पोस्टाच्या या योजनेतून मिळेल तुम्हाला अधिक परतावा, आजच आपल्या मुलीचे भविष्य सुरक्षीत करा

| Updated on: Mar 30, 2022 | 7:30 AM

जर तुम्ही भविष्यात गुंतवणुकीचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी पोस्ट ऑफिसच्या सेव्हिग्स स्कीम (Saving Schemes) एक उत्तम पर्याय ठरू शकतात. पोस्ट ऑफीसच्या योजनांचे वैशिष्ट म्हणजे एक तर या योजनांमधून चांगला परतावा मिळतो. दुसरे म्हणजे तुमची बचत सुरक्षीत राहाते.

पोस्टाच्या या योजनेतून मिळेल तुम्हाला अधिक परतावा, आजच आपल्या मुलीचे भविष्य सुरक्षीत करा
समृद्धी सुकन्या योजना
Follow us on

जर तुम्ही भविष्यात गुंतवणुकीचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी पोस्ट ऑफिसच्या सेव्हिग्स स्कीम (Saving Schemes) एक उत्तम पर्याय ठरू शकतात. पोस्ट ऑफीसच्या योजनांचे वैशिष्ट म्हणजे एक तर या योजनांमधून चांगला परतावा मिळतो. दुसरे म्हणजे तुमची बचत सुरक्षीत राहाते. तुम्ही आयुष्यभर काबाड कष्ट करून पैसे कमावलेले असतात. अशा परिस्थितीमध्ये पैसे नेमके कुठे गुंतवावे (Investment) असा प्रश्न तुम्हाला सहाजिकच पडतो, तचेस गुंतवणूक केलेल्या पैशांवर चांगला परतावा मिळावा असे देखील तुम्हाला वाटत असते. तुम्ही जर तुमचे पैसे बँकेच्या एखाद्या योजनेमध्ये गुंतवले तर काही प्रमाणात रिस्क असतेच बँक दिवाळखोरीत (Bank Default) निघाली तर तुम्हाला सरकारी नियमानुसार केवळ पाच लाखांपर्यंतची रक्कम परत मिळते. मात्र पोस्टांच्या योजनांमध्ये असे होत नाही. तुम्हाला तुमची संपूर्ण रक्कम परत मिळते, ती देखील व्याजासह. आज आपण अशाच एका योजनेची माहिती घेणार आहोत. ज्या योजनेचे नाव आहे सुकन्या समृद्धी योजना. जर तुमच्या घरात मुलगी असेल तर तुम्ही या योजनेचे लाभार्थी होऊ शकतात.

खाते कोणाला उघडा येते?

अशी मुलगी जीचे वय हे दहा वर्षांपेक्षा लहाण आहे, तिच्या आईवडील, भाऊ किंवा तिच्या पालकांना या मुलीच्या नावाने सुकन्या समृद्धी योजनेनंतर्गत पोस्टामध्ये खाते उघडता येते. एका मुलीच्या नावाने तुम्ही एकच खाते उघडू शकता. या खात्यावर तुम्हाला दरवर्षी एक ठराविक रक्कम जमा कारवी लागते.

गुंतवणुकीचे नियम

पोस्टाची सुकन्या समृद्धी योजना ही अगदी सर्व सामान्य माणसांचा विचार करून बनवण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेत फार मोठी रक्कम गुंतवण्याची आवश्यकता नसते. तुम्ही या योजनेंतर्गंत आपल्या मुलीचे खाते उघडून दर वर्षाला कमीत कमी 250 रुपये तर जास्तीत जास्त दीड लाख रुपयांची गुंतवणूक करू शकता. जेव्हा तुमची मुलगी वयाचे अठरा वर्ष पूर्ण करते, तेव्हा या योजनेचा तिला लाभ मिळतो. हाच पैसा पुढे तिच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी तुम्ही वापरू शकता. वेळेवर पैसा हातात असल्याने तुमच्यावर आर्थिक ताण येत नाही.

व्याज किती मिळते?

बँकेच्या किंवा पोस्टाच्या इतर योजनेच्या तुलनेत समृद्धी सुकन्या योजनेंतर्गंत तुम्ही गुंतवलेल्या रकमेवर चांगले व्याज मिळते. पोस्ट ऑफीसकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार सध्या या योजनेवर 7.6 दराने व्याज मिळते. वर्षाच्या शेवटी हे व्याज तुमच्या खात्यात जमा केले जाते. एवढेच नाही तर या योजनेत पैसे गुंतवल्यास तुम्हाला नियमानुसार इनकम टॅक्समधून देखील सूट मिळते.

संबंधित बातम्या

Petrol-Diesel Price Today : आज पुन्हा पेट्रोल, डिझेल 80 पैशांनी महाग, गेल्या आठ दिवसांत पेट्रोलचे दर सहा रुपयांनी वाढले

थर्ड पार्टी विमा महागला; दुचाकीसह रिक्षा चालकांना फटका बसणार; इलेक्ट्रीक वाहनांच्या इन्शुरन्सवर 15 टक्के सूट

अदानी ग्रुपचे शेअर्स तेजीत; ट्रेडिंगमध्ये सर्वोच्च पातळीवर