AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uber कडून भाडेवाढ जारी, 10 किलोमीटरसाठी मोजावे लागतील ‘इतके’ पैसे!

सीएनजीच्या वाढत्या किमतींपासून भागीदार चालकांना दिलासा देण्यासाठी उबरने दिल्ली-एनसीआरमधील कॅबचे भाडे वाढवले आहे. याचा तुमच्या खिशावर किती परिणाम होणार आहे याबबाबत जाणून घ्या सविस्तर...

Uber कडून भाडेवाढ जारी, 10 किलोमीटरसाठी मोजावे लागतील 'इतके' पैसे!
Uber चा प्रवास होणार सुखद
| Updated on: Apr 13, 2022 | 6:42 PM
Share

नवी दिल्ली : दिल्ली-एनसीआरमध्येही सीएनजीच्या दरात (CNG Rates) सातत्याने वाढ होत आहे. अशा परिस्थितीत उबरने (Uber) आपल्या कॅब सेवेचे भाडे वाढवले आहे. या संदर्भात उबरचे दक्षिण आशिया आणि भारत प्रमुख नितीश भूषण यांनी सांगीतले की, कंपनी आपल्या चालकांचा विचार करीत, हा निर्णय घेत आहे. चालकांना मदत करण्यासाठी कंपनी दिल्ली-एनसीआरमध्ये ट्रिपच्या दरात 12 टक्क्यांनी वाढ करत आहे. आम्ही सतत वाढत जाणाऱ्या इंधनाच्या किमतींवर लक्ष ठेवू आणि गरज पडल्यास आणखी निर्णय घेऊ, असेही ते म्हणाले. उबरने यापूर्वी मुंबईत 15% भाडे वाढवले (Rent increased) आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये सीएनजीच्या किमती गेल्या काही दिवसांमध्ये प्रति किलो 12 रुपयांनी वाढल्या आहेत.

दिल्ली-एनसीआरमध्ये सीएनजीची किंमत

दिल्लीत ‘सीएनजी’ चा पुरवठा करणारी कंपनी इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (IGL) ने दिल्लीत सीएनजीची किंमत 69.11 रुपये प्रति किलो इतकी केली आहे. नोएडा, ग्रेटर नोएडा, गाझियाबादमध्ये त्याची किंमत 71.47 रुपये आणि गुरुग्राममध्ये 77.44 रुपये प्रति किलो आहे.

भाडेवाढ ‘मूळ भाड्यावर’ नाही

Uber चे भाडे 12% ने वाढवल्यानंतर, तुम्हाला वाटेल की ज्या ट्रिपला आधी 100 रुपये भाडे लागत होते, ते आता 112 रुपये द्यावे लागतील. पण घाबरण्याची गरज नाही. प्रत्यक्षात असे काहीही होणार नाही. याबाबत, Uber ने स्पष्ट केले आहे की, किमतीतील वाढ एकूण भाड्यावर नव्हे तर, ट्रिपच्या मूळ भाड्यावर मोजली जाणार आहे. एकूण भाड्यावर कर, प्रतीक्षा वेळ आणि अनेक भिन्न घटक काम करतात. तसेच, भाडेवाढीचा ‘पीक अवर्स’ मध्ये वाढीच्या किमतीशी काहीही संबंध नाही.

नक्की किती रुपयांची भाडेवाढ?

दिल्लीच्या लक्ष्मी नगर ते करोलबाग या सिंगल साईड ट्रिपवरुन तुम्हू समजून घ्या. दोन ठिकाणांमधील अंतर सुमारे 10 किमी आहे. या मार्गावरील UberGo च्या सेवेची सध्याची किंमत सध्या 46.50 रुपये आहे. असे असताना भाडे 12 टक्क्यांनी वाढले आहे. जर यातून 12 टक्के कपात केली तर मूळ भाडे 41.25 रुपये असेल. म्हणजेच तुमच्या राईडचे मूळ भाडे केवळ 5 रुपयांनी वाढले आहे. यामध्ये बुकिंग फी आणि जीएसटी जोडण्यात येणार आहे. UberGo साठी तुम्हाला द्यावे लागणारे किमान भाडे 91.50 आहे.

इतर बातम्या

वाहन प्रवास सुकर होणार! रस्त्यांवरील टोल आणि टॅक्सची माहिती Google Maps वर

Top 5 Electric Scooters: ओला आणि हिरोसह ‘या’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर्सना भारतीय ग्राहकांची पसंती

3 लाखांहून कमी किंमतीत सेकेंड हँड कार, जाणून घ्या कुठे मिळतायत शानदार ऑफर्स

इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.