AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिवाळीनिमित्त सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करताय? मग ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा!

केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार दागिने खरेदी करताना ग्राहकांना फक्त तीन गोष्टी द्याव्या लागतात. प्रथम दागिन्यांची किंमत वजनानुसार, दुसरे मेकिंग चार्जेस आणि तिसरे- जीएसटी (3 टक्के) भरावे लागते. तुम्ही दागिन्यांसाठी ऑनलाइन पेमेंट करा किंवा ऑफलाइन, तुम्हाला त्यावर फक्त 3% GST भरावा लागेल.

दिवाळीनिमित्त सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करताय? मग 'या' गोष्टी नक्की लक्षात ठेवा!
संग्रहित छायाचित्र.
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Oct 24, 2021 | 8:44 PM
Share

नवी दिल्ली : भारतातील लोक दिवाळी आणि धनत्रयोदशी निमित्त सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी वर्षभर थांबतात. यावेळीही लोक मोठ्या प्रमाणावर सोन्याचे दागिने खरेदी करण्याची तयारी करीत आहेत. विशेषत: महिला सण-उत्सवात दागिने खरेदी करतात, त्याकडे त्या गुंतवणूक आणि लक्ष्मीचे आगमन म्हणून पाहतात. जर तुम्ही या सणात दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवा. ज्याच्या मदतीने तुम्ही योग्य किमतीत शुद्ध दागिने खरेदी करू शकाल आणि ज्वेलर्स तुमची दिशाभूल करू शकणार नाहीत. ऑनलाईन दागिने खरेदी केल्यास अशा समस्या कमी होतात. पण जर तुम्ही दागिन्यांच्या दुकानात जाऊन खरेदी करत असाल तर नक्कीच काळजी घ्या. (Thinking of buying gold jewelery for Diwali, Then remember these things exactly)

ज्वेलर्स दिशाभूल करू शकणार नाहीत

वास्तविक, जेव्हा तुम्ही ज्वेलर्सकडून सोने खरेदी करता, तेव्हा बिलामध्ये कोणते शुल्क जोडले गेले ते पहा. अनेकदा ज्वेलर्स ग्राहकांची दिशाभूल करण्यासाठी बिलामध्ये विविध शुल्क जोडतात आणि माहितीच्या अभावामुळे ग्राहक काहीही बोलू शकत नाही.

केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार दागिने खरेदी करताना ग्राहकांना फक्त तीन गोष्टी द्याव्या लागतात. प्रथम दागिन्यांची किंमत वजनानुसार, दुसरे मेकिंग चार्जेस आणि तिसरे- जीएसटी (3 टक्के) भरावे लागते. तुम्ही दागिन्यांसाठी ऑनलाइन पेमेंट करा किंवा ऑफलाइन, तुम्हाला त्यावर फक्त 3% GST भरावा लागेल.

याशिवाय, जर ज्वेलर्स कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारत असतील तर तुम्ही प्रश्न उपस्थित करू शकता. कारण काही ज्वेलर्स पॉलिश वजन किंवा मजूर शुल्काच्या नावाखाली काही रुपये वेगळे घेतात, जे नियमाविरुद्ध आहे. आपण ते देई नका आणि ज्वेलर्सविरूद्ध तक्रार देखील करू शकता.

तुम्ही योग्य दरात दागिने खरेदी करू शकता

तुम्हाला माहित असले पाहिजे की 24 कॅरेट सोन्याचे दागिने बनत नाहीत. बाजारात उपलब्ध असलेले बहुतेक दागिने 22 कॅरेट आणि 18 कॅरेटचे आहेत. त्यामुळे खरेदी करताना त्या दिवशी सराफा बाजारात सोन्याचा भाव काय असेल हे निश्चितपणे लक्षात ठेवा. ज्याच्या मदतीने तुम्ही योग्य दरात दागिने खरेदी करू शकाल.

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे दागिन्यांच्या मेकिंग शुल्काबाबत बोलणी जरुर करा. बहुतेक ज्वेलर्स वाटाघाटीनंतर मेकिंग चार्जेस कमी करतात. कारण दागिन्यांवर 30 टक्के मेकिंग चार्ज घेतला जातो. मेकिंग चार्जेसचा सर्वाधिक फायदा ज्वेलर्सना होतो.

नेहमी ओरिजनल बिल घ्या. जेणेकरून भविष्यात तुम्ही ते दागिने कोठेही विकायला जाल तेव्हा त्याची शुद्धता आणि वजन याबाबत कोणतीही अडचण येणार नाही. जोपर्यंत शुद्धतेचा संबंध आहे, फक्त आणि फक्त हॉलमार्क असलेले दागिने खरेदी करा. हॉलमार्कमध्ये पाच अंक असतात. प्रत्येक कॅरेटचे वेगळे हॉलमार्क आहे. उदाहरणार्थ, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिले असते. यामुळे त्याच्या शुद्धतेबद्दल शंका नाही. (Thinking of buying gold jewelery for Diwali, Then remember these things exactly)

पेट्रोल-डिझेलचा मूळ दर 40-50 रुपये प्रतिलीटर, तरीही इंधन इतके महाग का, जाणून घ्या सरकारची कमाई

EPFO कडून 6 कोटी खातेधारकांना सावधानतेचा इशारा; भूलथापांना बळी पडू नका, अन्यथा…

Follow Us
आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया स
MPSC | आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया सुळे MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आक्रमक
15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! सदावर्तेंचं ठाकरेंना आव्हान
Gunratna Sadavarte | 15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! गुणरत्न सदावर्तेंचं उद्धव-राज ठाकरेंना थेट आव्हान; नाहीतर...
सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nitin Gadkari On Matdar | सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चा
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?