बँकिंगमध्ये व्याज दरवाढीची लाट: जाणून घ्या- SBI, HDFC आणि कोटक महिंद्राचे नवे दर

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI FD RATES), एचडीएफसी बँक (HDFC FD RATES) आणि कोटक महिंद्रा बैंक (KOTAK BANK FD RATES) या तीन बँकांनी फिक्स्ड डिपॉजिट वरील व्याज (fixed deposit interest rates) दरात वाढीची घोषणा केली आहे.

बँकिंगमध्ये व्याज दरवाढीची लाट: जाणून घ्या- SBI, HDFC  आणि कोटक महिंद्राचे नवे दर
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jan 20, 2022 | 8:12 PM

नवी दिल्ली- देशांतर्गत बँकिंग क्षेत्रात ठेवींवरील व्याज दरवाढीची स्पर्धा सुरू झाली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI FD RATES), एचडीएफसी बँक (HDFC FD RATES) आणि कोटक महिंद्रा बैंक (KOTAK BANK FD RATES) या तीन बँकांनी फिक्स्ड डिपॉजिट वरील व्याज (fixed deposit interest rates) दरात वाढीची घोषणा केली आहे. बँकिंग क्षेत्रात वाढत्या ठेवींमुळे तेजीचं वातावरण दिसून येत असल्याचे बँकिंग तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे बँकांनी फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याज दरात वाढ केली आहे. अन्य बँकांतही व्याज दरवाढीची लाट येण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, ठेवीदारांना अद्याप काही दिवस यासाठी प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया

SBI च्या वेबसाईटवर स्टेट बँकेचे सुधारित व्याजदर प्रकाशित करण्यात आले आहे.

• दोन कोटींपर्यंतच्या दोन वर्षांपेक्षा कमी मॅच्युरिटी कालावधीच्या एफडीवर 0.10 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. • 15 जानेवारी 2022 पासून या कालावधीसाठीच्या ठेवींवर प्रति वर्ष 5.10 (पूर्वी 5%) टक्के व्याजदर असेल. ज्येष्ठ नागरिकांना समान कालावधीच्या एफडीवर प्रति वर्ष 5.60 (पूर्वी 5.5%) टक्के व्याजदर असेल.

एचडीएफसी बँक:

स्टेट बँकेप्रमाणे एचडीएफसीने सुधारित व्याजदर वेबसाईटवर प्रकाशित केले आहेत. 12 जानेवारी 2022 पासून नवीन व्याजदराची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.

• एचडीएफसीने दोन कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या ठेवींवर व्याजदरात 0.05-0.1 टक्के वाढ केली आहे. • दोन ते तीन वर्ष कालावधीसाठी- 5.2% • तीन ते पाच वर्ष कालावधीसाठी- 5.4% • पाच वर्ष ते दहा वर्ष कालावधीसाठी- 5.6%

कोटक महिंद्रा बँक:

स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एचडीएफसी सोबत व्याज दरांची फेररचना करणारी कोटक महिंद्रा तिसऱ्या क्रमांकाची बँक ठरली आहे. नव्या एफडीसोबत यापूर्वी केलेल्या एफडीसाठी सुधारित व्याजदर लागू असणार आहे.

• कोटक महिंद्रातील 7 ते 30 दिवसांच्या ठेवीवर 2.5% व्याज मिळेल • 31-90 दिवसांच्या ठेवींवर 2.75% व्याज असेल • 91-120 दिवसांच्या ठेवींवर 3% व्याज मिळेल.

तज्ज्ञांचे अनुभवाचे बोल:

गुंतवणूक सल्लागारांच्या मते, मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करताना दीर्घ मुदतीत गुंतवणूक करण्याऐवजी अल्प मुदतीचा विचार करावा. त्यामुळे व्याजदर वाढीचा तुम्हाला फायदा होईल. दीर्घ मुदतीत रक्कम गुंतलेली असल्याने ती काढल्यास दंडही भरावा लागतो. त्यामुळे अल्प मुदतीची ठेव निवडणे फायद्याचे ठरते. कोरोनाचे नवे नवे रुप आणि व्हेरियंट बघायला मिळत असल्याने मनी 9 च्या सल्ल्यानुसार, व्याजदर हळूहळू वाढतील. गुंतवणुकदारांनी गुंतवणूक करताना महागाईची ही विचार करणे आवश्यक आहे. तुमच्या गरजा भागल्यानंतर उरलेल्या रक्कमेतून गुंतवणूक करणे हितकारक असेल.

Non Stop LIVE Update
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.