इलेक्ट्रिक वाहन मालकांचं टेन्शन कमी होणार, BPCL 7000 पेट्रोल पंपांवर चार्जिंग स्टेशन उभारणार

देशातील दुसरी सर्वात मोठी तेल विपणन कंपनी बीपीसीएलचे वितरण नेटवर्क आहे, ज्यामध्ये देशभरातील सुमारे 19,000 रिटेल आउटलेटचा समावेश आहे. "ईव्ही चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला नवीन व्यवसाय संधी देईल. तसेच ऑटो इंधनाची आवश्यकता कमी झाल्यास उद्भवणाऱ्या जोखमीपासून बचाव करेल," असे कंपनीने शुक्रवारी एका निवेदनात म्हटले.

इलेक्ट्रिक वाहन मालकांचं टेन्शन कमी होणार, BPCL 7000 पेट्रोल पंपांवर चार्जिंग स्टेशन उभारणार
भारतात चार्जिंग स्टेशन तयार करुन कमाई करण्याची नवी संधी निर्माण झाली आहे.
Follow us
| Updated on: Nov 05, 2021 | 5:08 PM

नवी दिल्ली : फॉर्च्युन ग्लोबल 500 कंपन्यांपैकी एक असलेल्या आणि भारत सरकारच्या मालकीची महारत्न कंपनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने (BPCL) पुढील पाच वर्षांत सुमारे 7,000 पेट्रोल पंपांवर इलेक्ट्रिक वाहनांसाठी म्हणजेच ईव्हीसाठी चार्जिंग स्टेशन्स उभारण्याची योजना आखली आहे.

ईव्हीसाठी 10,000 चार्जिंग स्टेशन्स स्थापन करणार

अलीकडेच देशातील सर्वात मोठी पेट्रोलियम कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन म्हणजेच IOC ने सांगितले होते की, कंपनी पुढील तीन वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांसाठी म्हणजेच ईव्हीसाठी 10,000 चार्जिंग स्टेशन्स स्थापन करेल. उल्लेखनीय बाब म्हणजे COP-26 दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी भारतासाठी 2070 पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य जाहीर केले. भारत सध्या जगातील तिसरा सर्वात मोठा कार्बन उत्सर्जन करणारा देश आहे.

बीपीसीएलचे देशभरात सुमारे 19,000 रिटेल आउटलेट

देशातील दुसरी सर्वात मोठी तेल विपणन कंपनी बीपीसीएलचे वितरण नेटवर्क आहे, ज्यामध्ये देशभरातील सुमारे 19,000 रिटेल आउटलेटचा समावेश आहे. “ईव्ही चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला नवीन व्यवसाय संधी देईल. तसेच ऑटो इंधनाची आवश्यकता कमी झाल्यास उद्भवणाऱ्या जोखमीपासून बचाव करेल,” असे कंपनीने शुक्रवारी एका निवेदनात म्हटले. “नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑटोमोबाईल कंपन्या मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत आणि लोकही त्यात रस घेत आहेत. अशा परिस्थितीत येत्या काही वर्षांत देशातील इलेक्ट्रिक वाहन इकोसिस्टममध्ये वेगाने वाढ होण्याची अपेक्षा आहे.

पहिले Jio-bp ब्रँडेड मोबिलिटी स्टेशन लॉन्च

गेल्या काही दिवसांपूर्वी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) आणि bp चा इंधन आणि गतिशीलता संयुक्त उपक्रम रिलायन्स BP मोबिलिटी लिमिटेड (RBML) यांनीसुद्धा नवी मुंबईत नावडे येथे पहिले Jio-bp ब्रँडेड मोबिलिटी स्टेशन लॉन्च केले होते. आव्हानात्मक महामारी-प्रभावित वातावरणात काम करताना Jio-bp ग्राहकांना अनेक इंधन पर्याय ऑफर करणारे जागतिक दर्जाचे मोबिलिटी स्टेशनचे नेटवर्क आणत आहे

Jio-bp कडून पहिले मोबिलिटी स्टेशन लॉन्च

Jio-bp मोबिलिटी स्टेशन्सचे नेटवर्क सादर करत आहे जे ऑफर करतात: • जागतिक दर्जाचा रिटेलिंग अनुभव प्रदान करताना अनेक इंधन पर्याय • भारतात प्रथमच कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय संपूर्ण नेटवर्कवर जोडलेले इंधन – • संपूर्ण भारत ईव्ही चार्जिंग पायाभूत सुविधा • एक आंतरराष्ट्रीय ऑन-द-मूव्ह ब्रँड, वाईल्ड बीन कॅफे • कॅस्ट्रॉल एक्सप्रेस ऑईल चेंज येथे 2 चाकी वाहनांसाठी मोफत, जलद आणि विश्वासार्ह तेल बदलण्याची सेवा.

संबंधित बातम्या

कोणत्या राज्यात पेट्रोल आणि डिझेल किती स्वस्त?, तुमच्या शहरातील दर काय?

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! ‘या’ स्थानकावर डिलक्स टॉयलेट अन् एसी लाऊंजची सुविधा मिळणार

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.