UPI Payment | युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस (Unified Payments Interface-UPI) भारतात सध्या सर्वाधिक लोकप्रिय व्यवहार हस्तांतरण पद्धत आहे. एका क्लिकवर समोरच्याला तात्काळ रक्कम मिळत असल्याने युपीआयचा वापर अशात जास्त वाढला आहे. सध्या या पद्धतीने व्यवहार करण्यासाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क (Charges) आकारण्यात येत नाही. परंतू ही लवकरच या सुविधेसाठी तुम्हाला शुल्क आकारण्यात येणार आहे. देशाची मध्यवर्ती बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) याविषयीचा प्रस्ताव तयार केला आहे. आरबीआयने डिस्कशन पेपर ऑन चार्जेस इन पेमेंट सिस्टम (Discussion Paper on Charges in Payment Systems) या नावाचा अभ्यासपूर्ण लेख प्रकाशित केला आहे. त्यात आरबीआयने सूचना आणि हरकती मागविल्या आहेत. डेबिट कार्ड व्यवहारासाठी एक निश्चित शुल्क आकारण्याचा योजना बँक करत आहे. सध्या डेबिट कार्ड व्यवहार हा पूर्णतः निःशुल्क आहे.