AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIC Premium : विम्याचा हप्ता भरण्यासाठी कार्यालय गाठता कशाला, आता हप्ता भरा घरबसल्या

LIC Premium : आता विमा हप्ता भरण्यासाठी एलआयसी कार्यालयाच्या चकरा मारण्याची गरज नाही. आता आधुनिक काळात तंत्रज्ञाना आधारे तुम्हाला घर बसल्या एलआयसीची हप्ता भरता येईल.

LIC Premium : विम्याचा हप्ता भरण्यासाठी कार्यालय गाठता कशाला, आता हप्ता भरा घरबसल्या
| Updated on: Mar 05, 2023 | 10:06 PM
Share

नवी दिल्ली : आता विमा हप्ता भरण्यासाठी एलआयसी कार्यालयाच्या चकरा मारण्याची गरज नाही. आता आधुनिक काळात तंत्रज्ञाना आधारे तुम्हाला घर बसल्या एलआयसीची हप्ता भरता येईल. गुंतवणुकीसाठी (Investment) बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. भारतीय जीवन विमा महामंडळाच्या (Life Insurance of India-LIC) विविध योजना आहेत. त्यात बचतीसह विम्याचे संरक्षण मिळते. पॉलिसी खरेदीनंतर त्याचा हप्ता भरण्यासाठी, पेमेंट करण्यासाठी एलआयसीच्या कार्यालयात अथवा एजंटकडे जावे लागते. यापूर्वी एलआयसीचा हप्ता भरण्यासाठी कार्यालयात रांगेत उभे रहावे लागत होते. पण आता विविध पेमेंट ॲप आणि गेटवेमुळे (LIC Premium Through UPI) काही मिनिटांतच घर बसल्या पेमेंट करता येते.

एलआयसीचा प्रीमियम जमा करण्यासाठी तुम्हाला एलआयसीचे कार्यालय, एजंटकडे चकरा मारण्याची गरज नाही. यासंबंधीची प्रक्रिया ही अत्यंत सोपी आहे. त्याआधारे तुम्ही सहज एलआयसी पॉलिसीचा हप्ता घरबसल्या जमा करु शकता. आधुनिक ॲपच्या माध्यमातून प्रीमियम भरता येईल. युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस (Unified Payment Interface) म्हणजे युपीआयद्वारे एलआयसीच्या पॉलिसीचे पेमेंट करता येते. भारतात गेल्या काही वर्षांपासून युपीआयचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आता ग्राहक खिशात रोख रक्कम ठेवण्याऐवजी पेटीएम, फोन पे, गुगल पे यांच्यामार्फत सहज प्रीमियम भरु शकतात.

यापूर्वी एलआयसीचा हप्ता भरण्यासाठी कार्यालयात रांगेत उभे रहावे लागत होते. पण आता विविध पेमेंट ॲप आणि गेटवेमुळे काही मिनिटांतच घर बसल्या पेमेंट करता येते. आता आधुनिक ॲपच्या माध्यमातून प्रीमियम भरता येईल.

अशी आहे प्रक्रिया

  1. एलआयसी प्रीमियमचे पेमेंट करण्यासाठी सर्वात अगोदर फोन पे ॲप (Phone Pe App) उघडा.
  2. यामध्ये इन्शुरन्स प्रीमियम पेमेंटचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
  3. त्यानंतर एलआयसी पॉलिसीचा क्रमांक, ई-मेल आयडी टाकून confirm वर क्लिक करा.
  4. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पेमेंटचा पर्याय दिसेल. हा पर्याय निवडा.
  5. त्यानंतर तुमचे क्रेडिट आणि डेबिट कार्ड तपशील भरा.
  6. तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल. तो भरा.
  7. तुमच्या बँकेतून रक्कम कपात होऊन एलआयसीचा प्रीमियम जमा होईल.
  8. पेटीएमद्वारे प्रीमियम जमा करण्यासाटी सर्वात अगोदर पेटीएम ॲप सुरु करा.
  9. त्यानंतर एलआयसी इंडियाचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
  10. याठिकाणी तुमचा एलआयसी पॉलिसी क्रमांक टाका आणि संपूर्ण तपशील टाका.
  11. त्यानंतर Proceed For Payment चा पर्याय निवडा. त्यानंतर पेमेंट पर्याय निवडा.
  12. युपीआयचा पिन टाकल्यानंतर डेबिट अथवा क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट होईल.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?