AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पासपोर्ट बनवणे आता महागले, वाचा नेमके शुल्क किती वाढले ?

केंद्र सरकारने पासपोर्ट आणि त्याच्याशी संबंधित सेवा शुल्कात वाढ केली आहे. ही दरवाढ १ जुलै २०२६ पासून लागू होणार आहे. नवीन नियमांतर्गत पासपोर्ट तयार करण्यासाठी आणि त्याचे नृतनीकरण करण्यासाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत.

पासपोर्ट बनवणे आता महागले, वाचा नेमके शुल्क किती वाढले ?
Passport issuance fees to increase
| Updated on: Jun 25, 2026 | 7:51 PM
Share

केंद्र सरकाने पासपोर्ट आणि त्याच्याशी संबंधित सेवांचे शुल्क वाढवले आहे. पासपोर्ट तयार करण्याच्या शुल्कात बदल अशा वेळी केला आहे. जेव्हा पासपोर्टला नागरिकत्वाचा पुरावा न मानण्याच्या सरकारच्या निर्णयाने वादळ उठले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्ट ( सुधारणा ) नियम, २०२६ जारी करताना या पुढच्या महिन्यांपासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या नियमांनुसार १ जुलै २०२६ पासून पासपोर्टचे नव्या शुल्काची अंमलबजावणी होणार आहे.

एकीकडे पासपोर्ट हा नागरिकत्वचा पुरावा नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे पासपोर्ट तयार करण्यासाठी इतकी सरकारी कागदपत्रे आणि पडताळणी होत असतानाही जर पासपोर्ट हा नागरिकत्वाचा पुरावा नसेल तर काय उपयोग असा सवाल विरोधी पक्षांनी केला आहे.

केंद्र सरकारने पासपोर्ट आणि त्याच्या सेवे संदर्भातील फीमध्ये मोठा बदल केला आहे. हा बदल अशा वेळी केला जात आहे. ज्यावेळी देशभरात पासपोर्टला नागरिकत्वाचे प्रमाण न मानण्यासंदर्भातील निर्णयावरुन देशभरात चर्चा सुरु आहे. आता नव्या नियमांनुसार पासपोर्ट काढण्याच्या फीमध्ये दोन हजार रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते असे म्हटले जात आहे. या संदर्भातील नवीन दरवाढ येत्या १ जुलै २०२६ पासूनच लागू करण्यात येत आहे. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांना या वाढत्या महागाईत खिशाला चांगलाच चाट पडणार आहे.

केंद्र सरकारने पासपोर्टसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. नवीन व्यवस्था लागू झाल्यानंतर आता नवीन पारपत्र तयार करण्यासाठी , पासपोर्ट नूतनीकरण करण्यासाठी आणि अन्य संबंधित सेवांची सुधारित फी भरावी लागणार आहे. त्याच सोबत पासपोर्ट नियम, १९८० च्या जूनी शुल्क सूची ( शेड्युल-IV ) ला हटवून नवीन शुल्क सूची लागू करण्यात आली आहे.परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की १ जुलै २०२६ पासून सर्व पासपोर्ट सेवांवर नवीन शुल्क आकारले जाणार आहे.

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा