AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pan Card Fraud : पॅन कार्ड संभाळा, नाहीतर बसेल लाखोंचा चुना, अशी होतेय फसवेगिरी

Pan Card Fraud : सायबर भामटे तुम्हाला लुटण्यासाठी अनेक प्रकारचे जाळे विणतात. आधारकार्ड, पॅनकार्डच्या माध्यमातूनही ते फसवणूक करत आहे. त्यांना सावज करुन त्यांच्या खात्यातील रक्कम साफ करत आहेत.

Pan Card Fraud : पॅन कार्ड संभाळा, नाहीतर बसेल लाखोंचा चुना, अशी होतेय फसवेगिरी
| Updated on: Mar 24, 2023 | 5:38 PM
Share

नवी दिल्ली : सायबर भामटे तुम्हाला लुटण्यासाठी अनेक प्रकारचे जाळे विणतात. आधारकार्ड, पॅनकार्डच्या (Pan Card) माध्यमातूनही ते फसवणूक करत आहे. त्यांना सावज करुन त्यांच्या खात्यातील रक्कम साफ करत आहेत. गेल्या काही महिन्यात, अनेक असे प्रकार उघड झाले आहेत की, कर्ज (Loan) इतरांच्या नावे घेऊन गंडा घालण्यात आला आहे. विशेष म्हणजे या सर्व प्रकारात ज्याच्या नावावर कर्ज उचलण्यात आले, त्याला यासंबंधीची पुसटशी कल्पना पण नव्हती. त्याच्या गावी ही नसताना त्याच्या नावावर परस्पर कर्ज उचलण्यात आले. पण हप्ता न फेडल्यानंतर आलेल्या नोटीसमुळे ग्राहकाच्या पायाखालची जमीन सरकली. त्याला झटका बसला. चौकशी अंती हे कर्जप्रकरण उघड झाले. कोरोना महामारीनंतर असे प्रकार वाढले आहेत. याप्रकरणात सायबर गुन्हेगार (Cyber Fraud) कोणत्या व्यक्तीची वैयक्तिक माहिती चोरुन असे प्रकार करतात.

कशी होते फसवणूक

परस्पर कर्ज घेऊन फसवणूक केल्या जाते. त्यासाठी व्यक्तीचे पॅन कार्ड, मोबाईल क्रमांक, व्याज पुरवठा करणाऱ्या ॲपचा वापर करण्यात येतो. तात्काळ कर्ज देणाऱ्या ॲपमुळे कमी कर्जासाठी कुठलाही पडताळा करण्यात येत नाही. त्यामुळे सायबर भामटे तुमच्या नावावर अनेक छोट्या प्रकारचे कर्ज घेऊन फरार होतात.

कर्जाबद्दल कसे कळणार

तुमच्या नावावर किती प्रकारचे कर्ज आहेत, याची माहिती तुम्हाला सहज तुमच्या CIBILस्कोरच्या माध्यमातून कळेल. सिबिल स्कोअर तुम्ही सहजरित्या पॅनकार्डच्या माध्यमातून चेक करु शकता. यामुळे हे पण सहज लक्षात येते की, तुमच्या नावावर इतर कोणी कर्ज उचलले आहे का? असे कोणते थकीत कर्ज आहे, त्याची माहिती मिळते, जे तुम्ही घेतलेच नाही.

फ्रॉड झाल्यावर काय कराल

CIBIL स्कोअर तपासल्यानंतर अनेक प्रकारचे फसवणुकीचे प्रकार समोर येतात. अशावेळी सर्वात अगोदर तुम्ही संबंधित बँकेला कळवायला हवे. तसेच पोलिसांच्या सायबर खात्याशी त्वरीत संपर्क साधायला हवा. त्याठिकाणी तुम्ही तक्रार करणे आवश्यक आहे. तसेच ही माहिती तुम्ही आयकर विभागाला पण देऊ शकता.

काय घ्याल काळजी

जर तुम्ही अशा फसवणुकीच्या कर्जप्रकरणापासून वाचू इच्छित असाल तर सजग राहणे आवश्यक आहे. याविषयीची विशेष काळजी घ्यावी. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला तुमचे पॅनकार्ड, आधार कार्ड याची झेरॉक्स, सत्यप्रत देऊ नका, त्यांना इतर सविस्तर माहिती बिलकूल देऊ नका. कोणत्याही कामासाठी कागदपत्रे देताना त्याचा उपयोग आणि त्यावर तारीख जरुर टाका.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.