AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नव वर्ष ठरलं मोठ्या दुःखाचं कारण… एक चूक आणि तरुणाने गमावले प्राण… मित्रांसोबत असताना नक्की झालं तरी काय?

मित्रांसोबत गेलेल्या तरुणासोबत असं काय घडलं, ज्यामुळे त्याने गमावले स्वतःचे प्राण... तरुणाची एक चूक आणि सर्वकाही संपलं... नव वर्षांच्या पहिल्याच रात्री असं घडल तरी काय? ज्यामुळे पसरली शोककळा...

नव वर्ष ठरलं मोठ्या दुःखाचं कारण... एक चूक आणि तरुणाने गमावले प्राण... मित्रांसोबत असताना नक्की झालं तरी काय?
| Updated on: Jan 02, 2026 | 11:48 AM
Share

31 डिसेंबर 2025 च्या रात्री संपूर्ण जग नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होतं… सगळीकडे आनंदाचं वातवारण होतं… सर्वांनी नवीन वर्षाचं स्वागत देखील मोठ्या आनंदात केलं. पण एका तरुणासाठी नवीन वर्षाचा पहिला दिवस आयुष्यातील शेवटचा दिवस ठरला. तरुणाच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर तरुणाची एक चूक त्याच्या जीवावर बेतली आहे… त्या रात्री असं काय झालं ज्यामुळे तरुणाचं निधन झालं आसा प्रश्न तुम्हाला देखील नक्कीच पडला असेल. नवीन वर्षाचा आनंद साजरा करण्यासाठी गेलेल्या तीन मित्रांसोबत काय घडलं ते जाणून घ्या…

नवीन वर्षांचं स्वागत करण्यासाठी गेलेल्या तीन मित्रांच्या आयुष्यातील रात्र सर्वात भयानक ठरली. तर त्यापैकी एकाची तर शेवटची ठरली… आंध्र प्रदेशातील डॉ. बी.आर. आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यातील अंतरवेदी समुद्रकिनारी पोहोचलेल्या तीन मित्रांसोबत धक्कादायक घटना घडली आहे. थारमध्ये फिरत असताना डाईव्ह करणाऱ्या एका मित्राचं गाडीवरीन नियंत्रण सुटलं आणि कार पाण्यात बुडाली..

या अपघातात एक मित्राचं निधन झालं असून, दुसरा अद्याप बेपत्ता आहे, तर तिसऱ्याचे प्राण बचावले आहे… निम्मकायला काकीनाडाहून आलेले श्रीधर, साईनाथ आणि गोपीकृष्ण यांनी एका रेस्टोरेंट खोली बूक केली होती आणि तिने आनंदात न्यू ईयर सेलिब्रेट करत होते.. त्यानंतर, ते तिघेही थारमध्ये फिरायला गेले, परंतु अण्णा-चेल्ला गट्टूजवळील तीक्ष्ण वळण त्यांना वेळेत दिसले नाही. तोल गेल्याने गाडी थेट समुद्रात कोसळली.

एका मित्राने गाडीतून मारली उडी

गाडी पाण्यात बुडतीये कळल्यानंतर एक मित्र गोपीकृष्ण यांना कारमधून उडी मारली. तर श्रीधर कारसोबत नदीत वाहून गेला… त्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर बचाव कार्य सुरु झालं. पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे…

संबंधित प्रकरणाची पोलीस सर्वच बाजूंनी तपास करत आहेत. प्राथमिक तपासात असं दिसून आलं आहे की, वेग आणि समुद्रकिनाऱ्याजवळील धोकादायक वळण हे अपघाताचं संभाव्य कारण असू शकते. अधिकाऱ्यांनी पर्यटकांना समुद्रकिनाऱ्यांवर गाडी चालवणं टाळण्याचं आणि सुरक्षिततेच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.

मुंबई महापौर पदावरून राजकीय रणकंदन, वारिस पठाण यांच्या विधानानं वाद
मुंबई महापौर पदावरून राजकीय रणकंदन, वारिस पठाण यांच्या विधानानं वाद.
भाजपच्या ट्रोलिंगनं पूजा मोरेंची माघार अन् रडारड... जुने Video व्हायरल
भाजपच्या ट्रोलिंगनं पूजा मोरेंची माघार अन् रडारड... जुने Video व्हायरल.
अजित पवारांकडून गुंडाना उमेदवारी, खरातांचं नाव पुढं करून दादांची पळवाट
अजित पवारांकडून गुंडाना उमेदवारी, खरातांचं नाव पुढं करून दादांची पळवाट.
उद्धव ठाकरे शिवतीर्थवर, ठाकरे बंधूंचा वचननामा फायनल? कधी होणार जाहीर?
उद्धव ठाकरे शिवतीर्थवर, ठाकरे बंधूंचा वचननामा फायनल? कधी होणार जाहीर?.
मनसेसोबत मोठा गेम? दोन उमेदवार अचानक गायब, नेमकी खेळी काय?
मनसेसोबत मोठा गेम? दोन उमेदवार अचानक गायब, नेमकी खेळी काय?.
शिवसेना उमेदवारानं खरंच प्रतिस्पर्धीचा AB फॉर्म खाल्ला?
शिवसेना उमेदवारानं खरंच प्रतिस्पर्धीचा AB फॉर्म खाल्ला?.
पुण्यात भाजप उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर पूजा मोरे ढसाढसा रडल्या अन
पुण्यात भाजप उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर पूजा मोरे ढसाढसा रडल्या अन.
एका उमेदवारानं दुसऱ्या उमेदवाराचा AB फॉर्म खाल्ला, पुण्यात एकच चर्चा
एका उमेदवारानं दुसऱ्या उमेदवाराचा AB फॉर्म खाल्ला, पुण्यात एकच चर्चा.
जेजुरी येथे भंडारा उधळत नववर्षाचे स्वागत, भाविकांकडून खंडोबाचे दर्शन
जेजुरी येथे भंडारा उधळत नववर्षाचे स्वागत, भाविकांकडून खंडोबाचे दर्शन.
मनसेचे 53 उमेदवार थेट राज ठाकरेंच्या भेटीला, पडद्यामागे घडतंय काय?
मनसेचे 53 उमेदवार थेट राज ठाकरेंच्या भेटीला, पडद्यामागे घडतंय काय?.