AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोन्याच्या दागिन्यांशी संबंधित नवा नियम 1 डिसेंबरपासून लागू, पालन न झाल्यास होणार तुरुंगवास

ज्वेलर्सना 30 नोव्हेंबरपर्यंत दिलेली सवलत देण्याची मुदत आज संपणार आहे, म्हणजेच आता हॉलमार्किंगचे नियम काटेकोरपणे पाळणे बंधनकारक आहे, असे न केल्यास ज्वेलर्सवर कडक कारवाई केली जाऊ शकते. देशभरातील 256 जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंग अनिवार्य करण्यात आलेय.

सोन्याच्या दागिन्यांशी संबंधित नवा नियम 1 डिसेंबरपासून लागू, पालन न झाल्यास होणार तुरुंगवास
सोने
| Edited By: | Updated on: Nov 30, 2021 | 3:54 PM
Share

नवी दिल्लीः भारतात सोन्यात गुंतवणूक करणे सर्वात सुरक्षित आणि सर्वोत्तम मानले जाते. प्रत्येक सण आणि लग्नात सोन्याची खरेदी आवर्जून केली जाते. खरं तर लोक प्रत्येक पैन अन् पैची कमाई जोडून सोने खरेदी करतात. पण आजही सोने खरेदी करताना त्याच्या शुद्धतेबाबत अनेक चिंता आहेत. सोने शुद्ध आहे, त्यात काही भेसळ तर नाही ना, कारण अशी अनेक प्रकरणे समोर येतायत, ज्यात ज्वेलर्स भेसळयुक्त सोने देतात आणि पैसे कमावतात.

हॉलमार्क सरकारकडून अनिवार्य करण्याचा निर्णय

गेल्या काही वर्षांत दागिन्यांच्या शुद्धतेसाठी मोठ्या प्रमाणावर वापरला जाणारा शब्द म्हणजे हॉलमार्क हा आहे. जे सरकारने अनिवार्य करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे सर्वसामान्यांना त्याचा लाभ मिळून अशा प्रकारांना आळा बसू शकतो. 1 डिसेंबरपासून म्हणजेच उद्यापासून तुमच्या सोन्याच्या दागिन्यांशी संबंधित असा नियम लागू होणार आहे, ज्याचे पालन न केल्यास तुरुंगवास होऊ शकतो.

उद्यापासून हॉलमार्किंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करा

ज्वेलर्सना 30 नोव्हेंबरपर्यंत दिलेली सवलत देण्याची मुदत आज संपणार आहे, म्हणजेच आता हॉलमार्किंगचे नियम काटेकोरपणे पाळणे बंधनकारक आहे, असे न केल्यास ज्वेलर्सवर कडक कारवाई केली जाऊ शकते. देशभरातील 256 जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंग अनिवार्य करण्यात आलेय. या अंतर्गत ज्या ज्वेलर्सची उलाढाल 40 लाखांपेक्षा जास्त आहे किंवा त्यांनी नोंदणी केलीय, त्यांच्या दुकानातील प्रत्येक दागिन्यावर हॉलमार्क असणे आवश्यक आहे. याशिवाय विकल्या जाणाऱ्या सर्व दागिन्यांवर हॉलमार्किंगही बंधनकारक आहे.

ज्वेलर्ससाठी मार्गदर्शक तत्त्वे

त्याचबरोबर ज्वेलर्ससाठी काही मार्गदर्शक तत्त्वेही तयार करण्यात आलीत, ज्यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे त्यांच्या दुकानाबाहेर एक डिस्प्ले बोर्डही लावला जावा, ज्यामध्ये या दुकानात हॉलमार्क केलेले दागिने उपलब्ध आहेत, असे लिहावे. ग्राहकांना हॉलमार्क दाखवण्यासाठी दुकानातच 10x चा ग्लास आणि हॉलमार्किंग शुल्क लिखित स्वरुपात असलेला चार्ट तयार करणे बंधनकारक आहे. तसेच प्रत्येक दुकानात बीआयएस क्रमांक आणि पत्ता देणे आवश्यक आहे.

हॉलमार्किंगही तपासले जाणार

यासोबतच बीआयएसने नियुक्त केलेले काही एजंटही दुकानात जाऊन हॉलमार्किंग, दागिन्यांमध्ये हॉलमार्किंग योग्य प्रकारे झाले आहे की नाही, याची तपासणी करणार आहेत, त्यासाठी दुकानांमधून नमुने घेतले जातात. उद्यापासून हॉलमार्किंगची अंमलबजावणी न केल्यास कारवाईही केली जाणार आहे. याआधीही याबाबत सातत्याने चौकशी केली जात होती, मात्र आता ती अनिवार्य करण्यात आलीय.

आतापर्यंत केवळ साडेआठशे केंद्रांवरच काम

अहवालानुसार, जेव्हा हॉलमार्किंग अनिवार्य करण्यास सांगितले होते, तेव्हा त्या काळात 780 केंद्रे होती, परंतु आतापर्यंत केवळ साडेआठशे केंद्रांवरच काम झाले. अशा परिस्थितीत प्रत्येक जिल्ह्यात किमान एक केंद्र असेल, तर ते तेथे बंधनकारक करावे, असे सरकारकडून सांगण्यात आलेय. मात्र व्यवसाय कमी असल्याने अनेक केंद्रे बंद पडली आहेत.

हॉलमार्किंग म्हणजे काय?

हॉलमार्क हे सोन्याच्या शुद्धतेचे मोजमाप आहे. या अंतर्गत भारतीय मानक ब्युरो प्रत्येक सोन्याच्या दागिन्यांवर त्याच्या चिन्हासह शुद्धतेची हमी देते. हॉलमार्क अनिवार्य केल्यानंतर देशात केवळ 14, 18 आणि 22 कॅरेट सोन्याचे दागिने विकले जातील, असंही केंद्रानं स्पष्ट केलेय.

संबंधित बातम्या

कच्च्या तेलाचे भाव वाढले; पेट्रोल, डिझेल आणखी महागणार?

आज सादर होणार दुसऱ्या तिमाहीतील जीडीपीची आकडेवारी; ग्रोथ रेट 9 टक्क्यांपर्यंत राहण्याचा अंदाज

निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.