AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Today gold-silver rate : सोन्यात गुंतवणुकीची सुवर्णसंधी; सोन्या-चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या आजचे भाव

आज पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. जाणून घेऊयात आपल्या शहरातील सोन्या-चांदीचे आजचे भाव

Today gold-silver rate : सोन्यात गुंतवणुकीची सुवर्णसंधी; सोन्या-चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या आजचे भाव
आजचे सोन्याचे दर Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Jun 01, 2022 | 3:14 PM
Share

नवी दिल्ली : आज पुन्हा एकदा सोने-चांदीच्या दरात (gold, silver price) घसरण पहायला मिळत आहे. गुड रिटर्न्स वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार आज 22 कॅरट सोन्याचा (gold) दर प्रति तोळा 47,500 रुपये इतका आहेत. मंगळवारी 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,750 रुपये इतकेा होता. याचाच अर्थ आज सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे 250 रुपयांची घसरण झाली आहे. तर आज 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 51,820 रुपये असून, मंगळवारी 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 52,100 इतका होता. आज 24 कॅरट सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे 280 रुपयांची घसरण झाली आहे. आज चांदीच्या दरात (silver price) देखील घसरण पहायला मिळत आहे. आज चांदी किलोमागे एक हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे. मंगळवारी चादींचे भाव प्रति किलो 61,600 रुपये इतके होते. तर आज चांदीचे दर 60,600 रुपये इतके झाले आहेत. सोन्याचे दर दिवसातून दोनदा जाहीर केले जातात. त्यामुळे सोन्याच्या दरात तफावत पहायला मिळते.

राज्याच्या प्रमुख शहरातील दर

आज सोने आणि चांदी दोन्हीच्या दरात घसरण पहायला मिळत आहे. राजधानी मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,500 रुपये एवढा आहे. तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 51,820 रुपये एवढा आहे. पुण्यात 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,550 रुपये असून, 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 51,870 रुपये एवढा आहे. उपराजधानी नागपूरमध्ये 22 आणि 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा अनुक्रमे 47,550 आणि 51,870 रुपये एवढा आहे. नाशिकमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,550 रुपये तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 51,870 रुपये एवढा आहे. औरंगाबादमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,520 रुपये असून 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 51,8 40 एवढा आहे.

प्रमुख महानगरातील सोन्याचे दर

  1. आज राजधानी दिल्लीमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,500 रुपये आहे. तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 51,820 रुपये एवढा आहे.
  2. मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,500 रुपये इतका असून, 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 51,820 रुपये एवढा आहे.
  3. चेन्नईमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,400 रुपये असून, 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 51,710 रुपये एवढा आहे.
  4. कोलकातामध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,500 रुपये तर 24 कॅरट सोन्याचा भाव 51,820 रुपये एवढा आहे.
  5. अहमदाबादमध्ये 22 कॅरट सोन्याचा रेट प्रति तोळा 47,560 रुपये असून, 24 कॅरट सोन्याचा भाव 51,880 रुपये एवढा आहे.
  6. तर आज चांदीचा दर प्रति किलो 60,600 रुपये एवढा आहे.

Follow Us
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद