NoiseFit Core 2 Smartwatch झाले लाँच, 7 दिवस चालणार नॉन-स्टॉप !

कमी बजेटमध्ये नवे स्मार्टवॉच हवे असेल तर नॉईज ब्रँडने उत्तम फीचर्ससह एक नवे स्मार्टवॉच आणले आहे. या नव्या स्मार्टवॉचची किंमत आणि त्यातील फीचर्स जाणून घेऊया.

NoiseFit Core 2 Smartwatch झाले लाँच, 7 दिवस चालणार नॉन-स्टॉप !
नॉईज ब्रँडने उत्तम फीचर्ससह एक नवे स्मार्टवॉच
Follow us
| Updated on: Aug 22, 2022 | 6:53 PM

सध्या बाजारात स्मार्टवॉचची खूप चलती आहे. हल्ली प्रत्येकाच्या मनगटावर स्टायलिश स्मार्टवॉच विराजमान असते. तुम्हालाही कमी बजेटमध्ये नवे स्मार्टवॉच हवे असेल तर नॉईज ब्रँडने उत्तम फीचर्ससह एक नवे स्मार्टवॉच आणले आहे. नॉईजफिट कोअर 2 स्मार्टवॉच (NoiseFit Core 2 Smartwatch) बाजारात लाँच झाले आहे. फिटनेस (Fitness) आणि आऊटडोअर ॲक्टिव्हिटीज लक्षात घेऊन नॉईज कंपनीने हे नवे स्मार्टवॉच डिझाईन केले आहे. या स्मार्टवॉचमध्ये स्क्रॅच-रेझिस्टंट (Scratch Resistant Display) डिस्प्ले देण्यात आला असून अनेक हेल्थ फीचर्सही त्यामध्ये पहायला मिळतील. हे स्मार्टवॉच ॲंड्रॉईड आणि आयओएस (Android and iOS) दोन्हींसाठी कम्पॅटिबल आहे. या नव्या स्मार्टवॉचची आणखी फीचर्स काय आहेत, आणि त्याची बाजारात किंमत किती आहे, हे जाणून घेऊया.

NoiseFit Core 2ची किंमत

नॉईज कंपनीच्या या नव्या स्मार्टवॉचची भारतीय बाजारातील किंमत आहे 3999 रुपये. हे स्मार्टवॉच ब्ल्यू, ब्लॅक, ग्रे, ग्रीन आणि पिंक या पाच रंगांमध्ये उपलब्ध असून ते फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. मात्र सध्या हे स्मार्टवॉच त्याच्या मूळ किमतीपेक्षा कमी किमतीत विक्रीसाठी उपलब्ध आहे. पण ते आणखी किती काळ एवढ्या कमी किमतीत मिळेल, याची काही निश्चित माहिती मिळालेली नाही. फ्लिपकार्टवर हे वॉच 1799 रुपयांत विकले जात आहे.

NoiseFit Core 2 चे फीचर्स

नॉईज फिट कोअर 2 या स्मार्टवॉचमध्ये 1.28 इंचाची स्क्रॅच-रेझिस्टंट टचस्क्रीन देण्यात आली असून त्याचे रिझोल्यूशन 240×240 पिक्सेल इतके आहे. या स्मार्टवॉचमध्ये नॉईज कंपनीने 100 हून अधिक क्लाऊड-बेस्ड वॉच फेस दिले आहेत. बॅटरीबाबत सांगायचे झाले तर या स्मार्टवॉचमध्ये 230 एमएएच बॅटरी असून ती 7 दिवसांपर्यंत चालू शकते आणि 30 दिवसांपर्यंत स्टँडबाय टाईम देते, असे सांगण्यात आले आहे. या स्मार्टवॉचसोबत एक मॅग्नेटिक चार्जरही देण्यात आला असून त्याच्या सहाय्याने हे वॉच चार्ज केले जाऊ शकते.

हे सुद्धा वाचा

ब्लड ऑक्सिजन ट्रॅकिंग

नॉईज कंपनीच्या या स्मार्टवॉचमध्ये अनेक हेल्थ फीचर्सही देण्यात आली आहेत. त्यामध्ये हार्ट रेट मॉनिटर, स्टेप्स, कॅलरी काऊंटिंग, ब्लड ऑक्सिजन ट्रॅकिंग इत्यादी सुविधांचा समावेश आहे. हे वॉच स्मार्टफोनशी कनेक्ट केल्यावर या स्मार्टवॉचमध्येच तुम्हाला सर्व मेसेजेस आणि कॉल्सचे नोटिफिकेशन मिळू शकेल. कनेक्टिव्हिटीसाठी ब्ल्यूटूथ सपोर्ट देण्यात आला असून त्याची रेंज 10 मीटर पर्यंत आहे. सॉफ्टवेअर सपोर्ट बद्दल सांगायचे झाले तर हे स्मार्टवॉच ॲंड्रॉईड व्हर्जन 5.0 आणि त्यावरील व्हर्जनला सपोर्ट करते. तसेच आयफोन मॉडेल असल्यास आयओएस 11.0 आणि त्यावरील व्हर्जनलाही सपोर्ट करते.

दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा.
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री.
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी.
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?.
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?.
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?.
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?.
'साईबाबा जर मुस्लिम होते तर...', रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?
'साईबाबा जर मुस्लिम होते तर...', रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?.
उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटल; प्रतापराव चिखलीकर म्हणाले
उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटल; प्रतापराव चिखलीकर म्हणाले.