AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘हा’ व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार 35 टक्के भांडवल देणार, महिन्याला कमवाल एक लाख रुपये

Poultry Farming | पाच ते नऊ लाख रुपयांच्या भांडवलात तुम्हाला हा व्यवसाय सुरु करता येईल. अगदी लहान स्तरावर म्हणजे 1500 कोंबड्यांपासून हा व्यवसाय सुरु केला तरी तुम्ही महिन्याला लाखभराच्या आसपास उत्पन्न मिळवू शकता.

'हा' व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार 35 टक्के भांडवल देणार, महिन्याला कमवाल एक लाख रुपये
कुक्कुटपालन
| Edited By: Rohit Dhamnaskar | Updated on: Aug 21, 2021 | 11:19 AM
Share

मुंबई: तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल आणि एखादा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर शेतीपुरक उद्योगांमधून तुम्ही चांगली कमाई करू शकता. या क्षेत्रात शेतीच्या तुलनेत अधिक कमाईची हमी असते. ग्रामीण भागात जोडधंदा म्हणून हमखास केला जाणारा व्यवसाय म्हणजे कुक्कुटपालन. कुक्कुटपालनाचा व्यवसाय तुलनेत कमी जोखमीचा असून यामधून तुम्ही बक्कळ पैसेही कमावू शकता.

पाच ते नऊ लाख रुपयांच्या भांडवलात तुम्हाला हा व्यवसाय सुरु करता येईल. अगदी लहान स्तरावर म्हणजे 1500 कोंबड्यांपासून हा व्यवसाय सुरु केला तरी तुम्ही महिन्याला लाखभराच्या आसपास उत्पन्न मिळवू शकता.

किती खर्च येतो?

कुक्कुटपालनासाठी तुम्हाला मोठ्या जागेची आवश्यकता असते. त्यानंतर कोंबडीची पिल्लं विकत घेण्यासाठी साधारण पाच ते सहा लाखांचा खर्च येतो. 1500 कोंबड्यांचे लक्ष ठेवले तर तुम्हाला 10 टक्के जास्त पिल्लं खरेदी करावी लागतील. कोंबड्यांच्या विक्रीसोबतच तुम्ही अंडी विकूनही पैसे कमावू शकता.

दरवर्षी 30 लाखापर्यंत कमाई

सलग 20 आठवडे कोंबड्यांच्या देखभालीचा खर्च एक ते दीड लाख रुपये इतका होतो. कोंबड्यांची एक बॅच वर्षभरात साधारण 300 अंडी देते. 20 आठवड्यानंतर कोंबड्या अंडी द्यायला सुरवात करतात. तुमच्याकडे 1500 कोंबड्या असतील तर 290 अंड्यांच्या हिशेबाने वर्षाला 4, 35,000 अंडी मिळतील. यापैकी चार लाख अंडी विकली तरी तुम्ही चांगली कमाई करू शकता.

सरकारकडून 35 टक्के अनुदान

कुक्कुटपालनाच्या व्यवसायासाठी बिझनेस लोनवर 25 टक्के अनुदान मिळते. तर अनुसूचित जाती-जमातीच्या व्यक्तींना या व्यवसायासाठी 35 टक्के अनुदान दिले जाते. त्यामुळे भांडवल उभारण्याचा भार हलका होतो.

संबंधित बातम्या:

शेतीमधल्या नव्या वाटा, धानासाठी प्रसिद्ध गोंदियात फुलतेय ड्रॅगन फ्रुटची शेती, लाखोंची कमाई

सोयाबीनला विक्रमी झळाळी, क्विंटलचा दर 9 हजारांच्या पार, उच्चांकी दराचा फायदा नेमका कुणाला?

Drumstick Farming: एकदाच 50 हजाराची गुंतवणूक करा आणि दहा वर्षांपर्यंत खोऱ्याने पैसे कमवा

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?