Vehicles Prices Increases : का होत आहेत चारचाकी वाहने महाग? चारचाकी घ्यायचे आहे? त्याआधी हे वाचा

अस्लम अब्दुल शानेदिवाण, Tv9 मराठी

|

Updated on: Apr 13, 2022 | 7:40 PM

Vehicles Prices Increases : कोरोनामुळे (Corona) अनेकांच्या रोजीरोटीसह उद्योगधंद्यावर देखील परिणाम झाला होता. त्यामुळे अनेकांच्या जगण्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. अनेकांचा सुखी परिवाराच्या स्वप्नांचा चुराडा झाला होता. मनात असूनही चारचाकी वाहन घेता येत नव्हती. मात्र आता कोरोनाचे संकट निवळले आहे. अनेकांचे उद्योग सुरू झाले आहेत. नोकऱ्यांचा (jobs) प्रश्न मार्गी लागला आहे. त्यामुळे आवाक्याबाहेर गेलेले चारचाकी […]

Vehicles Prices Increases : का होत आहेत चारचाकी वाहने महाग? चारचाकी घ्यायचे आहे? त्याआधी हे वाचा
Image Credit source: TV9

Vehicles Prices Increases : कोरोनामुळे (Corona) अनेकांच्या रोजीरोटीसह उद्योगधंद्यावर देखील परिणाम झाला होता. त्यामुळे अनेकांच्या जगण्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. अनेकांचा सुखी परिवाराच्या स्वप्नांचा चुराडा झाला होता. मनात असूनही चारचाकी वाहन घेता येत नव्हती. मात्र आता कोरोनाचे संकट निवळले आहे. अनेकांचे उद्योग सुरू झाले आहेत. नोकऱ्यांचा (jobs) प्रश्न मार्गी लागला आहे. त्यामुळे आवाक्याबाहेर गेलेले चारचाकी चे स्वप्न साकार होण्याच्या मार्गावर आहे. कोरोनाआधी आणि कोरोना काळात रस्त्यावर आपल्याला लहान चारचाक्या पहायला मिळत होत्या. पण आता रस्त्यावर लहान चारचाकी (four wheeler) गाड्यांपेक्षा मोठ्या गाड्यांची झलक पहायला मिळत आहे. 2018-2019 चेच बालायचे झाल्यास रस्त्यावर 26 टक्के गाड्या या लहान होत्या. मात्र मागील वर्षभरात ही टक्केवारी घसरून 10 टक्क्यांवर आली आहे. हो 10 टक्क्यांवर. लहान चारचाकी म्हणजे जी 5 लाखांच्या आत येते. जी घेण्यासाठी दुचाकीवरून फिरणारे स्वप्न पहातात. फक्त वाट पहातात ती म्हणजे डाऊन पेंमेंट (Down payment) किती मिळते किंवा फडीचा कालावधी कधी संपणार. मात्र कोरोना काळात सगळ्याच आशाआकांक्षा पाण्यात गेल्या. सगळे सुरळीत झाले असून चारचाकी घेण्याचे स्वप्न साकार होणार असलेतरिही लहान चारचाकींसह मोठ्या ही गाड्यांच्या किंमती वाढल्या आहेत. या मागचे नेमके कारण काय? हे ही जाणून घ्यायला हवे.

रशिया-युक्रेनच्या युद्धाचा फटका

याच्याआधी सर्वसामान्य हे आपल्या बोलण्यात देखील चारचाकीचा उल्लेख हा सहज करायाचे. ते चारचाकी काय घेता येईल फक्त त्यांच्या किंमती कमी होऊ द्या असे म्हणायचे. पण सध्या सगळ्यांच्याच बाबतीत असंच होताना दिसत आहे. गाड्यांच्या किंमत काही कमी होताना दिसत नाही आणि गाडी काही दारावर येत नाही, असेच काहीसे चित्र सध्या सगळीकडे पहायला मिळत आहे. रशिया-युक्रेन युद्ध हे देखील यामागचे कारण आहे. या युद्धामुळे लोखंड आणि क्रुड ऑईलच्या किंमती झपाट्याने वाढत आहेत. ज्यामुळे वाहनांच्या किंमती वाढल्या आहे. देशातील वाहन उद्योगातील सर्वात मोठी कंपनी मारूतीने या वर्षी 3 वेळा नफा कमावला आहे. जानेवारी 2021 ते मार्च 2022 या कालावधीत वाहनांच्या किंमतीत 8.8 टक्क्यांनी वाढल्या आहेत. 2019-20 मध्ये एकूण 27,73,519 चारचाक्या गाड्यांची विक्री झाली होती. हाच आकडा 2018-19 मध्ये 33,77,389 होता. याचा अर्थ असाच आहे की कोरोनाच्या आधीच मंदीची झळ वाहन उद्योगाला बसली होती. मात्र सरकारकडून ओला-उबेर कडे बोट दाखवणे सुरू होते.

वेटिंग वाढले

कोरोना संपला आणि लोक आपल्या वाहनाच्या स्पप्नाकडे धावू लागले. मात्र यावेळी शोरूम बाहेर बोर्ड दिसू लागले ते वेटिंगचे. XUV700 घेण्यासाठी तब्बल दीड वर्षांचे वेटिंग आहे. Kia Carens साठी एक वर्ष, Thar साठी आठ महिने आणि Creta साठी 9 महिने आहे.

वाहनांच्या निर्मितीवर परिणाम

प्रत्येक ठिकाणी कारण सारखेच आहे. चारचाकीमध्ये वापरण्यात येणारी चीप च्या कमतरतेमुळे वाहनांच्या निर्मितीवर परिणाम होत आहे. हे चित्र बदलण्यासाठी अजून किमान 1 वर्ष लागेल. सध्या लहान गाच्यांची मागणी कमी आहे. मात्र मोठ्या गाड्यांच्या मागणीत सुधार आहे. 10 लाखांच्या वरच्या गाड्यांची खरेदीत वाढ होऊन ती 5 टक्क्यांवरून 11 टक्के झाली आहे. याच टप्यावर TATA मोटर्स Hyundai तो टक्कर देत आहे. tata nexon ची सगळ्यात जादा विक्री झाली असून 5 पैकी 2 गाड्या या TATA च्या आहेत. पहिली tata nexon आहेत. तर दुसरी Punch, Venue आणि Creta या विक्रीत आहेत. तर दुसरीकडे कोरोनाचा फटका सगळ्यात जास्त मध्यम वर्गाला बसल्याने लहान चारचाकी गाड्यांचा बाजार बसला आहे. त्यामुळे Maruti चे नुकसान झाले आहे. 2019 चा विचार केल्यास त्यावेळी बाजारात Maruti ची टक्केवारी ही 51 टक्के होती ती 2022 मध्ये 43 टक्क्यांवर आली आहे. याचा अर्थ हाच होती की, लहान गाड्या गेणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. तर ज्यांची कुवत 10 लाखांच्या वरची गाडी घेण्याची आहे त्यांना गाडी मिळत नाही. हे सगळे कोरोनामुळे तर मागील तीन वर्षांतील उद्योगाच्या स्थितीमुळे झाली आहे.

इतर बातम्या : 

सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, निफ्टी 17500 वर बंद

Uber कडून भाडेवाढ जारी, 10 किलोमीटरसाठी मोजावे लागतील ‘इतके’ पैसे!

‘लाँचिंग’ च्या आधीच रस्त्यावर धावतांना दिसली ‘किया ईव्ही’ कार

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI