AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026: मला माफ करा…! आरसीबीच्या खेळाडूचा अखेर माफीनामा, खटलाही घेणार मागे

आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. नुवान तुषाराला आयपीएल खेळण्यासाठी श्रीलंकने क्रिकेट बोर्डाने एनओसी दिली नाही. त्यानंतर त्याने खटला दाखल केला होता. मात्र आता त्याने क्रिकेट बोर्डाची माफी मागितली आहे.

IPL 2026: मला माफ करा...! आरसीबीच्या खेळाडूचा अखेर माफीनामा, खटलाही घेणार मागे
IPL 2026: मला माफ करा...! आरसीबीच्या खेळाडूचा अखेर माफीनामा, खटलाही घेणार मागेImage Credit source: PTI
| Updated on: Apr 10, 2026 | 7:09 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धा आता पुढे सरकत असून जे खेळाडू आले त्यांच्यासोबत फ्रेंचायझी खेळत आहे. काही खेळाडू अजूनही फ्रेंचायझीसोबत जोडले गेलेले नाहीत. त्यामुळे प्लेइंग 11 निवडताना फ्रेंचायझींची दमछाक होत आहे. आरसीबीने गोलंदाजी बाजू भक्कम करण्यासाठी श्रीलंकेच्या नुवान तुषाराला संघात घेतलं आहे. पण स्पर्धा सुरू झाल्यानंतरही त्याला येता आलं नाही. कारण श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने त्याला एनओसी दिली नाही. त्यामुळे नुवान तुषाराचा संपात झाला होता. अन्याय झाल्याची भावना त्या्चया मनात रूजू झाली होती. श्रीलंकन क्रिकेट बोर्डाचा नियम त्याच्या वाटेत अडसर ठरला. फिटनेस टेस्ट पास झाल्याशिवाय कोणताही खेळाडू विदेशी लीग्स खेळणार नाही अशी अट ठेवली आहे. त्यामुळे नुवान तुषारा अडचणीत आला. त्याने या विरोधात कोर्टाचं दार ठोठावलं आणि 23 एप्रिलला या प्रकरणाची सुनावणी होणार होती. पण त्या आधीच त्याने खटला मागे घेण्याची तयारी केली आहे.

नुवान तुषाराने श्रीलंकन क्रिकेट बोर्डाची माफी मागितली. सूत्रांच्या माहितीनुसार, तुषाराने श्रीलंकन क्रिकेट बोर्डाला मेल करत स्पष्ट केलं की, त्याचा हेतू बोर्डाला त्रास देण्याचा नव्हता. 31 वर्षीय नुवान तुषाराला रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू संघाने करारबद्ध केले आहे. पण एनओसी न मिळाल्याने नुवानने कोलंबो जिल्हा न्यायालयात खटला दाखल केला आहे. बोर्डाला ना हरकत प्रमाणपत्र जारी करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी केली होती.आता नुवान तुषाराच्या माफिनाम्यानंतर त्याला एनओसी मिळणार की नाही हे सांगणं कठीण आहे. सध्या श्रीलंकेकडून पाथुम निसंका आणि दासुन शनाका हे खेळाडू आयपीएल स्पर्धेत खेळथ आहेत. त्यांनी फिटनेस टेस्ट पास केली आहे. तर पथिराना आणि तुषाराला अजून फिटनेस क्लियरन्स सर्टिफिकेट मिळालेलं नाही. तर फिरकीपटू वानिंदु हसारंगा आयपीएल स्पर्धेतून आऊट झालेला आहे.

लखनौ सुपर जायंट्सने 2 कोटींच्या मूळ किंमतीत वानिंदु हसारंगाला खरेदी केलं होतं. पण आता फिटनेसमध्ये फेल झाल्याने आयपीएलमधून आऊट झाला आहे. त्याची जागा दक्षिण अफ्रिकेचा फिरकीपटू जॉर्ज लिंडे यांनी घेतली आहे. लिंडेने 250 टी20 सामन्यात 218 विकेट घेतल्या आहेत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...