AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Price Today: पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जाहीर, जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव

Petrol Diesel | पेट्रोलियम कंपन्यांनी मंगळवारी सकाळी जाहीर केलेल्या दरांनुसार, दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 104.01 रुपये आणि डिझेलची किंमत 86.71 रुपये प्रति लिटर आहे. तर मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 109.96 आणि 94.13 रुपये प्रतिलीटर इतका आहे.

Petrol Price Today: पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जाहीर, जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव
पेट्रोल-डिझेल
| Edited By: Rohit Dhamnaskar | Updated on: Nov 09, 2021 | 6:58 AM
Share

नवी दिल्ली: देशातील सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी (IOCL) आज मंगळवारी (9 नोव्हेंबर) पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर (पेट्रोल-डिझेल आजचे दर) जाहीर केले. आजही इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. देशभरात सलग तिसऱ्या दिवशी इंधनाचे दर स्थिर आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांना तात्पुरता का होईना पण दिलासा मिळाला आहे.

पेट्रोलियम कंपन्यांनी मंगळवारी सकाळी जाहीर केलेल्या दरांनुसार, दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 104.01 रुपये आणि डिझेलची किंमत 86.71 रुपये प्रति लिटर आहे. तर मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 109.96 आणि 94.13 रुपये प्रतिलीटर इतका आहे.

महाराष्ट्रात पेट्रोल स्वस्त होण्याची शक्यता

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी करामध्ये कपात केल्यानंतर आता महाराष्ट्रातही इंधन स्वस्त होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राज्य सरकारकडून पेट्रोलच्या दरात दोन रुपयांची कपात केली जाऊ शकते. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किती कपात होणार, याचे चित्र स्पष्ट होईल. इंधन दरात कपात झाल्यास राज्यातील सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.

यापूर्वी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात अनुक्रमे 5 रुपये आणि 10 रुपयांची कपात केली होती. त्यानंतर अनेक राज्यांनी इंधनावरील व्हॅट कमी करत आपापल्या राज्यातील जनतेला आणखी स्वस्तात इंधन उपलब्ध करुन दिले होते. त्यामुळे महाराष्ट्र सरकारही इंधन दरकपातीचा निर्णय कधी घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

दररोज 6 वाजता बदलतात किमती

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.

असे तपासा पेट्रोल आणि डिझेलचे भाव

आपण एसएमएसच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकता. पेट्रोल-डिझेलच्या किमती दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. इंडियन ऑइलच्या वेबासाइटनुसार, RSP बरोबर आपल्या शहराचा कोड टाइप करून 9224992249 नंबरवर SMS पाठवावा लागणार आहे. या शहराचा कोड वेगवेगळा असतो. बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरवर मेसेज पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकतात.

संबंधित बातम्या:

इलेक्ट्रिक वाहन मालकांचं टेन्शन कमी होणार, BPCL 7000 पेट्रोल पंपांवर चार्जिंग स्टेशन उभारणार

मोठी बातमी: महाराष्ट्रात पेट्रोल स्वस्त होण्याची शक्यता, उद्धव ठाकरे आणि अजित पवारांची महत्त्वाची बैठक

Petrol Diesel Price: आजपासून पंजाबमध्ये पेट्रोल 10 आणि डिझेल 5 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या आजचा भाव

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली