AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SAMADHAN | SAMADHAN आहे, जर तुम्हाला कंपनीविषयी तक्रार असेल, त्रास असेल..

SAMADHAN | केंद्र सरकारचे कामगार आणि रोजगार मंत्रालयाने कर्मचाऱ्यांच्या छळवणुकीला गंभीरतेने घेतले आहे. जर तुम्हीही तुमच्या कंपनीच्या वर्तणुकीवर नाराज असाल, तर SAMADHAN Portal वर तुम्ही तक्रार नोंदवू शकता.

SAMADHAN | SAMADHAN आहे, जर तुम्हाला कंपनीविषयी तक्रार असेल, त्रास असेल..
तक्रारीतून शोधा समाधानImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Sep 10, 2022 | 12:17 PM
Share

SAMADHAN | कोणतीही व्यक्ती मोठ्या उम्मीदेने कंपनीत नोकरी(Jobs) करते. नोकरीतील उत्पन्नातूनच (Payments)आपण आपल्या कच्च्या-बच्च्यासह संसाराचा गाडा हाकतो. काही बचत भविष्यासाठी राखून ठेवतो. बऱ्याचदा आपण पाहतो, अथवा ऐकतो की बरेच कर्मचारी त्यांच्या नोकरीत खूश (Not happy with work culture) नसतात. त्यांना कार्यालयात नाहक त्रास दिल्या जातो. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालय (Labour Ministry) अशा कर्मचाऱ्यांच्या मदतीला धाऊन आले आहे.

तर करा तक्रार

काही ठिकाणी कोणतेही ठोस कारण न देता कर्मचाऱ्याला कामावरुन कमी करण्यात येते. जर तुम्ही ही कंपनीच्या अशा नाहक त्रासापासून त्रस्त असाल तर तुम्ही तक्रार दाखल करु शकता.

तक्रारीचे ‘समाधान’

बडतर्फी, सेवेतून अचानक कमी करणे, सेवा समाप्त करणे यासंदर्भात तुम्ही भारत सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या समाधान पोर्टलवर तक्रार करु शकता.

अधिकाऱ्यासमोर आणा मुद्दा

कामगार कायद्यानुसार, बडतर्फी, सेवा समाप्तीविरोधात कर्मचाऱ्याला आवाज उठवता येतो. संबंधित अधिकाऱ्यासमोर हा मुद्दा उपस्थित करता येतो.

समाधान पोर्टलवर तक्रार दाखल करा

जर तुम्ही कंपनीत काम करत असाल. याठिकाणी ठोस कारण न देता तुम्हाला बडतर्फ करण्यात आले असेल. नोकरीतून कमी केले असेल अथवा सेवा समाप्त केली असेल तर तुम्ही तक्रार दाखल करु शकता. samadhan.labour.gov.in या संकेतस्थळावर तक्रार दाखल करता येईल.

ट्विट करुन दिली माहिती

केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने याविषयीचे ट्विट केले आहे. त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन मंत्रालयाने ट्विट केले आहे. त्यात कंपनीत छळ होत असेल अथवा कामावर समाधानी नसाल तर नियोत्याविरोधात तक्रार दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.