Video: मराठी पोरं ह्या गुजराती पोराचा आदर्श घेतील का? चहा विकता विकता कोट्याधीश झालेल्या तरुणाला ऐकाच !

| Updated on: Feb 11, 2022 | 8:19 AM

ही प्रेरणादायी गोष्ट आहे प्रफुल्ल बिल्लोरे (prafull billore) नावाच्या एका तरुणाची, प्रफुल्ल याने वयाच्या विसाव्या वर्षी एमबीए (mba) करायचे म्हणून घर सोडले. त्यावेळी एक दिवस हाच एमबीए शद्ब आपले नशीब बदलेल, याची किंचित देखील कल्पना प्रफुल्ला नव्हती.

Video: मराठी पोरं ह्या गुजराती पोराचा आदर्श घेतील का? चहा विकता विकता कोट्याधीश झालेल्या तरुणाला ऐकाच !
प्रफुल्ल बिल्लोरे
Follow us on

हमदाबाद : ही प्रेरणादायी गोष्ट आहे प्रफुल्ल बिल्लोरे (Praful Billore) नावाच्या एका तरुणाची, प्रफुल्ल याने वयाच्या विसाव्या वर्षी एमबीए (mba) करायचे म्हणून घर सोडले. त्यावेळी एक दिवस हाच एमबीए शद्ब आपले नशीब बदलेल, याची किंचित देखील कल्पना प्रफुल्ला नव्हती. प्रफुल्ल एमबीएच्या तयारीसाठी इंदूरहुन अहमदाबादला (Ahmedabad) आला होता. आयआयएम सारख्या नामांकित संस्थेमधून एमबीए करण्याचे त्याचे स्वन्प होते. मात्र त्यात यश न आल्याने प्रफुल्लने चहा विकण्याचे ठरवले. चहाच्या व्यवसायामध्ये तो आज इतका यशस्वी झाला आहे की, आज अनेक तरुण त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन नवीन व्यवसाय सुरू करत आहेत. त्याने आपल्या चहाच्या दुकानाला एमबीए असे नाव दिले आहे. तो एमबीएची डीग्री करत होता म्हणूनच त्याने त्याच्या दुकानाला एमबीए असे नाव दिले असावे असा अनेकांचा गैरसमज होतो. मात्र ते तसे नसून, मिस्टर बिल्लोरे अहमदाबाद असा या एमबीए शद्बामागील अर्थ आहे. एमबीए ते एक चहावाला प्रफुल्लच्या या प्रवासाची कहाणी थक्क करणारी आहे.

अहमदाबादमधून सुरुवात

प्रफुल्लचा जन्म धारमधील लबरावदा या एका छोट्याश्या खेडेगावात झाला. प्रफुल्लचे वडील शेती करतात. आयआयएम सारख्या नामंकित संस्थेमधून एमबीए करण्याचे त्याचे स्वन्प होते. मात्र त्यात तो यशस्वी होऊ शकला नाही. त्यानंतर त्यांनी पुणे, मुंबईत सुद्धा शिक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात देखील त्याला यश आले नाही. त्यानंतर त्याने चहाचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. प्रफुल्ल हा यापूर्वी देखील अहमदाबाद शहरात राहिला होता. त्याला अहमदाबाद शहर आवडले होते. तो अहमदाबादमध्येच स्थाईक होण्याचा विचार करत होता. मात्र जगण्यासाठी पैसे लागतात म्हणून मग त्याने मॅकडॉनल्डमध्ये नोकरी सुरू केली, तो मॅकडॉनल्डमध्ये 37 रुपये तासाने 12 तास नोकरी करायचा. या पैशांवर तो कसातरी उदरनिर्वाह करत होता.

एक आयडिया ज्यामुळे प्रफुल्लचे आयुष्य बदलले

नोकरी करत असताना प्रफुल्ला एक दिवस असे वाटले की, आपण आयुष्यभर मॅगडॉनल्डमध्ये नोकरी करू शकत नाही, तसेच यामधून मिळणारे उत्पन्न देखील मर्यादीत आहे. त्यामुळे त्याने चहाचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र चहाचा व्यवसाय जरी सुरू करायचा म्हटले तरी त्याच्यासाठी भांडवल लागणार होते. व्यवसायासाठी भांडल कसे उभारावे असा प्रश्न त्याला पडला होता. मग त्याने आपल्या वडिलांना खोटे कारण सांगून त्यांच्याकडून दहा हजार रुपये घेतले. याच दहा हजार रुपयांमधून त्याने चहाची एक छोटीशी टपरी टाकली.

सुरुवातीच्या काळात अनेक अडचणी आल्या

सुरुवातीच्या काळात प्रफुल्ला अनेक अडचणी आल्या, पहिल्या दिवशी तर त्याचा चहाचा एकही कप विकला गेला नाही. तेव्हा प्रफुल्लने विचार केला की, जर लोक माझ्याकडे येत नसतील तर मीच लोकांकडे जाऊन चहा का विकू नये. प्रफुल्ल सुक्षिशित असल्यामुळे त्याचे इंग्रजीवर चांगले प्रभुत्व होते. हीच युक्ती त्याच्या कामाला आली. सर्वजण त्याचे कौतुक करू लागले. एक चहावाला सुद्धा इतकी चांगली इग्रंजी बोलतो हे पाहून लोकांना आश्चर्य वाटत असे, लोक हळूळू त्याच्याकडून चहा घेऊ लागले. दुसऱ्या दिवशी प्रफुल्लचा सहा कप चहा विकला त्यामधून त्याला 30 रुपये मिळाले. प्रफुल्ल सकाळी नऊ ते सांयकाळी सहापर्यंत जॉब करायचा आणि सायंकाळी सात ते रात्री अकरापर्यंत चहा विकायचा. त्यानंतर हळूहळू त्याच्या चहाची विक्री वाढू लागली. त्याचा चहाचा सेल दिवसाकाठी पाच हजारांपर्यंत वाढला. त्यानंतर त्याने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि आपले सर्व लक्ष त्याने चहाच्या व्यवसायावरच केंद्रीत केले. अवघ्या चार वर्षांमध्ये प्रफुल्लचा व्यवसाय इतका विस्तरला आहे की, एमबीए चहावाला हा एक प्रसिद्ध ब्रॅण्ड बनला आहे. प्रफुल्लची दखल त्यानंतर विविध प्रसादमाध्यमांकडून घेण्यात आली, अशीच त्याची एक मुलाखत Zindagi With Richa या ट्विटर अकांऊटवरून प्रसिद्ध करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

शेअरचॅटचा ‘टकाटक’ टेकओव्हर; MX TakaTak खिश्यात, 600 मिलियन डॉलरला खरेदी

अर्थव्यवस्था जोमात! या वर्षात विकासाचा दर 7.8 टक्के राहणार; सर्वांचे आराखडे धुळीस मिळवत रिझर्व्ह बँकेचा अंदाज

IT Refund | 1.87 कोटी करदात्यांना 1,67,048 कोटी रुपयांचा परतावा, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाची माहिती