AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EPFO : 6 कोटींहून अधिक पगारदारांना लॉटरी! PF वर व्याज वाढले ना राजे हो

EPFO : मोदी सरकारच्या काळात पीएफवरील व्याजदरात मोठी घसरण कर्मचाऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरला होता. यावेळी त्याला अपवाद घडला. घसरण न करता व्याजदरात किंचित वाढ करण्यात आली. इतकी झाली वाढ..

EPFO : 6 कोटींहून अधिक पगारदारांना लॉटरी! PF वर व्याज वाढले ना राजे हो
| Updated on: Jul 25, 2023 | 9:43 AM
Share

नवी दिल्ली | 25 जुलै 2023 : केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) नोकरदार वर्गाला दिलासा दिला. मोदी सरकारच्या काळात पीएफवरील व्याजदरात मोठी (PF Interest Rate) घसरण झाली. त्यामुळे कर्मचारी वर्ग नाराज होता. यावेळी ही नाराजी किंचित दूर करण्याचा प्रयत्न झाला. व्याजदराच्या घसरणीला ब्रेक लागला. व्याजदरात मामुली वृद्धी करण्यात आली. आर्थिक वर्ष 2022-23 साठी व्याजदर 8.15 जाहीर करण्यात आला. यापूर्वी तो 8.10 टक्के होता. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने यासाठी मंजूरी दिली आहे. 2024 मधील लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकींची (Lok Sabha and Legislative Assembly Election) ही रंगीत तालीम असल्याचा तज्ज्ञांचा दावा आहे. तर व्याज दरात अजून वाढ अपेक्षित होती, असे कामगार संघटनांचे म्हणणे आहे. पण हे ही नसे थोडके म्हणून सर्वांनाच आनंद झाला असेल.

यावर्षातील लॉटरी

प्रत्येक सदस्याच्या खात्यात वर्ष 2022-23 साठी व्याज जमा करण्यात येईल. कर्मचारी भविष्य निधी योजना, 1952 च्या नियम 60(1) अंतर्गत केंद्र सरकारने यासाठी मंजूरी दिली.

परिपत्रक जाहीर

ईपीएफओने व्याजदर वाढीचे परिपत्रक जाहीर केले. 24 जुलै, सोमवारी याविषयीचा निर्णय घोषीत करण्यात आला. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या मंडळाने याविषयीचा प्रस्ताव पाठवला होता.

या महिन्यात येईल लक्ष्मी

आर्थिक वर्ष 2022-23 साठी ईपीएफ खात्यावर 8.15 टक्के व्याजदर निश्चीत करण्यात आला. मंजूरीसाठी तो केंद्रीय अर्थमंत्रालयाकडे पाठविण्यात आला. ताज्या अपडेटनुसार, वेतनदारांच्या खात्यात पुढील महिन्यात ऑगस्ट 2023 मध्ये वाढीव व्याजाची रक्कम जमा होईल.

निच्चांकी व्याजदर

  1. 2019-20 साठी प्रॉव्हिडंट फंड ठेवींवरील व्याज दर 8.5 टक्क्यांवर आणला.
  2. 2018-19 मध्ये ईपीएफओवर 8.65 टक्के व्याज देण्यात आले होते.
  3. ईपीएफओने 2016-17  आणि 2017-18 मध्ये 8.65 टक्के व्याजही दिले होते.
  4. 2015-16 मध्ये हा व्याजदर 8.8 टक्के होता.
  5. त्याचबरोबर 2013-14 मध्ये 8.75 टक्के व्याज
  6. 2014-15 मध्ये 8.75 टक्के व्याज देण्यात आले होते.
  7. 2012-13 मध्ये हा व्याजदर 8.5 टक्के होता.
  8. 2011-12 मध्ये हे प्रमाण 8.25 टक्के होते.
  9. आर्थिक वर्ष 2020-21 साठी 24 कोटी पीएफ खात्यांमध्ये 8.5 टक्क्यांनी व्याज जमा
  10. त्यानंतर व्याजदरात अजून कपात करत तो 8.1 टक्क्यांवर आला होता.

घरबसल्या तपासा रक्कम

पीएफ खात्यात सध्याच्या घडीला किती रक्कम आहे, हे तुम्ही घरबसल्या मोबाईलवरुन माहिती करुन घेऊ शकता. ईपीएफओकडे नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून 7738299899 वर EPFO ​​UAN LAN (भाषा) पाठवावा लागेल. तुम्हाला इंग्रजीमध्ये माहिती हवी असल्यास, तुम्ही LAN ऐवजी ENG टाइप करावे आणि मराठी MAR लिहावे. तुम्हाला हिंदीत माहिती मिळवण्यासाठी EPFOHO UAN HIN लिहून संदेश पाठवावा लागेल. यानंतर लगेचच तुम्हाला शिल्लक माहिती सहज मिळेल.

मिस्ड कॉलद्वारे PF शिल्लक समजणार

तुम्हाला तुमच्या पीएफ बॅलन्सबद्दल जाणून घ्यायचे असेल, तर तुम्ही मिस्ड कॉलद्वारेही पीएफ बॅलन्स जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 011 22901406 वर मिस्ड कॉल करावा लागेल.

उमंग ॲपद्वारे पैसे तपासा

सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनवर प्ले स्टोअरवरून उमंग ॲप डाउनलोड करा. त्यानंतर तुमचा फोन नंबर रजिस्टर करून ॲपमध्ये लॉग इन करा. त्यानंतर वरच्या डाव्या कोपऱ्यातील मेनूवर जा. येथे EPFO ​​पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर, व्ह्यू पासबुकमध्ये गेल्यानंतर, OTP द्वारे तुमचा UAN क्रमांक आणि शिल्लक तपासा.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.