म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचा काय आहे पर्याय? SIP की एक रक्कमी गुंतवणूक फायद्याची

म्युचुअल फंडात एकरक्कमी गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाचा शेअर बाजाराचा चांगला अभ्यास असायला हवा, दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीत तुम्ही केव्हापण एकरक्कमी गुंतवणूक करु शकता.

म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचा काय आहे पर्याय? SIP की एक रक्कमी गुंतवणूक फायद्याची
म्युच्युअल फंडImage Credit source: social
Follow us
| Updated on: Mar 09, 2022 | 9:23 AM

अगदी काही महिन्यांपूर्वी शेअर बाजारात नवीन उच्चांक प्रस्थापित होत होते. त्यावेळी भारतीय शेअर बाजाराचा दबदबा वाढला होता. गुंतवणुकदारांमध्ये उत्साह होता. परंतु आंतरराष्ट्रीय घडामोडींचा प्रभाव स्पष्ट जाणवू लागला आणि भारतीय बाजारावर दबाव आला. निफ्टी (Nifty) उच्चांकी स्तरापेक्षा 15 टक्क्यांहून अढळस्थानी पोहचला आहे. परिणामी इक्विटी म्युचुअल फंड (Equity Mutual Fund) अथवा शेअर बाजारात थेट गुंतवणुक करणा-या गुंतवणुकदारांना फटका बसला आहे. त्यांच्या पोर्टफोलियोतही घसरण झाली आहे. त्यांची गुंतवणूक रक्कम घटली आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या पुढ्यात काय पर्याय असेल बरं, याचा आपण विचार करुयात. ईटी मनीचे अर्थतज्ज्ञ संतोष नवलानी यांच्या मतानुसार, ही घसरणच दीर्घकालीन गुंतवणुकदारांसाठी फायदेशीर आहे. त्यांनी या पडत्या काळात केलेली गुंतवणूक भविष्यात मोठा परतावा देऊ शकतो. गुंतवणुकदारांनी शेअरच्या किंमतीत अथवा म्युच्यअल फंडाच्या NAV मधील घसरणीने घाबरुन जाऊ नये. त्यांनी गुंतवणूक वाढवावी. त्यांना अ‍ॅड ऑनचा (Add On) पर्याय उपलब्ध आहे.

अधिक फायदा कशात?

गुंतवणुकदारांला नेहमी एक प्रश्न भांडावून सोडतो, तो म्हणजे पद्धतशीर नियमीत गुंतवणूक अर्थात एसआयपीद्वारे गुंतवणूक करावी की एकरक्कमी गुंतवणूक करुन मोकळे व्हावे. मग या दोघांचे फायदे नेमके काय आहे हे पण कळायले हवेत. प्रत्येकाच्या गुंतवणुकीचे प्रकार वेगळे असतात. SIP मध्ये गुंतवणुकदार दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवणूक करतो, ती ठरलेल्या वेळेला दर महिन्याला वळती होते.

एसआयपी म्हणजे काय?

SIP म्हणजे स्वंयअर्थशिस्त असलेली गुंतवणूकच म्हणा ना. त्याला इंग्रजीत सिस्टेमॅटीक इन्व्हेसमेंट प्लॅन म्हणतात. याचा मुख्य फायदा म्हणजे बाजारातील उलाढालीचा एकदम फटका गुंतवणुकदाराला बसत नाही. यात बाजारातील धोक्याचा कमी फटका बसतो. SIP मासिक, त्रैमासिक, सहामही अथवा वार्षिक असते. ही गुंतवणूक स्वयंचलित करता येते. त्याचा पर्याय निवडल्यास महिन्याच्या एका विशिष्ट तारखेला तुमची मासिक ठरलेली रक्कम वळती होते. त्यासंबंधीचे अलर्ट तुम्हाला आगाऊ एसएमएस अथवा ई-मेलद्वारे मिळते. SIP चा आणखी एक फायदा हा असतो की, ज्यावेळी बाजार घसरणीच्या वळणावर असतो. तेव्हा SIP द्वारे केलेल्या गुंतवणुकीत जास्त युनिट खरेदी केले जातात. NAV चा दर वाढीव असेल तर सहाजिकच कमी युनिट खरेदी करण्यात येतील. परंतु दीर्घ कालीन गुंतवणुकीत तुम्हाला चांगला परतावा मिळेल यात शंका नसावी. तुम्हाला कम्पाऊंडिंगचा फायदा मिळतो. SIP म्हणजे एकप्रकारची म्युचुअल फंडातील आवर्ती ठेव योजनाच आहे. दुसरीकडे एकरक्कमी गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला बाजाराची चागंली समज आणि अभ्यास असायला हवा. हवेत गप्पा मारणा-यांचे व्हिडिओ बघून तुम्ही एकरक्कमी गुंतवणूक केल्यास तुमचे नुकसान होऊ शकते. बाजारात घसरणीच्या सत्रानंतर तेजीचे संकेत असेल तेव्हा ही गुंतवणूक फायदेशीर ठरते.

संबंधित बातम्या

Fuel : कच्च्या तेलाचा आगडोंब, भाव 130 डॉलरच्या उंबरठ्यावर! पेट्रोल सव्वाशेपार जाणार?

SHARE MARKET TODAY: 4 दिवसांच्या घसरणीला ब्रेक! सेन्सेक्समध्ये 600 अंकांची वाढ

Share Market | शेअर बाजारात शुगर स्टॉक्सचा गोडवा, 20 टक्क्यांची तेजी! गुंतवणूकदारांच्या खरेदीसाठी उड्या

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.