59,744.65

आंतरराष्ट्रीय पडझडीनंतर तेजी

आंतरराष्ट्रीय बाजारातील व्यवहार, आशियाई मार्केटमधील तेजी तसेच मार्केटवरील ओमिक्रॉनचं सावट यांचा थेट परिणाम शेअर्स मार्केटवर दिसून येत आहे. आगामी अर्थसंकल्प सादर करण्यासाठी तीन आठवड्यांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे प्रस्तावित आर्थिक धोरण तसेच सरकारी बँकेत परकीय गुंतवणूक आदींच्या चर्चांचा परिणाम मार्केटवर जाणवत आहे. बांधकाम क्षेत्रातही विक्री संख्येतील वाढीमुळे तेजीचे वातावरण आहे.

टीसीएसचे पुन्हा ‘बायबॅक’: पाच वर्षातील विक्रमी आकडा, कमाईची बंपर संधी!

Aadhaar Services: आधार अपडेट करताय? जाणून घ्या अधिकृत शुल्क अन्यथा नोंदवा तक्रार!

चलनी नोटा कोरोनाच्या ‘सुपर स्प्रेडर’? ‘कॅट’चे केंद्राला पत्र, वाचा- आरोग्य मंत्रालयाचे उत्तर!