Share : केवळ 10 रुपयांचा शेअर, कमाई छप्परफाड, 400 टक्के दिला परतावा..

Share : केवळ 10 रुपयांच्या या शेअरने गुंतवणूकदारांना काही दिवसातच मालामाल केले..

Share : केवळ 10 रुपयांचा शेअर, कमाई छप्परफाड, 400 टक्के दिला परतावा..
शेअरने केली कमालImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 10, 2022 | 8:02 PM

नवी दिल्ली : शेअर बाजारात (Share Market) अनेक पेनी स्टॉक्स (Penny Stocks) आहेत. त्यातील काहींनी तर टिकाकारांनाही तोंडात बोटं घालायला लावली आहे. जबरदस्त कामगिरीमुळे हे शेअर मल्टिबॅगर (Multibagger) ठरले आहेत. अशाच एका मल्टिबॅगर शेअरने गुंतवणूकदारांना (Investors) अवघ्या काही दिवसातच मालामाल केले आहे.

Vintage Coffee and Beverages असे या पेनी शेअरचे नाव आहे. या कंपनीने बाजारात कमाल केली. अवघ्या 10 रुपयांच्या या शेअरने बाजारात जोरदार कामगिरी बजावली आहे. दोन वर्षांत शेअरने गुंतवणूकदारांना 400 टक्क्यांचा परतावा दिला आहे.

Vintage Coffee and Beverages च्या स्टॉकमध्ये गेल्या दीड महिन्यात मोठी विक्री दिसून येत आहे. हा शेअर या 21 सप्टेंबर रोजी त्याच्या उच्चत्तम पातळीवर 104.85 रुपयांवर बंद झाला होता. ही 52 आठवड्यातील सर्वोत्तम कामगिरी होती.

हे सुद्धा वाचा

त्यानंतर या शेअरमध्ये सातत्याने घसरण सुरु आहे. 52 आठवड्यातील सर्वोत्तम कामगिरी बजावल्यानंतर या शेअरमध्ये पडझड झाली. सध्या हा शेअर 53 रुपयांवर आहे. त्याचा पोर्टफोलिओ तपासून तुम्हाला गुंतवणुकीचा निर्णय घेता येईल.

या शेअरमध्ये 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीच्या 50 टक्के घसरण नोंदविण्यात आली आहे. पण गेल्या दोन वर्षांचा विचार करता या शेअरने कमाल केली आहे. हा शेअर 10 रुपयांहून थेट 53 रुपयांवर पोहचला आहे.

म्हणजे या शेअरने आतापर्यंत गुंतवणूकदारांना 400 टक्क्यांचा परतावा दिला आहे. दोन वर्षांपूर्वी या शेअरचा भाव केवळ 10 रुपये होता. 2 ऑक्टोबर 2020 रोजी या शेअरचा भाव सर्वात कमी होता.

स्मॉल कॅप एसएमई Vintage Coffee and Beverages या कंपनीला रशिया आणि अन्य देशांकडून तब्बल 21 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. कॉपीच्या निर्यातीसाठी कंपनीला ही मोठी ऑर्डर मिळाली आहे.

सप्टेंबरच्या तिमाहीत या कंपनीने तब्बल 3000 टक्के वृद्धी नोंदवत, 30.31 कोटींचा निव्वळ नफा कमविला आहे. या कंपनीच्या विक्रीत वाढ झाली आहे. विक्रीत 3283 टक्क्यांची वाढ झाली आहे. या कंपनीचे बाजारातील मूल्य 369 कोटी रुपये आहे.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.