आजपासून बदलनार ‘हे’ सहा नियम, …तर बसू शकतो मोठा आर्थिक फटका

| Updated on: Dec 01, 2021 | 6:15 AM

आजपासून बँकिंग आणि आर्थिक व्यवहारासंबंधीचे काही नियम बदलत आहेत. नव्या नियमांमुळे ग्राहकांना काही प्रमाणात आर्थिक झळ बसू शकते.

आजपासून बदलनार हे सहा नियम, ...तर बसू शकतो मोठा आर्थिक फटका
संग्रहित छायाचित्र
Follow us on

नवी दिल्ली : आजपासून वर्षाचा शेवटचा महिना अर्थात डिसेंबर महिन्याला सुरुवात झाली आहे. हा वर्षाचा शेवटचा महिना असल्याने याला तसे विशेष महत्त्व असते. याच महिन्यात अनेक निर्णय घेतले जातात व या निर्णयांची अंमलबजावणी नवीन वर्षी  एक जानेवारीपासून करण्यात येते. मात्र असे देखील  काही निर्णय आहेत, जे आजपासून लागू  झाले आहेत. या निर्णयांमुळे काही प्रमाणात सर्वसामान्य ग्राहकांना आर्थिक झळ बसू  शकते. जाणून घेऊयात सर्वसामान्यांशी निगडीत नेमक्या कोणत्या नियमांत बदल करण्यात आले आहेत? त्याचा आपल्या दैनंदीन जीवनावर कसा परिणाम होणार आहे.

यूएएन-आधार  लिंकिंग 

सर्वात महत्त्वाचे म्हणजे आजपासून पीएफ बाबत नवीन निमय लागू होणार आहे. पीएफ खात्यात जमा करण्यासाठी ईपीएफओने कर्मचाऱ्यांना आधार आपल्या यूएएन नंबर लिंक करण्यास सांगितले होते. त्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र आता ही मुदत संपली असून, आजापासून नवीन नियम लागू झाला आहे. नवीन नियमानुसार जर तुमचे आधार यूएएनला लिंक नसेल तर तुमच्या खात्यावर पीएफ जमा होणार नाही.

सात लाखांचा विमाही जाणार

जर तुमचे आधार कार्ड यूएएनला लिंक नसेल तर तुमचे आणखी एक मोठे नुकसान होऊ शकते, एप्लॉईज डिपॉझिट लिंक्ड विम्यासाठी देखील ईपीएफओकडून आधार लिंक सक्तीचे करण्यात आले आहे. जर तुमचे आधार कार्ड लिंक नसेल तर विम्याचा हप्ता देखील आजपासून रोखन्यात येणार आहे. त्यामुळे तुम्हाला विम्यापासून वंचित राहावे लागू शकते.

जीओचा प्लॅन महागला

भारती एअरटेल, व्होडाफोन आयडिया पाठोपाठ जीओने देखील आपल्या प्रीपेड प्लॅनमध्ये वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यामुळे आता जीओचे सर्वच प्लॅन जवळपास 20 ते 25 टक्क्यांनी महागणार असून, नवीन दर आजपासून लागू झाले आहेत. याचा मोठा फटका हा जीओच्या ग्राहकांना बसणार आहे.

एसबीआयचा क्रेडिट कार्ड इएमआय होणार महाग 

तुम्ही जर एसबीआयचे क्रेडिट कार्ड वापरत असाल तरी ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. एक डिसेंबर म्हणजेच आजपासून एसबीआयच्या क्रेडिट कार्डने इएमआयवर खरेदी करणे महाग झाले आहे. यापूर्वी एसबीआयचे क्रेडिट कार्ड वापरल्यावर फक्त व्याज भरावे लागत होते पण आजपासून प्रोसेसिग फी देखील भरावी लागणार आहे.

गृह कर्ज ऑफर

सणासुदीच्या काळात बहुतेक बँकांनी गृहकर्जाच्या विविध ऑफर दिल्या होत्या, ज्यात प्रक्रिया शुल्क माफी आणि कमी व्याजदर यांचा समावेश होता. त्यातील अनेक ऑफर आजपासून बंद होत आहे. एलआयसी हाउसिंग फायनान्सची ऑफर देखील आजपासून बंद झाली आहे.

संबंधित बातम्या 

3 ते 5 वर्षांच्या FD मध्ये गुंतवणूक करायची का? खासगी आणि सरकारी बँकांचे नवे दर काय?

सोन्याच्या दागिन्यांशी संबंधित नवा नियम 1 डिसेंबरपासून लागू, पालन न झाल्यास होणार तुरुंगवास

कच्च्या तेलाचे भाव वाढले; पेट्रोल, डिझेल आणखी महागणार?