

पीएनबी (Punjab National Bank)चे ग्राहक ट्विटरवर या समस्येसंदर्भात बँकेला टॅग करीत आहेत. त्यांच्या तक्रारीवर बँकेकडून तातडीने दखल घेत समस्या जाणून घेत त्या सोडवण्याचे आश्वासन दिले.

वास्तविक, पीएनबी ग्राहक मोबाईल अॅपवर डिजिटल व्यवहार करण्यास सक्षम नाहीत. त्यांना युपीआय, इंटरनेट बँकिंगद्वारे पैसे हस्तांतरित करण्यातही अडचणी येत आहेत. बर्याच ग्राहकांना अशीच समस्या भेडसावत आहे.

बँकेने या समस्यांविषयी संपूर्ण माहिती दिली आहे. बँकेने ग्राहकांच्या ट्वीटला दिलेल्या उत्तरात म्हटले आहे की, "प्रिय ग्राहक, आपल्याला होणार्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आमची इंटरनेट बँकिंग, यूपीआय आणि अॅप सर्व्हिसेस काही तांत्रिक कारणांमुळे अडचणी येत आहे. तथापि, आमची टीम यावर काम करत आहे, ती लवकरच सोडवली जाईल."

तांत्रिक कारणांमुळे ग्राहकांना भेडसावत असलेल्या समस्या लवकरच दूर केल्या जातील असे बँकेने ट्वीटद्वारे स्पष्ट केले आहे. पीएनबी ही देशातील दुसर्या क्रमांकाची सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. बँक आपल्या ग्राहकांच्या सुविधांची काळजी घेण्याचा दावा करते.