‘Home Loan OD’ च्या माध्यमातून वाचवा कर्जावरील व्याज, जाणून घ्या ओव्हरड्राफ्ट सुविधेचा फायदा

| Updated on: Apr 14, 2022 | 10:58 AM

होम लोन ओडी हा होम लोनचा एक प्रकार आहे. या प्रकारच्या सुविधेमुळे तुम्ही होम लोनच्या बदल्यात भराव्या लागणाऱ्या व्याजामध्ये बचत करू शकता. यासाठी बँकाकडून तुमच्या ओडी मर्यादेसह खाते उघडण्यात येते.

Home Loan OD च्या माध्यमातून वाचवा कर्जावरील व्याज, जाणून घ्या ओव्हरड्राफ्ट सुविधेचा फायदा
प्रातिनिधीक फोटो
Image Credit source: RoofandFloor
Follow us on

जाफर यांनी सहा महिन्यांपूर्वी घर खरेदी केली आहे. त्यांनी घर खरेदी करण्यासाठी बँकेकडून होम लोन (Home Loan) घेतले होते. आत ते दर महिन्याला नियमित पणे होम लोनाच हप्ता बँकेत भरत आहेत. मात्र गेल्याच महिन्यामध्ये त्यांना त्यांच्या एका मित्राकडून होम लोन ओव्हरड्राफ्ट (overdraft facility) बद्दल माहिती मिळाली. तसेच त्या मित्राने होम लोन सोबतच होम लोन ओव्हरड्राफ्ट सुविधेचा फायदा घेण्याचा सल्ला देखील जाफर यांना दिला. जाफर यांनी होम लोन ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभा घेतल्यास ते होम लोनच्या व्याजपोटी (interest) जे पैसे भरावे लागणार आहेत, त्या पैशांची बचत करू शकतात. जर तुम्ही देखील होम लोन काढून घर खरेदी केले असेल तर तुमच्यासाठी देखील होम लोन ओव्हरड्राफ्ट अर्थात ओडीचा लाभा घेणे फायद्याचे ठरू शकते. तुम्ही या माध्यमातून व्याजाच्या पैशांमध्ये बचत करू शकता. होम लोन ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय? आणि ते कसा उपयोग करोत यांची माहिती आज आपण घेणार आहोत.

काय आहे होम लोन ओडी

होम लोन ओडी हा होम लोनचा एक प्रकार आहे. या प्रकारच्या सुविधेमुळे तुम्ही होम लोनच्या बदल्यात भराव्या लागणाऱ्या व्याजामध्ये बचत करू शकता. यासाठी बँकाकडून तुमच्या ओडी मर्यादेसह खाते उघडण्यात येते. समजा जर जाफरला पन्नास लाखांचे कर्ज मंजूर झाले आणि त्याने फक्त चाळीस लाखांचेच कर्ज घेतले तर दहा लाख रुपये ही त्याची होम लोन ओव्हर ड्राफ्ट मर्यादा असेल. तुम्ही तुमच्या होम लोन ओडी खात्यातून गरज लागल्यास पैसे काढू शकता. तुम्ही जेवढे पैसे काढणार तेवढ्याच पैशांचे व्याज तुम्हाला भरावे लागेल.

होम लोन ओडी काम कसे करते

तुम्हाला जर होम लोन ओडीचा फायदा घ्यायचा असेल तर ज्या बँकेकडून तुम्ही होम लोन घेतले आहे. ती बँक तुमचे कर्ज खाते बचत खात्यासोबत जोडते. त्या खात्यावर पैसे जमा होतात. पैसे जमा झाल्यानंतर तुम्ही तुमच्या गरजेनुसार संबंधित खात्यामधून पैसे काढ शकता. तुम्ही जेवढे पैसे काढाल तेवढ्याच पैशांवर तुम्हाला व्याज द्यावे लागेल. म्हणजेच काय तर अतिरिक्त कर्जाचा बोजा तुमच्यावर पडणार नाही, व पैशांची बचत देखील होईल.

संबंधित बातम्या

Crypto Credit Card : जगातील पहिले क्रिप्टो क्रेडिट कार्ड बाजारात; बिनव्याजी करा वापर

कोरोनाच्या दुसऱ्या लाटते राज्यात सर्वाधिक दारू विक्री, गेल्या तीन वर्षांचा रेकॉर्ड तोडला; तरीही महसुलात घट

आज पुन्हा सीएनजी, पीएनजीचे दर वाढले; देशातील सर्वात महाग सीएनजी गुरुग्राममध्ये