AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेअरचॅटचा ‘टकाटक’ टेकओव्हर; MX TakaTak खिश्यात, 600 मिलियन डॉलरला खरेदी

शेअर चॅट व टकाटक मध्ये 600 मिलियन डॉलरचा खरेदी करार झाल्याचे मनीकंट्रोलनं म्हटलं आहे. खरेदी प्रस्तावामुळे एमएक्स टकाटकचे 180 कर्मचारी शेअर चॅटसोबत जोडले जातील.

शेअरचॅटचा ‘टकाटक’ टेकओव्हर; MX TakaTak खिश्यात, 600 मिलियन डॉलरला खरेदी
| Edited By: | Updated on: Feb 11, 2022 | 12:10 AM
Share

नवी दिल्लीः भारतीय सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्म शेअरचॅट अ‍ॅप (ShareChat) आघाडीचा शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्म MX टकाटकला टेकओव्हर करणार आहे. शेअर चॅट व टकाटक मध्ये 600 मिलियन डॉलरचा खरेदी करार झाल्याचे मनीकंट्रोलनं म्हटलं आहे. खरेदी प्रस्तावामुळे एमएक्स टकाटकचे 180 कर्मचारी शेअर चॅटसोबत जोडले जातील. एमएक्स टकाटकची सहा महिने पुन्हा ब्रँडिंग केली जाईल. खरेदी प्रस्तावामुळे शेअरचॅटचा शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्म मोज (MOJ) ला बळकटी मिळणार आहे. मोज (160 मिलियन मंथली अ‍ॅक्टिव्ह यूजर्स) आणि एमएक्स टकाकटक (150 मिलियन मंथली अ‍ॅक्टिव्ह यूजर्स) सह सह 300 मिलियनहून अधिक अ‍ॅक्टिव्ह यूजर बेस तयार होईल. स्पर्धक व्हिडिओ प्लॅटफॉर्म जोश (JOSH) 115 मिलियन हून अधिक मंथली अ‍ॅक्टिव्ह यूजर्स आहेत.

शॉर्ट व्हिडिओ वाढती मागणी

शॉर्ट व्हिडिओकडे कल मोठ्या प्रमाणात वाढीस लागला आहे. शॉर्ट व्हिडिओ इंडस्ट्रीकडे यूजर्सचा मोठ्या प्रमाणात ओढा आहे. इंस्टाग्राम शॉर्ट व्हिडिओमध्ये सध्या आघाडीवर आहे. रेडसीरच्या अहवालानुसार, फेसबुक शॉर्ड व्हिडिओज आणि इंस्टाग्रामचे रील्स टॉप 50 शहरांत आघाडीवर आहेत. डेलीहंटचे जोश, मोज आणि एमएक्स टकाटक टीअर-2 आणि टीअर-3 शहरांत सर्वाधिक यूजर बेस आहे. दरम्यान, यूजर्सला आकर्षित करण्याच्या स्पर्धेमुळे शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्ममध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा दिसून येत आहे. चिंगारीला यूजर्स संख्येत घसरण दिसून येत आहे. प्लॅटफॉर्म मित्रो टीव्हीने कर्मचाऱ्यांची कपात करण्याचं धोरण स्विकारलं आहे.

चीनी बॅन, भारतीय ऑन:

गेल्या काही दिवसांपासून भारतीय बनावटीच्या शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्म्सची लोकप्रियता वाढीस लागली आहे. केंद्र सरकारने वर्ष 2020 मध्ये टिकटॉकवर बंदी आणली होती. त्यावेळी देशांगर्त शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्म ट्रेडिंगला आहे. एमएक्स टकाटकने जुलै 2020 मध्ये लाँच करण्यात आला. जोशने सप्टेंबर 2020 मध्ये बाजारात एंट्री केली.

शॉर्ट व्हिडिओतून ‘मोठी’ कमाई?

सध्या इन्स्टाग्राम (Instagram) नवीन ब्रँडच्या रुपात समोर येत आहे. इंस्टाग्रामवर फॉलोअर्सची संख्या दिवसागणिक वाढत आहे. मोठे सेलिब्रेटी इंस्टाग्राम वर ब्रँड असोसिएशनच्या मार्फत पैशाची कमाई करत आहे. ब्रँड सर्व सेलिब्रेटी किंवा यूजर्ससह कॅशमध्ये डील करतात आणि त्यांचे प्लॅटफॉर्म डीलनुसार कमिशनची कपात करतात. केवळ ब्रँड असोसिएशनच नव्हे तर कंटेट क्रिएटर्स स्वतंत्र अ‍ॅप निर्मिती करुन टॅलेंटचे प्रदर्शन करून पैसे कमवू शकतात.

संबंधित बातम्या

अर्थव्यवस्था जोमात! या वर्षात विकासाचा दर 7.8 टक्के राहणार; सर्वांचे आराखडे धुळीस मिळवत रिझर्व्ह बँकेचा अंदाज

IT Refund | 1.87 कोटी करदात्यांना 1,67,048 कोटी रुपयांचा परतावा, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाची माहिती

मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार? मोबाईल कंपन्या ग्राहकांना पुन्हा दर वाढीचा शॉक देण्याच्या तयारीत!

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.