AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बळजबरीने लग्न लावलं, पत्नीवर कधीच प्रेम केलं नाही..; मोठ्या अभिनेत्याचा खुलासा

माझ्या इच्छेविरोधात आईवडिलांनी माझं लग्न लावून दिलं आणि मी माझ्या पत्नीवर कधीच प्रेम करू शकलो नाही, अशी खंत या प्रसिद्ध अभिनेत्याने बोलून दाखवली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो त्याच्या खासगी आयुष्याबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला.

बळजबरीने लग्न लावलं, पत्नीवर कधीच प्रेम केलं नाही..; मोठ्या अभिनेत्याचा खुलासा
भोजपुरी अभिनेता निरहुआ आणि त्याची पत्नीImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 24, 2026 | 9:38 AM
Share

भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता आणि गायक निरहुआ उर्फ दिनेश लाल यादव त्याच्या खासगी आयुष्यामुळे सध्या चर्चेत आला आहे. नुकत्याच एका पॉडकास्ट मुलाखतीत तो त्याच्या लग्नाबद्दल, पती आणि मुलांबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला. या मुलाखतीत निरहुआने त्याच्या लग्नाबद्दल केलेल्या खुलासामुळे चाहत्यांमध्ये विविध चर्चांना उधाण आलं आहे. माझं लग्न बळजबरीने माझ्या इच्छेविरोधात करण्यात आलं होतं, असा खुलासा त्याने केला आहे. निरहुआला या लग्नातून दोन मुलं आणि एक मुलगी आहेत. त्यापैकी एक चेन्नईमध्ये दिग्दर्शनाचं प्रशिक्षण घेत आहे, तर दुसरा मुलगा विस्लिन वुड्समध्ये अभिनयाचं प्रशिक्षण घेत आहे.

‘डिजिटल कमेंट्री’ या पॉडकास्ट मुलाखतीत निरहुआ म्हणाला, “मी माझ्या दोन्ही मुलांना सांगितलं आहे की तुम्ही लग्न तुमच्या मर्जीनेच करा. मी त्यांना म्हणालो, माझ्या आईवडिलांनी माझं ऐकलं नाही. त्यांनी माझं लग्न बळजबरीने लावून दिलं होतं. मी त्यांना विनंती करत राहिलो की, जरा थांबा. मला थोडं काम करू द्या, करिअर घडवू द्या. त्यामुळे ती खंत मला आजवर आहे. तुमचा जोडीदार असा हवा, ज्यावर तुम्ही प्रेम करत असाल. मी माझ्या मुलांना सांगितलं की, माझ्यासोबत ते होऊ शकलं नाही. मी माझ्या आयुष्यात प्रेम नाही केलं. मुलांशी खोटं बोलून तुम्ही काय करणार? मी त्यांच्या आईलाही सांगितलं की, मला तुझ्यावर प्रेम होऊ शकलं नाही. कधीच होऊ शकलं नाही.”

View this post on Instagram

A post shared by Aarohi_ (@shilpiraghwani)

“आई वडिलांनी लग्न लावून दिलं, त्यामुळे मी ती जबाबदारी निभावली आणि अजूनही निभावतोय. मला पश्चात्ताप होतो आणि त्यामुळेच मी माझ्या मुलांसोबत तसं करणार नाही. तुम्ही माझ्या इच्छेनुसारच हे करा, ते करा.. अशी बळजबरी मी त्यांना कधीच करणार नाही”, अशा शब्दांत तो पुढे व्यक्त झाला. निरहुआचे वडील कुमार यादव आणि आई चंद्रज्योती यादव आहे. त्याला एक भाऊ आणि एक बहीणसुद्धा आहे. 2000 मध्ये त्याने मनसा यादवशी लग्न केलं. या दोघांना आदित्य आणि अमित ही दोन मुलं आहेत. त्याचसोबत त्याला एक मुलगीसुद्धा आहे. भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीत निरहुआचं नाव अनेकदा प्रसिद्ध अभिनेत्री आम्रपाली दुबेशी जोडलं गेलं.

Follow Us
रिश्ते मायने रखते है म्हणत सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा
रिश्ते मायने रखते है म्हणत सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा.
करुणा मुंडेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार नाहीच, म्हणाल्या, जनतेने..
करुणा मुंडेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार नाहीच, म्हणाल्या, जनतेने...
रुपाली चाकणकरांच्या बहिणीला पोलिसांची नोटीस, नेमकं कारण काय?
रुपाली चाकणकरांच्या बहिणीला पोलिसांची नोटीस, नेमकं कारण काय?.
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार.
ऑपरेशन टायगर होणार की नाही? एकनाथ शिंदे यांनी जे सांगितलं ते...
ऑपरेशन टायगर होणार की नाही? एकनाथ शिंदे यांनी जे सांगितलं ते....
नाशिक आयटी कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न उघड
नाशिक आयटी कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न उघड.
हा राजकीय-सामाजिक अपराध; मुंबई निधी वाटपावरून राजकारण तापलं
हा राजकीय-सामाजिक अपराध; मुंबई निधी वाटपावरून राजकारण तापलं.
ठाकरे गटात फूट पडणार? ऑपरेशन टायगरवर राऊतांचा जोरदार पलटवार
ठाकरे गटात फूट पडणार? ऑपरेशन टायगरवर राऊतांचा जोरदार पलटवार.
महाराष्ट्रात ही पद्धत कधीच नव्हती, विजय वडेट्टीवार संतापले
महाराष्ट्रात ही पद्धत कधीच नव्हती, विजय वडेट्टीवार संतापले.
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; तरी बारामतीत मतदान होणार?
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; तरी बारामतीत मतदान होणार?.