AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NPS चा नियम बदलणार, आता निवृत्तीनंतर पहिल्यापेक्षा जादा रक्कम मिळणार

जून 2024 पर्यंत अटल पेन्शन योजनेत समाविष्ट होणाऱ्या पेन्शनधारकांची एकूण संख्या 6.62 कोटीचा टप्पा ओलांडण्याची शक्यता असल्याचेही पीएफआरडीए अध्यक्ष दीपक मोहंती यांनी सांगितले.

NPS चा नियम बदलणार, आता निवृत्तीनंतर पहिल्यापेक्षा जादा रक्कम मिळणार
New pension planImage Credit source: TV9MARATHI
| Updated on: Jun 23, 2024 | 5:15 PM
Share

नवीन पेन्शन योजना लागू होणार आहे. यात नवीन फंडात गुंतवणूकीचा पर्याय मिळणार आहे. पेन्शन फंड रेग्युलेटरी ॲण्ड डेव्हलपमेंट अथॉरिटीने ( PFRDA – Pension Fund Regulatory and Development Authority ) नवीन पेन्शन योजना तरुणांसाठी आकर्षक बनविण्याची तयारी सुरु केली आहे. यासाठी अथॉरिटी न्यू बॅलस्ड लाईफ सायकल नावाने एका फंड योजनेचा समावेश करणार आहे. यात निवृतीपर्यंत कर्मचाऱ्यांना चांगली रक्कम मिळणार आहे. पीएफआरडीएच्या या प्रस्तावित योजनेअंतर्गत, दीर्घ कालावधीसाठी इक्विटी फंडांमध्ये म्यॅच्युरिटीची रक्कम अधिक वाटप केली जाऊ शकते. या योजनेनूसार 45 वर्षांनंतर इक्विटी फंडात सरकार कमी गुंतवणूक करीत जाणार आहे. आता 35 वर्षांनंतरच सरकार गुंतवणूक कमी करत असते.

न्यू बॅलेंस्ड लाइफ सायकल फंडची योजना

एनपीएस ( National Pension System ) संदर्भात पेन्शनधारकांना 45 वर्षांपर्यंत इक्वीटी फंडात अधिक गुंतवणूक रक्कम वाटप करण्याची सुविधा मिळेल. यातून कर्मचाऱ्यांना निवृत्तीपर्यंत एक चांगला फंड तयार करता येईल. आम्ही दुसऱ्या तिमाहीत ( जुलै-सप्टेंबर ) दीर्घ कालावधीसाठी इक्विटी शेअर फंडातील गुंतवणूकीचे वाटप करण्यासाठी ‘न्यू बॅलस्ड लाईफ सायकल फंड’ सुरू करणार आहोत. त्याने दीर्घ कालावधीसाठी इक्विटी फंडांमध्ये अधिक रक्कम वाटप करण्यास परवानगी मिळेल असे पीएफआरडीएचे चेयरमन दीपक मोहंती यांनी सांगितले.

असा फायदा होईल

NPS च्या या नवीन योजनेअंतर्गत वयाच्या 45 व्या वर्षापासून इक्विटी गुंतवणुकीत हळूहळू कपात केली जाईल, सध्या ही कपात वयाच्या 35 व्या वर्षांपासून सुरू होते. असे झाल्यास, NPS ची निवड करणारे लोक दीर्घकाळासाठी इक्विटी फंडांमध्ये अधिक रक्कम गुंतवू शकतील. यामुळे दीर्घकाळात पेन्शन फंडात वाढ होईल आणि जोखीम आणि परतावा यांच्यातील समतोल देखील निर्माण होईल.

अटल पेन्शन योजनेचा संदर्भ

गेल्या आर्थिक वर्षात 2023-24 मध्ये अटल पेन्शन योजनेत 1.22 लाख नवी अंशधारक जोडले गेले आहेत. योजना झाल्यानंतर कोणत्याही एका वित्तीय वर्षात झालेली ही सर्वाधिक वाढ आहे. त्यांनी आर्थिक वर्षांत 1.3 कोटी पेन्शनधारकांना या योजनेशी जोडले जाण्याची आशा आहे.

Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता