Aadhaar Services: आधार अपडेट करताय? जाणून घ्या अधिकृत शुल्क अन्यथा नोंदवा तक्रार!

तुम्ही नुकतेच तुमच्या आधारमध्ये अपडेट केले असल्यास त्यासाठी तुम्ही अधिक पैसे दिल्यास किंवा तुमच्याकडून अधिक पैशांची मागणी केली असल्यास तुम्ही याविरोधात तक्रार दाखल करू शकतात. आधारसंबंधित अपडेट बाबत आकारण्यात येणाऱ्या अधिकच्या पैशाची तक्रार 1947 वर कॉल द्वारे केली जाऊ शकते

Aadhaar Services: आधार अपडेट करताय? जाणून घ्या अधिकृत शुल्क अन्यथा नोंदवा तक्रार!
AAdhar-Card
Follow us
| Updated on: Jan 13, 2022 | 12:24 AM

नवी दिल्ली – भारतातील सर्वात प्रमुख कागदपत्रांत (Important Documentsआधार कार्डचा समावेश होतो. सध्याच्या स्थितीत आधार कार्ड (Aadhaar Card)शिवाय कोणतेही महत्त्वाचे काम पूर्ण होऊ शकत नाही. केंद्र तसेच राज्य सरकारच्या महत्वाच्या योजनांपासून (Government Schemes) आधारविना वंचित रहावे लागते. भारतात आधार केवळ प्रौढ किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी मर्यादित नाही. तर बालकांसाठी आधारची तरतूद करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या शालेय प्रवेशासाठी आता आधार अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या संबंधित सरकारी योजनांसाठी आधार आवश्यक असते. आधार कार्ड वर विविध प्रकारचा तपशील असतो. तपशील अचूक आणि अद्ययावत असणे अत्यंत महत्त्वाचे असते. दरम्यान, आवश्यकतेवेळी आधार कार्ड मध्ये बदलही केला जाऊ शकतो. विशिष्ट प्रकारची प्रक्रिया त्यासाठी निर्धारित करण्यात आली आहे. भारतात आधार कार्ड जारी करणारे UIDAI द्वारे विविध सेवांसाठी विविध शुल्क निश्चित करण्यात आले आहेत.

विविध सेवा, विभिन्न शुल्क

आधार अपडेट करण्यासाठी विविध प्रकारचे शुल्क आकारले जाते. UIDAI नुसार, तुमच्या आधार कार्डमध्ये डेमोग्राफिक अपडेटसाठी 50 रुपयांचे शुल्क आकारले जाते. बायोमेट्रिक अपडेटसाठी 100 रुपयांचे शुल्क लागते. दरम्यान, आधार नोंदणी आणि लहान मुलांसाठीचे बायोमेट्रिक अपडेट संपूर्णपणे मोफत आहे. नागरिकांना पूर्ण माहितीच्या अभावी निर्धारित शुल्कापेक्षा अधिक पैसे घेतले जातात. UIDAI निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक पैशांची वसूल करण्यास प्रतिबंधित करते.

अधिक शुल्क आकारणी, नोंदवा थेट तक्रार

तुम्ही नुकतेच तुमच्या आधारमध्ये अपडेट केले असल्यास त्यासाठी तुम्ही अधिक पैसे दिल्यास किंवा तुमच्याकडून अधिक पैशांची मागणी केली असल्यास तुम्ही याविरोधात तक्रार दाखल करू शकतात. आधारसंबंधित अपडेट बाबत आकारण्यात येणाऱ्या अधिकच्या पैशांची तक्रार 1947 वर कॉल द्वारे केली जाऊ शकते किंवा तुम्ही uidai.gov.in वर थेट तुमची तक्रार नोंदवू शकता.

आॕनलाईन अपडेट

ऑनलाईन पोर्टलद्वारे आधार कार्डमध्ये बदल केले जाऊ शकतात. स्व-सेवाऑनलाईन पद्धतीमध्ये रहिवासी थेट पोर्टलवर. डेमोग्राफिक माहितीत सुधारणेची विनंती करू शकतात. पोर्टलवर लॉग-इन करण्यासाठी आधार क्रमांक व नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आवश्यक आहेत. रहिवाशाच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ओटीपी पाठवून प्रमाणीकरण केले जाते. सुधारणेची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी, रहिवाशाने स्वतः स्वाक्षरी केलेले सहाय्यक पीओआय/पीओए कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे, जे नंतरच्या टप्प्यात युआयडीएआयच्या सुधारणा बॅक-ऑफिसमधील प्रमाणक विनंती केलेल्या डेटाशी पडताळून पाहतील. ही सेवा वापरण्यासाठी रहिवासी व्यक्तिचा मोबाईल क्रमांक आधारकडे नोंदविलेला असला पाहिजे.

संबंधित बातम्या

चलनी नोटा कोरोनाच्या ‘सुपर स्प्रेडर’? ‘कॅट’चे केंद्राला पत्र, वाचा- आरोग्य मंत्रालयाचे उत्तर!

बजेट 2022 : ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्यांना मिळणार 50 हजार, अर्थसंकल्पात घोषणा?

अ‍ॅमेझॉनवरील भरघोस ऑफर्सचा घ्या फायदा, मिळवा परफेक्ट विंटर लूक

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.