AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्ली विमान अपघाताबद्दल धक्कादायक माहिती पुढे, एका कुटुंबातील 4 व्यक्ती, 65 टक्के जळालेल्या…

झारखंडहून दिल्लीला निघालेल्या विमानाचा भीषण अपघात झाला. या विमान अपघाताने मोठी खळबळ उडाली. प्राथमिक तपास सुरू असून खराब हवामानामुळे अपघात झाल्याचे कळतंय. यादरम्यान आता मोठा खुलासा झाला आहे.

दिल्ली विमान अपघाताबद्दल धक्कादायक माहिती पुढे, एका कुटुंबातील 4 व्यक्ती, 65 टक्के जळालेल्या...
Delhi plane crash
| Updated on: Feb 24, 2026 | 9:29 AM
Share

झारखंडच्या रांची येथील विमानतळावरून उड्डाण केलेल्या विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातात कोणीही वाचू शकले नाही. विमानाचा संपर्क तुटताच तपास यंत्रणा विमानाचा शोध घेत होत्या. खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. ज्या भागात हे विमान कोसळले, त्याठिकाणी वातावरण अचानक बदलले आणि हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. या खासगी चार्टर्ड रुग्णवाहिका विमानाने सायंकाळी 7 .11 दरम्यान उड्डाण भरली. मात्र, विमानाची काही वेळातच संपर्क तुटला. रांचीहून दिल्लीकडे हे विमान निघाले होते. विमानातील 7 ही जणांचा या अपघाता मृत्यू झाला. विमानाचा शेवटचा संपर्क 7 वाजून 34 मिनिटाला झाला, त्यानंतर विमानासोबत कोणताही संपर्क होऊ शकला नाही. वाराणसी हवाई हद्दीत विमान काही वेळ होते पण त्याचा संपर्क होऊ शकला नाही. झारखंडमधील चतरा आणि सिमरियाच्या सीमावर्ती भागात विमान कोसळल्याचे आढळून आले.

या विमान अपघाताबद्दल मोठी माहिती पुढे येत आहे. ज्या विमानाचा अपघात झाला ते एक खासगी चार्टर्ड रुग्णवाहिका विमान होते. या विमानात एकाच कुटुंबातील चार व्यक्ती होते. रांची येथून ते उपचारासाठी दिल्ली येथे जात होते. मिळालेली अधिकची माहिती अशी की, कॅप्टन विवेक भगत, कॅप्टन सवराजदीप सिंह यांच्यासोबत रूग्ण संजय कुमार, यांच्यासोबत धुरू कुमार आणि अर्चना देवी होते.

यासोबतच डॉक्टर सचिन मिश्रा आणि विकास गुप्ता विमानात होते. याबाबत माहिती देताना देवकमल रूग्णालयाचे डॉक्टर सिन्हा यांनी म्हटले की, रूग्ण संजय कुमार यांच्या पुढील उपचारासाठी त्यांना दिल्ली येथे घेऊन गेले जात होते. संजय कुमार खूप जास्त जळाले होते. 65 टक्के ते जळाले असल्याने मागील 7 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. ते मुळ बिहार येथे रहिवासी होते.

दिल्लीला त्यांना घेऊ जाण्याकरिता खासगी चार्टर्ड रुग्णवाहिका विमान होती. 16 जानेवारी 2026 रोजी एका आगीच्या घटनेत ते जळाले होते. त्यांच्यावर आमच्याकडे उपचार सुरू होते, त्यानंतर त्यांना दिल्ली येथील रूग्णालयात उपचारासाठी सल्ला दिला. आता एकाच कुटुंबातील 4 जण या विमान अपघातात गेल्याची माहिती आहे.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा