AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jai Jai Swami Samarth: लहान मुलं स्वामी आजोबा म्हणत जवळ येतात… अक्षय मुदवाडकर यांनी अनुभवलेला भावनिक क्षण

Jai Jai Swami Samarth: प्रेक्षकांच्या जीवनात प्रेरणा, दिशा आणि श्रद्धास्थान अलेल्या 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेत स्वामींची भूमिका साकारणारे अक्षय मुदवाडकर यांनी अनुभवलेला भावनिक क्षण

Jai Jai Swami Samarth: लहान मुलं स्वामी आजोबा म्हणत जवळ येतात... अक्षय मुदवाडकर यांनी अनुभवलेला भावनिक क्षण
अभिनेते अक्षय मुदवाडकर
| Updated on: Feb 24, 2026 | 9:37 AM
Share

Jai Jai Swami Samarth: ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिका फक्त एका मालिका नाही तर भावना आहे. मालिकेचा प्रत्येक एपिसोड काही तरी उत्तम सांगणारा असतो… भक्तीरसात बुडालेल्या या मालिकेला प्रचंड लोकप्रियता मिळाली. काही दिवसांपूर्वी मालिकेचे 1 हजार 700 हून अधिक एपिसोड पूर्ण झाले. सोशल मीडियावर देखील स्वामींचे अनेक एपिसोड प्रदर्शित होत असतात. पण आता स्वामींची भूमिका साकारणारे अभिनेते अक्षय मुदवाडकर यांची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे. या मुलाखतीत त्यांनी स्वामींची भूमिका साकारण्याची संधी कशी मिळाली…. भूमिका साकारताना आलेला अनुभव आणि लहान मुलांकडून मिळालेली नवीन ओळख म्हणजे स्वामी आजोबा… यावर त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

अक्षय मुदवाडकर म्हणाले, ‘पूर्वीता अक्षय आणि आजत अक्षय यामध्ये फार मोठा फरक आहे. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी मी नोकरी करायचो… पण मला नाटकाची प्रचंड आवड होती. त्यामुळे मी नोकरी करून नाटक करायचो… सुरुवातीला मी काही मालिका केल्या. पण एक दिवस संध्याकाळी मला फोन आला आणि समोरुन मला विचारण्यात आलं, आम्ही स्वामींची मालिका करत आहोत, तुम्ही स्वामींची भूमिका करणार का? तेव्हा मी क्षणाचाही विलंब न करता होकार दिला… ज्यांना लहानपणापासून पाहत आलोय, त्यांची भूमिका करणं माझ्यासाठी मोठा अनुभव होता..’

सांगायचं झालं तर, मालिकेत स्वामींची भूमिका साकारल्यानंतर आजही अक्षय मुदवाडकर यांच्या लोकं पाया पडतात. ‘रोज मी अनेक लोकांना भेटतो आणि रोज वेगवेगळे अनुभव मला येत असतात… मालिकेचा 50 टक्के प्रेक्षक वर्ग 5 – 10 वयोगटातील मुलं आहेत. एवढंच नाही तर, मी दिसलो की, लहान मुलं स्वामी आजोबा… स्वामी आजोबा म्हणत माझ्या जवळ येतात… लोकं मला भेटतात तेव्हा माझ्या पाया पडतात…’, असं देखील अक्षय मुदवाडकर म्हणाले.

‘जय जय स्वामी समर्थ’ ही मालिका केवळ मनोरंजनापुरती मर्यादित राहिली नाही, तर अनेक प्रेक्षकांच्या जीवनात प्रेरणा, दिशा आणि श्रद्धास्थान बनली आहे. लहान मुलांपासून वृद्ध व्यक्तींपर्यंत प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांना मालिका आवडते

Follow Us
रिश्ते मायने रखते है म्हणत सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा
रिश्ते मायने रखते है म्हणत सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा.
करुणा मुंडेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार नाहीच, म्हणाल्या, जनतेने..
करुणा मुंडेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार नाहीच, म्हणाल्या, जनतेने...
रुपाली चाकणकरांच्या बहिणीला पोलिसांची नोटीस, नेमकं कारण काय?
रुपाली चाकणकरांच्या बहिणीला पोलिसांची नोटीस, नेमकं कारण काय?.
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार.
ऑपरेशन टायगर होणार की नाही? एकनाथ शिंदे यांनी जे सांगितलं ते...
ऑपरेशन टायगर होणार की नाही? एकनाथ शिंदे यांनी जे सांगितलं ते....
नाशिक आयटी कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न उघड
नाशिक आयटी कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न उघड.
हा राजकीय-सामाजिक अपराध; मुंबई निधी वाटपावरून राजकारण तापलं
हा राजकीय-सामाजिक अपराध; मुंबई निधी वाटपावरून राजकारण तापलं.
ठाकरे गटात फूट पडणार? ऑपरेशन टायगरवर राऊतांचा जोरदार पलटवार
ठाकरे गटात फूट पडणार? ऑपरेशन टायगरवर राऊतांचा जोरदार पलटवार.
महाराष्ट्रात ही पद्धत कधीच नव्हती, विजय वडेट्टीवार संतापले
महाराष्ट्रात ही पद्धत कधीच नव्हती, विजय वडेट्टीवार संतापले.
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; तरी बारामतीत मतदान होणार?
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; तरी बारामतीत मतदान होणार?.