जन्मभराच्या नात्याला विम्याच्या संरक्षणासह परताव्याचे वचन, दरमहा 2200 रुपये करा जमा अन् कालावधी संपल्यानंतर दहा लाखांचा परतावा घ्या

| Updated on: Apr 04, 2022 | 3:14 PM

वैवाहिक जीवनाला विम्याच्या संरक्षणासह परताव्याचे वचन टपाल खात्याने दिले आहे. किमान 20 हजार आणि जास्तीत जास्त 5 लाखांची पॉलिसी खरेदी करता येईल. मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि त्वरीत प्रीमियम भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार, निमसरकारी क्षेत्रातील कर्मचारी, एनएसई किंवा बीएसईचे कर्मचारी, डॉक्टर, इंजिनिअर्स, सीए, मॅनेजमेंट कन्सल्टंट, वकील, बँकर्स किंवा सरकारने मान्यता दिलेल्या शैक्षणिक संस्थांमधील कर्मचाऱ्यांना ही योजना लागू आहे.

जन्मभराच्या नात्याला विम्याच्या संरक्षणासह परताव्याचे वचन, दरमहा 2200 रुपये करा जमा अन् कालावधी संपल्यानंतर दहा लाखांचा परतावा घ्या
विमा पॉलिसी
Follow us on

मुंबई : पोस्टल लाइफ इन्शुरन्स (PLI) अंतर्गत संयुक्त जीवन एंडोमेंट प्लॅन किंवा कपल प्रोटेक्शन (PLI YUGAL) सुरक्षा नावाची योजना चालविली जाते. ही योजना अनेक अर्थांनी चांगली आहे, कारण कमी प्रीमियममध्ये अधिकाधिक सुरक्षा कवच आणि कालावधी पूर्ण झाल्यानंतर (Maturity) मिळणारी रक्कम ही चांगली मिळते. या योजनेत पती-पत्नीला एकाच वेळी विमा संरक्षण मिळते. मॅच्युरिटीवर सम अॅश्युअर्डसोबत बोनसही दिला जातो, अशी ही पॉलिसी आहे. याचा अर्थ असा की जर पॉलिसी दरम्यान जोडीदारांपैकी एकाचा मृत्यू झाला तर दुसऱ्या जोडीदारास एक निश्चित रक्कम आणि बोनसचा लाभ मिळतो.पोस्टल लाइफ इन्शुरन्स अंतर्गत कपल प्रोटेक्शन स्कीम भारतीय विमा नियामक प्राधिकरणाच्या (IRDA) अंतर्गत येत नाही. पण ही योजना पूर्णपणे सरकारी आहे आणि दुरसंचार खात्यांतर्गत टपाल कार्यालयमार्फत ही योजना राबविण्यात येते.
केंद्र सरकार, राज्य सरकार, निमसरकारी क्षेत्रातील कर्मचारी, एनएसई किंवा बीएसईचे कर्मचारी, डॉक्टर, इंजिनिअर्स, सीए, मॅनेजमेंट कन्सल्टंट, वकील, बँकर्स किंवा सरकारने मान्यता दिलेल्या शैक्षणिक संस्थांमधील कर्मचाऱ्यांना ही योजना लागू आहे.

पॉलिसी कोण घेऊ शकेल?

21 ते 45 वयोगटातील पती- पत्नी या योजनेसाठी पात्र आहे. जोडीदारांपैकी कोणीही ही पॉलिसी घेऊ शकतो. ज्यामध्ये दुसऱ्या जोडीदारास आपोआप विमा संरक्षण मिळते. ही योजना कमीत कमी 5 वर्षे आणि जास्तीत जास्त 20 वर्षांसाठी घेता येईल. पॉलिसी जेवढी जास्त असेल, तेवढ्याच वर्षांसाठी प्रिमियम भरावा लागेल. किमान 20 हजार आणि जास्तीत जास्त 5 लाख सम अॅश्युअर्डची पॉलिसी खरेदी करता येईल. मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि लवकर प्रीमियम भरता येईल.

या सोप्या उदाहरणाने पॉलिसी घेऊ समजून

हे एका साध्या उदाहरणावरून पॉलिसीचे गणित समजू शकते. 35 वर्षीय रचितची पत्नी 32 वर्षांची असून आयुर्विम्यासाठी रचितने पोस्ट ऑफिस कपल सिक्युरिटी पॉलिसी खरेदी केली आहे. रचितने 5 लाख रुपयांच्या विम्याची पॉलिसी घेतली असून त्यासाठी त्याने 20 वर्षांचा पॉलिसी कालावधी निश्चित केला आहे. रचितने 5 लाख रुपयांच्या विम्याची पॉलिसी घेतली असून त्यासाठी त्याने 20 वर्षांचा पॉलिसी कालावधी निश्चित केला आहे. रचितला पहिल्या महिन्यात 2250 रुपये प्रीमियम भरावा लागणार आहे, तर 2201 रुपये प्रीमियम पुढील महिन्यापासून भरावा लागणार आहे. रचितला वार्षिक प्रीमियम भरायचा असेल तर पहिल्या वर्षी 26 हजार 9 रुपये आणि पुढच्या वर्षी 26 हजार 417 रुपये भरावे लागतील. जीएसटीमुळे पहिल्यांदा हप्त्याची रक्कम थोडी जास्त भरावी लागेल एवढेच. रचित संपूर्ण पॉलिसी दरम्यान 5,28,922 रुपये जमा करेल. या पॉलिसीला 20 वर्षे पूर्ण झाल्यावर पॉलिसी मॅच्युअर होऊन रचितला सम अॅश्युअर्ड म्हणून पाच लाख रुपये आणि बोनस म्हणून 5.20 लाख रुपये मिळतील. अशा प्रकारे मॅच्युरिटीवर रचितच्या खात्यात एकूण 10 लाख 20 हजार रुपये मिळतील. बोनसचे पैसे दरवर्षी पॉलिसीमध्ये जोडले जातात आणि त्याचा दर 32 रुपये प्रति हजार आहे.

डेथ बेनिफिट म्हणजे काय?

विमा संरक्षण घेतल्यापासून विमाधारक अपघाताचा बळी ठरला. त्याचा मृत्यू ओढवल्यास
त्याच्या पत्नीला विम्याची 5 लाख रक्कम आणि बोनसची जी रक्कम जोडलेली आहे, ती मिळेल. जर 5 वर्षानंतर विमाधारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीला संपूर्ण 5 वर्षांसाठी 5 लाख रुपये आणि वर्षाला 26,000 रुपये सम अॅश्युअर्ड बोनस मिळेल. ही रक्कम एकरकमी धरल्यास पत्नीला एकूण 6,30,000 रुपये डेथ बेनिफिट म्हणून मिळतील.

इतर बातम्या :

Best Multibagger Stock : काय सांगता! अवघ्या 5 रुपयांचा शेअर पोहचला 470 रुपयांवर, 5 महिन्यांतच एक लाखांचे झाले 94 लाख

अल्पबचत योजनेतील गुंतवणुकीवरचा फायदा कायम, NSC, PPF, KVP, Sukanya योजनेवरील व्याजदर जैसे थेच

मोठी घोषणा, एचडीएफसी आणि HDFC बँकेच्या विलीनीकरणास मान्यता, काय होणार परिणाम?