AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुसऱ्याला जांभई देताना पाहून आपल्याला पण का येते? हे आहे यामागचे करण

अमेरिकेत झालेल्या एका अभ्यासानुसार (Mirror Neuron System), मानवी जांभईचा संबंध थेट मेंदूशी असतो. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जांभईमुळे आपला मेंदू..

दुसऱ्याला जांभई देताना पाहून आपल्याला पण का येते? हे आहे यामागचे करण
जांभईImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jul 25, 2023 | 5:26 PM
Share

मुंबई : सोबतच्याला जांभई देताना पाहून तुम्हालाही कधी जांभई आली आहे का? अनेकांसोबत हे बऱ्याचदा घडले असेल. असे का घडते असा प्रश्न तुम्हाला पडला आहे का?  इतरांकडे बघूनच आपल्याला जांभई का येते? खरंतर, असं होण्यामागे अनेक कारणं आहेत, ज्याबद्दल बहुतेक लोकांना माहिती नाही. चला जाणून घेऊया यामागचे कारण काय आहे. अमेरिकेत झालेल्या एका अभ्यासानुसार (Mirror Neuron System), मानवी जांभईचा संबंध थेट मेंदूशी असतो. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जांभईमुळे आपला मेंदू थंड होतो. खरं तर, जेव्हा आपण दिवसभर सतत काम करून थकतो किंवा जेव्हा आपली ऊर्जा पातळी कमी होऊ लागते, तेव्हा आपल्या मेंदूचे तापमान वाढते. मेंदूचे हे तापमान कमी करण्यासाठी शरीर जांभई देण्याची प्रक्रिया पार पाडते. जांभईमुळे गरम डोकं थंड होण्यास मदत होते.

जांभईमुळे पसरू शकतो संसर्ग

‘अ‍ॅनिमल बिहेविअर’ नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित संशोधनानुसार, जे लोकं सतत काम करतात किंवा दिवसभर काही कामात सक्रिय असतात, त्यांना काही वेळात जांभई येते. जांभई देऊनही संसर्ग पसरू शकतो हे अनेकांना माहीत नसते. म्युनिक युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये सुमारे 300 लोकांवर केलेल्या अभ्यासात असे दिसून आले की जेव्हा इतरांनी जांभई दिली तेव्हा तेथे उपस्थित 150 लोकांनीही जांभई देण्यास सुरुवात केली.

इतरांना पाहून जांभई का येते?

शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की कारच्या पुढील सीटवर ड्रायव्हरसोबत बसलेल्या व्यक्तीने झोपणे किंवा जांभई येणे टाळावे. कारण त्यांना पाहून ड्रायव्हरला झोपेचा आणि जांभईचाही अनुभव येईल, जे वाहन चालवताना धोकादायक ठरू शकते. खरं तर, समोरच्या व्यक्तीला जांभई देताना पाहून मिरर न्यूरॉन सिस्टीम लगेच सक्रिय होते. मिरर न्यूरॉन प्रणाली इतरांना जांभईची नक्कल करण्यास भाग पाडते. यामुळेच आपल्याला जांभईही येऊ लागते.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच