शेअर मार्केटमध्ये टीसीएसच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका; अवघ्या काही मिनिटांत 1 लाख कोटी बुडाले

| Updated on: Oct 11, 2021 | 12:29 PM

Share Market | TCS ने जुलै-सप्टेंबर तिमाहीत 9,624 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढून 46,867 कोटी रुपये झाला आहे, तर निव्वळ मार्जिन 20.5 टक्क्यांवर पोहोचला आहे. तिमाही निकाल पाहता, कंपनीच्या बोर्डाने कंपनीच्या 1 रुपयांच्या प्रत्येक इक्विटी शेअरसाठी 7 रुपयांचा अंतरिम लाभांश जाहीर केला.

शेअर मार्केटमध्ये टीसीएसच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका; अवघ्या काही मिनिटांत 1 लाख कोटी बुडाले
टीसीएस
Follow us on

मुंबई: देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) च्या शेअर्समध्ये सोमवारी मोठी घसरण नोंदवण्यात आली. बीएसईवर टीसीएसचा समभाग जवळपास 7 टक्क्यांनी खाली घसरला. चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीत महसूलात घट झाल्याने टीसीएसच्या समभागात घसरण झाल्याचे समजते. या घसरणीमुळ टीसीएसचे भांडवली बाजारातील मूल्य 14,55,687 कोटी रुपयांवरून 13,62,564 कोटी रुपयांपर्यंत खाली आले आहे.

TCS ने जुलै-सप्टेंबर तिमाहीत 9,624 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढून 46,867 कोटी रुपये झाला आहे, तर निव्वळ मार्जिन 20.5 टक्क्यांवर पोहोचला आहे. तिमाही निकाल पाहता, कंपनीच्या बोर्डाने कंपनीच्या 1 रुपयांच्या प्रत्येक इक्विटी शेअरसाठी 7 रुपयांचा अंतरिम लाभांश जाहीर केला. हा लाभांश 3 नोव्हेंबर 2021 रोजी इक्विटी भागधारकांना दिला जाईल.
टीसीएसने सांगितले की, कंपनीने सप्टेंबर तिमाहीत एकूण 19690 कर्मचाऱ्यांची भरती केली. कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची एकूण संख्या आता 528748 झाली आहे. कंपनीने पहिल्या सहामाहीत 43 हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकऱ्या देण्यात आल्या आहेत.

7 टक्क्यांची घसरण

कमकुवत निकालांमुळे सोमवारच्या व्यवहारात हा शेअर बीएसईवर 6 टक्क्यांपर्यंत घसरला. शुक्रवारी हा स्टॉक 3935.30 रुपयांच्या किंमतीवर बंद झाला होता. आज कमकुवत सुरुवातीनंतर समभागाची किंमत 3660 रुपयांच्या नीचांकावर आली. सध्या हा समभाग 5.50 टक्के घसरणीसह 3719 रुपयांच्या किंमतीवर व्यवहार करत आहे.

शेअरची पातळी खालावल्याने गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला. त्यांची संपत्ती 1 लाख कोटी रुपयांपेक्षा कमी झाली आहे. स्टॉकमध्ये घसरण झाल्यामुळे कंपनीचे मार्केट कॅप 14,55,687 कोटी रुपयांवरून 13,62,564 कोटी रुपयांवर आले. CLSA ने TCS वर आऊटफॉर्म रेटिंग दिले आहे. आगामी काळात कंपनीच्या समभागाची किंमत 4,050 रुपयांवर जाण्याचा अंदाज वर्तवला आहे.

इतर बातम्या:

Petrol Diesel Price: सणासुदीच्या तोंडावर पेट्रोल-डिझेलची सुस्साट दरवाढ; सलग सातव्या दिवशी इंधनाच्या किंमती वाढल्या

आधार कार्डामुळे फसवणूक टाळायची असल्यास लवकर हा क्रमांक अपडेट करा, अन्यथा…

पॅनकार्ड हरवल्यास काय कराल, जाणून घ्या नवं पॅनकार्ड मिळवण्याची संपूर्ण प्रक्रिया