AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! नदीत बोट उलटली, 10 जणांचा मृत्यू, 5 अजूनही बेपत्ता

मोठी बातमी समोर येत आहे, 30 भाविक असलेली बोट नदीत पलटी झाल्यामुळे मोठा अपघात घडला आहे. या अपघातामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला असून, अजूनही 5 जण बेपत्ता आहेत.

मोठी बातमी! नदीत बोट उलटली, 10 जणांचा मृत्यू, 5 अजूनही बेपत्ता
Uttar Pradesh Boat AccidentImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 10, 2026 | 7:03 PM
Share

उत्तर प्रदेशमधील मथुरा येथे शुक्रवारी मोठी दुर्घटना घडली आहे. 30 भाविक असलेली बोट यमुना नदीत उलटली. या दुर्घटनेत दहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर अजूनही 5 जण बेपत्ता आहे. तर 15 भाविकांचा जीव वाचवण्यात यश आलं आहे. हे सर्व भाविक लुधियानामधून मथुरेला आले होते, अशी माहिती समोर येत आहे. दरम्यान बोट पलटी झाल्यानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला, आरडा -ओरड सुरू झाली. भाविकांचा आवाज ऐकून स्थानिकांनी नदीकडे धाव घेतली, पोलीस दल देखील तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं. मात्र तरी देखील या अपघातामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे मृतदेह हाती लागले आहेत. तर अजूनही 5 जण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. 15 जणांचा जीव वाचवण्यात यश आल्याची माहिती समोर येत आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी पंजाब राज्यातील लुधियाना येथील 30 भाविक मथुरा येथे आले होते. नौकाविहाराचा आनंद घेण्यासाठी 30 भाविक एका नावेमध्ये बसले, मात्र ही नाव यमुना नदीमध्ये उलटल्याची घटना घडली आहे. इतर दिवसाच्या तुलनेमध्ये आज हवेचा वेग जास्त होता. हवेचा वेग अधिक असल्यामुळे नावेचं संतुलन बिघडलं आणि ही नाव तिथे असलेल्या एका पुलाला धडकली, अपघातानंतर नाव नदीत पलटी झाली. नाव नदीत पलटी होताच बचावासाठी या नावेमध्ये जे लोक होते, त्यांनी आरडा-ओरड सुरू केली.

त्यांचा आवाज ऐकून स्थानिकांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच पोलीस देखील दाखल झाले. यातील 15 जणांचा जीव वाचवण्यात यश आलं आहे, तर 10 जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही 5 जण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबद्दल माहिती घेतली आहे. या अपघाताबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केलं असून, या घटनेतील जखमी लोकांना तातडीने रुग्णालयात दाखल करून उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा