प्रत्येक मोबाइलधारकांना मिळणार ही सुविधा… टेलिकॉम कंपन्यांनी सुरु केले ट्रायल, तुमच्याशी संबंधित काय आहे प्रकार

Caller Name Presentation: कॉल करताना जे नाव हे येईल, ते सिमकार्ड घेताना भरलेल्या अर्जावरील नावानुसार असणार आहे. ट्रूकॉलर सारखे अ‍ॅप आयडी क्रिएट करताना दिलेल्या नावानुसार ही सेवा देते.

प्रत्येक मोबाइलधारकांना मिळणार ही सुविधा... टेलिकॉम कंपन्यांनी सुरु केले ट्रायल, तुमच्याशी संबंधित काय आहे प्रकार
phone call
Follow us
| Updated on: Jun 16, 2024 | 12:00 PM

Caller Name Presentation: सायबर क्राइमच्या घटना दिवसंदिवस वाढत आहेत. यामुळे मोबाइल यूजर्ससाठी नवनवीन रणनीती सरकारकडून आणली जात आहे. तसेच वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. आता सरकारने फेक स्पॅम कॉल ओळखण्यासाठी नवीन सर्व्हीस सुरु केली आहे. त्याची चाचणी देशातील दोन शहरांमध्ये सुरु झाली आहे. मुंबईत अन् हरियाणामधील चंदीगडमध्ये ही सेवा सुरु झाली आहे. त्यामुळे या शहरांमध्ये कॉल करणाऱ्याचा नंबरसोबत त्याचे नाव मोबाईलवर सेव्ह नसताना दिसू लागले आहे. येत्या 15 जुलैपर्यंत ही सेवा देशभरात सुरु करण्याचे आदेश टेलिकॉम कंपन्यांना सरकारने दिले आहे. यामुळे कोणता कॉल घ्यावा अन् कोणता घेऊ नये, याचा निर्णय मोबाईलधारकाला घेता येणार आहे. तसेच ट्र कॉलरसारखे अ‍ॅपची गरज पडणार नाही. मोदी 3.0 सरकारच्या 100 दिवसांचा अजेंडामधील हा विषय आहे.

सध्या मर्यादीत क्रमांकावर सुरु केली ट्रायल

सेंट्रल गर्व्हनमेंट आणि टेलिकॉम रेग्यूलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) म्हणजेच ट्रायने कॉलसोबत नाव दिसेल अशी सेवा सुरु करण्याचे आदेश दिले होते. कॉलर नेम प्रेजेंटेशन (CNAP) अशी ही सेवा आहे. चाचणीतून या सेवेचा निकाल कसा असणार? याचा अहवाल दूरसंचार विभागाला देण्यात येणार आहे. त्यानंतर ही सेवा सर्वांना देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे.

फार्म भरताना दिलेले नाव दिसणार

कॉल करताना जे नाव हे येईल, ते सिमकार्ड घेताना भरलेल्या अर्जावरील नावानुसार असणार आहे. ट्रूकॉलर सारखे अ‍ॅप आयडी क्रिएट करताना दिलेल्या नावानुसार ही सेवा देते. सरकारने ट्रूकॉलर सारखी सेवा सुरू देण्याची योजना आखली होती. रेग्युलेटरने रिलायन्स जिओ, व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेल सारख्या कंपन्यांना वर्षभरापूर्वी ही सेवा देण्याची म्हटले होते. आता त्याला अंतिम स्वरुप मिळाले आहे.

हे सुद्धा वाचा

आंतरराष्ट्रीय कॉलसंदर्भात निर्देश

काही दिवसांपूर्वी, केंद्र सरकार आणि दूरसंचार विभागाने दूरसंचार ऑपरेटरला बनावट आंतरराष्ट्रीय कॉल ब्लॉक करण्याचे निर्देश दिले होते. हे कॉल आल्यावर भारतीय नंबरवरून आल्याचे दिसत होते. दूरसंचार विभागाकडे अनेक दिवसांपासून यासंबंधी तक्रारी येत होत्या. या कॉल्सद्वारे सायबर गुन्हे आणि आर्थिक फसवणूक होत होती.

काय आहे स्पॅम कॉल्स

स्पॅम कॉल्स म्हणजे अनोळखी क्रमांकावरून आलेले कॉल किंवा मेसेज आहे. यामध्ये कर्ज, क्रेडिट कार्ड, लॉटरी जिंकणे किंवा इतर कारणे देऊन फोन येतात. हे सर्व कॉल्स किंवा मेसेज युजरची परवानगी नसतानाही येतात.

Non Stop LIVE Update
'आरक्षणावरच चर्चा की दंगली..', पवार-शिंदेंच्या भेटीवरून जरांगेंची टीका
'आरक्षणावरच चर्चा की दंगली..', पवार-शिंदेंच्या भेटीवरून जरांगेंची टीका.
आम्ही राजीनामा देतो, तुम्ही राजकारणात या,भाजप नेत्याच जरांगेंना आव्हान
आम्ही राजीनामा देतो, तुम्ही राजकारणात या,भाजप नेत्याच जरांगेंना आव्हान.
तुपकरांची पक्षातून हकालपट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मोठी कारवाई
तुपकरांची पक्षातून हकालपट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मोठी कारवाई.
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दिलासा, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दिलासा, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय.
डोंबिवलीजवळ एक्स्प्रेसच्या रांगा; मध्य रेल्वे विस्कळीत, नेमक काय झालं?
डोंबिवलीजवळ एक्स्प्रेसच्या रांगा; मध्य रेल्वे विस्कळीत, नेमक काय झालं?.
'ठाकरे महाराष्ट्राचे नवे मोहम्मद जिन्ना, ते मुस्लिमांच्या प्रेमात अन्'
'ठाकरे महाराष्ट्राचे नवे मोहम्मद जिन्ना, ते मुस्लिमांच्या प्रेमात अन्'.
मुंडेंनी घरी बोलवून मला धमकावलं आणि..., शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
मुंडेंनी घरी बोलवून मला धमकावलं आणि..., शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप.
'लाडकी बहीण'वरून आदिती विरोधकांना प्रत्युत्तर, ही योजना विधानसभेची...
'लाडकी बहीण'वरून आदिती विरोधकांना प्रत्युत्तर, ही योजना विधानसभेची....
चंद्रपुरात अजूनही पूरस्थिती कायम, पात्र सोडून नदीचं पाणी थेट शेतात अन्
चंद्रपुरात अजूनही पूरस्थिती कायम, पात्र सोडून नदीचं पाणी थेट शेतात अन्.
रायगडात पुढील काही तासांत धुव्वाधार, 'या' नद्या इशारा पातळी ओलांडणार?
रायगडात पुढील काही तासांत धुव्वाधार, 'या' नद्या इशारा पातळी ओलांडणार?.