AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pan Aadhaar Linking : पुन्हा वाढणार का पॅन-आधार लिंक करण्याची डेडलाईन, कोट्यवधींना दिलासा मिळणार?

सरकारने आधार - पॅनकार्डशी लिंक करण्यासाठी अनेकवेळा मुदत वाढवून दिली आहे. 31 मार्च 2022 पर्यंत हे काम मोफत केले जात होते. आता यासाठी 1000 रू. शुल्क आकारले जात आहे, आता पुन्हा एकदा मुदतवाढ मिळणार आहे.

Pan Aadhaar Linking : पुन्हा वाढणार का पॅन-आधार लिंक करण्याची डेडलाईन, कोट्यवधींना दिलासा मिळणार?
pan-aadhaarImage Credit source: socialmedia
| Updated on: Mar 28, 2023 | 12:31 PM
Share

नवी दिल्ली : पॅनकार्ड आधारशी जोडण्याची शेवटची तारीख 31 मार्च असून जशी जशी तारीख जवळ येत आहे तशी ज्यांनी हे काम केलेले नाही त्यांना चिंतेने घेरलेले आहे. आयकर विभागाने दिलेली डेडलाईन आता केवळ तीन दिवस उरलेले आहेत. आयकर विभागाच्या आकडेवारीनूसार अजूनही देशातील दोन कोटी नागरिकांचे पॅनकार्ड आधारशी लिंक करण्यात आलेले नाही. परंतू अशा लोकांसाठी आणखी एक संधी मिळण्याची शक्यता आहे.  त्यामुळे पॅनकार्ड आधारला जोडण्याची डेडलाईन पुन्हा एकदा वाढू शकते असे म्हटले जात आहे.

इंडीयन एक्सप्रेसने दिलेल्या बातमीनूसार सरकार पॅन – आधार कार्डशी लिंक करण्याची तारीख पुन्हा एकदा वाढविण्याच्या तयारीत आहे. या प्रकरणाशी संबंधित एका अधिकाऱ्यांनी सांगितले की सरकार याबाबत केव्हाही नोटीफिकेशन काढू शकते. याचा अर्थ आधारकार्डला पॅनकार्डशी जोडण्यासाठी लोकांना आणखी काही वेळ देण्याच्या मनस्थितीत सरकार आहे. जे करदाते सवलत असलेल्या कॅटेगरीत नाहीत त्यांना 31 मार्चपूर्वी आपले पॅनकार्ड आधारला जोडावे लागणार आहे, सध्या हे काम एक हजार रूपये फि भरून करता येत आहे.

पूर्वी देखील वाढविली होती डेडलाईन

सरकारने आधार – पॅनकार्डशी लिंक करण्यासाठी अनेकवेळा मुदत वाढविली आहे. 31 मार्च 2022 पर्यंत हे काम मोफत केले जात होते. परंतू 1 एप्रिल 2022 नंतर हे काम करण्यासाठी 500 रूपये फि आकारली जात होती. नंतर 1 जुलैनंतर एक हजार रूपये फि आकारली जात आहे. सध्या 31 मार्चपर्यंत याच शुल्कावर पॅन- आधारकार्डशी लिंक केले जात आहे.

का आवश्यक आहे लिंक करणे

इन्कम टॅक्सचा कायदा कलम 139 अअ नूसार 1 जुलै 2017 पूर्वी सर्व पॅनकार्ड आधार कार्डशी जोडणे बंधनकारक केले आहे. सरकारने जुलै महिन्यात संसदेत सांगितले होते की आतापर्यंत 61,73,16,313 लोकांना पॅनकार्ड जारी करण्यात आले आहे. यात 46,70,66,691 लोकांनी आपले पॅनकार्डला आधार कार्डाशी लिंक केले आहे.

तीन कॅटगरीला मिळाली सूट

इन्कम टॅक्स विभागाने तीन वर्गवारीच्या लोकांना आधार लिंक करण्यापासून सूट दिली आहे. यात आसाम, जम्मू-कश्मीर आणि मेघालय राज्यातील नागरिक आणि अनिवासी भारतीय म्हणजे एनआरआय लोकांना सूट देण्यात आली आहे. तसेच 80 वर्षांवरील व्यक्तींनाही आधार – पॅनकार्ड लिंक करण्यापासून सूट आहे. या वर्गवारी वगळता सर्वांना पॅन – आधारकार्ड लिंक करणे बंधनकारक आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?