AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय कर्मचाऱ्यांबाबत अमेझॉन कंपनीने घेतला मोठा निर्णय, H-1B व्हिसाचा थेट फटका, कर्मचाऱ्यांना आता…

गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेकडून सातत्याने H-1B व्हिसाच्या नियमात बदल केले जात आहेत. ज्याचा फटका मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना बसताना दिसत आहे. त्यामध्येच अॅमेझॉनने या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे.

भारतीय कर्मचाऱ्यांबाबत अमेझॉन कंपनीने घेतला मोठा निर्णय, H-1B व्हिसाचा थेट फटका, कर्मचाऱ्यांना आता...
Amazon Indian employees H-1B visa
| Updated on: Jan 02, 2026 | 11:47 AM
Share

H-1B व्हिसाच्या नियमात अमेरिकेकडून अनेक बदल करण्यात आली आहेत. यामुळे काही मुलाखती पुढे ढकलण्यात आला असून टेक कंपन्यांचे सर्व नियोजन ढासळले आहे. नियोजित मुलाखतींच्या तारखा पुढे ढकलल्या आहेत. आता H-1B व्हिसावर अमेरिकेत जाणे कठीण होतंय. यासोबतच कंपन्यांनी अडचणीत सापडल्या आहेत. 88 लाख रूपये शुल्क एका H-1B व्हिसासाठी भरावे लागणार आहे. शिवाय व्हिसाच्या नियमात मोठे बदल करण्यात आले. भारतातील लोक सर्वात जास्त H-1B व्हिसावर जाऊन अमेरिकेत नोकऱ्या करतात. मात्र, या बदललेल्या नियमानंतर मोठा फटका बसल्याचे दिसतंय. काही कंपन्या या बदललेल्या नियमानंतर कोर्टात जाण्याची तयारी करत होत्या. अनेक कर्मचाऱ्यांनी आपल्या H-1B व्हिसाधारक कर्मचाऱ्यांना काही दिवस अमेरिकेच्या बाहेर न जाण्याचे आदेश दिले असून H-1B व्हिसाच्या बदलत्या नियमामुळे जगातील टॉप कंपन्यांपैकी एक असलेली अमेझॉनही अडचणीत आलीये.

अमेझॉन कंपनीने मोठा निर्णय घेत आपल्या भारतीय कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश दिले आहेत. H-1B व्हिसा मिळवण्याकरिता सोशल मीडियावर अकाऊंट देखील नवीन नियमानुसार तपासली जाणार आहेत. यामुळे व्हिसा मिळवण्यास विलंब लागत आहेत. भारतातून अमेरिकेत H-1B व्हिसावर जाण्यासाठी विलंब होत आहे. यामुळे अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी नियमात काही बदल करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला.

17 डिसेंबरच्या एका मेमोनुसार, जे कर्मचारी भारतात व्हिसाची वाट पाहत आहेत ते 2 मार्च 2026 पर्यंत वर्क फ्रॉम होम करू शकतात. मात्र, त्यांच्यावर यादरम्यान काही निर्बंध असणार आहेत. भारतातून वर्क फ्रॉम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे कोडिंगचे काम करण्याची अजिबात परवानगी नाही. टेस्टिंग किंवा डॉक्युमेंटेशन सुद्धा त्यांना करता येणार नाही.

कुठले निर्णय घेऊ शकत नाही किंवा कंपनीशी संबंध ग्राहकाशी संपर्क साधण्याचीही त्यांना मनाई आहे. फक्त हेच नाही तर भारतातील अमेझॉन कार्यालयात जाण्याची त्यांना मनाई आहे. फक्त अमेझॉनच नाही तर गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि अॅपलसारख्या कंपन्या देखील सध्या अडचणीत सापडल्या आहेत. त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सध्याच अमेरिका न सोडण्याचे आदेश जारी केले.

मुंबई महापौर पदावरून राजकीय रणकंदन, वारिस पठाण यांच्या विधानानं वाद
मुंबई महापौर पदावरून राजकीय रणकंदन, वारिस पठाण यांच्या विधानानं वाद.
भाजपच्या ट्रोलिंगनं पूजा मोरेंची माघार अन् रडारड... जुने Video व्हायरल
भाजपच्या ट्रोलिंगनं पूजा मोरेंची माघार अन् रडारड... जुने Video व्हायरल.
अजित पवारांकडून गुंडाना उमेदवारी, खरातांचं नाव पुढं करून दादांची पळवाट
अजित पवारांकडून गुंडाना उमेदवारी, खरातांचं नाव पुढं करून दादांची पळवाट.
उद्धव ठाकरे शिवतीर्थवर, ठाकरे बंधूंचा वचननामा फायनल? कधी होणार जाहीर?
उद्धव ठाकरे शिवतीर्थवर, ठाकरे बंधूंचा वचननामा फायनल? कधी होणार जाहीर?.
मनसेसोबत मोठा गेम? दोन उमेदवार अचानक गायब, नेमकी खेळी काय?
मनसेसोबत मोठा गेम? दोन उमेदवार अचानक गायब, नेमकी खेळी काय?.
शिवसेना उमेदवारानं खरंच प्रतिस्पर्धीचा AB फॉर्म खाल्ला?
शिवसेना उमेदवारानं खरंच प्रतिस्पर्धीचा AB फॉर्म खाल्ला?.
पुण्यात भाजप उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर पूजा मोरे ढसाढसा रडल्या अन
पुण्यात भाजप उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर पूजा मोरे ढसाढसा रडल्या अन.
एका उमेदवारानं दुसऱ्या उमेदवाराचा AB फॉर्म खाल्ला, पुण्यात एकच चर्चा
एका उमेदवारानं दुसऱ्या उमेदवाराचा AB फॉर्म खाल्ला, पुण्यात एकच चर्चा.
जेजुरी येथे भंडारा उधळत नववर्षाचे स्वागत, भाविकांकडून खंडोबाचे दर्शन
जेजुरी येथे भंडारा उधळत नववर्षाचे स्वागत, भाविकांकडून खंडोबाचे दर्शन.
मनसेचे 53 उमेदवार थेट राज ठाकरेंच्या भेटीला, पडद्यामागे घडतंय काय?
मनसेचे 53 उमेदवार थेट राज ठाकरेंच्या भेटीला, पडद्यामागे घडतंय काय?.