AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ही मंदी म्हणजे काय रे भाऊ? ती येते कशी तेही पाहु? मंदीचा फेरा येतो तरी कसा, चला तर समजून घेऊ

जागतिक अर्थव्यवस्थांना कोरोनानंतर घरघर लागलेली आहे. काही देशांना कोरोनाच्या पार सहाव्या लाटांचा मारा सहन करावा लागला. त्यातून काही अर्थव्यवस्था बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना रशिया-युक्रेन युद्धाने पुन्हा जागतिक अर्थव्यवस्थांना वेठीस धरले आहे. त्यामुळे जगाला मंदी पुन्हा ग्रासते की काय अशी अवस्था आहे तर समजून घेऊयात ही मंदीबाई येते तरी कोठून?

ही मंदी म्हणजे काय रे भाऊ? ती येते कशी तेही पाहु? मंदीचा फेरा येतो तरी कसा, चला तर समजून घेऊ
मंदीचा फेरा म्हणजी काय रे भाऊ?Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Jun 18, 2022 | 12:06 PM
Share

तर पोट्टे हो, उगा आपलं भयताडावानी वागू नका. विषय जरा गंभीर हाय. मंदीबाईनं (Recession) त्या सुपरपॉवर अमेरिकेच्या आताच नाकात दम आणला हाय. अजून तर तीनं पुरते हातपाय पण पसरवले नाय.तरी अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने (Federal Reserve) व्याजदर वाढवून महागाई (Inflation) थोपवण्याचा आणि मंदीचा फेर चुकवण्याचा आटोकाट प्रयत्न चालवला हाय. अमेरिकने राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (American President Joe Biden) यांनी मंदीला चकवा देण्यासाठी कंबर कसली हाय. भारताच्या सुदैवाने यापूर्वीच्या मंदीने फारसा दणका आपल्याला बसला नाही. पण जागतिक परिमाण बदलली हाय आणि परिस्थिती पण जरा नाजूक हाय.पण ही मंदी मंदी म्हणजे हाय तरी काय भानगड आणि तिचा धसका का बरं इतका घेतला आसंन बा समद्यांनी. आपण पण समजून घेऊ ही मंदी आणि काय झालं म्हणजे मंदी येते याविषयी. मंदीचा फेरा चुकवण्यासाठी काय प्राथमिक उपाय योजना केल्या जातात. त्यापण बघुयात.

ही मंदी म्हणजे काय रे भाऊ?

तर समद्यात आधी ही मंदी म्हणजे काय रे भाऊ? या प्रश्नाचं उत्तर शोधुयात. तर काय असतं सलग दोन तिमाहीत कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था विकास करत नसंल आणि तिच्यात वाढ होत नसंल तर समजून घ्या दया कुछ तो गडबड है. अशातच अनेक संध्या असूनही अर्थव्यवस्था आकूंचन पावत असेल, ती विस्तारत नसेल तर हे मंदी येण्यापूर्वीचे इशारे मानण्यात येतात. आता कोविडच्या काळात जग दोन वर्षांकरीता पार ठप्प पडलं होतं. पण त्यावेळी मंदीचा फेरा आला नव्हता. कारण त्यानं उत्पादनावर आणि रोजच्या अर्थकारणावर परिणाम केला होता. ही व्यवस्था सुरळीत व्हायला जेवढा कालावधी लागला तेवढ्या काळात एक छुपी आणि थोड्या कालावधीची मंदी येऊन गेली असं म्हणता येईल.

मग ही मंदी ठरवतं तरी कोण?

तर आता कळीचा मुद्दा हा आहे की ही मंदी ठरवतं तरी कोण? सुपरपॉ़वर अमेरिकेचा विचार केला तर त्यांच्याकडे अर्थतज्ज्ञांचं एक पॅनलच यावर काम करतं. अर्थव्यवस्था संशोधनासाठी तिथं एक राष्ट्रीय संस्थाच (National Bureau of Economic Research) कार्यरत आहे. एका वर्षात घेतलेल्या आढाव्यातून अथवा अर्थव्यवस्थेवर परिणाम दिसून आला की ही संस्था इशारा देते.जर अर्थव्यवस्थेत काही महिन्यात असाच नकारात्मक परिणाम दिसून आला तर ना नफा ना तोटा तत्वावर काम करणा-या खासगी संस्थाही सरकारला याविषयीची माहिती देतात. सखोल, व्यापक आणि कालावधी या परिमापकाचा आधार घेत या संस्था अर्थव्यवस्थेतील एकापेक्षा एक कमकुत संकेताआधारे मंदीचा फेरा येत आहे की नाही हे ठरवले जाते.

काय आहे SAHM चा नियम

अर्थतज्ज्ञ क्लाऊडिया साहम (Claudia sahm) यांचा मंदीविषयी एक खास नियम प्रसिद्ध आहे. या नियमाआधारे मंदीचा फेरा कधी येऊ शकतो, याचे काही नियम आणि परिमाण त्यांनी घालून दिले आहे. हे नियम रोजगाराविषयीचे आहेत. त्याआधारे तीन महिन्यांची रोजगार आकडेवारी आणि बेरोजगारी याचा अभ्यास करुन अर्थव्यवस्था कोणत्या दिशेने चालली आहे, याचे उत्तर मिळते. त्याआधारे मंदीचे ढग किती गडद होत आहे, याची माहिती मिळते.

शालो रिशेसन म्हणजे काय

यात आणखी एक मुद्दा समोर येतो की, SHALLOW RECESSION ही एक आणखी संकल्पना आहे. मंदीची झळ बसते. पण त्याचे प्रमाण अल्प असते. ही संकल्पना पण रोजगारआधारीत आहे. एकट्या अमेरिकेचा विचार केला तर कोरोना काळातील दोन महिन्यांत तिथं मंदीचा फेरा आला नी त्यात २२ दशलक्ष तरुणांच्या हातचा रोजगार हिसकावला गेला. तिथं बेरोजगारीचे प्रमाण 14.7 टक्क्यांवर पोहचलं होतं. सध्या ही अमेरिकेत अशीच परिस्थिती असल्याचा दावा अर्थतज्ज्ञांनी केला आहे.

यासोबतच बाजारात कमी कालावधीसाठी कर्ज घेणा-यांची संख्या वाढली तरी हा मंदीचा एक संकेत मानण्यात येतो. यासोबतच शेअर बाजारात विक्रीचे सत्र तेजीत असल्यास आणि बिअर मार्केट संकल्पनेत बाजार 20 टक्क्यांनी घसरल्यासही मंदी येत असल्याचे स्पष्ट होते.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.