बीपीएनएल कार्ड म्हणजे काय? जाणून घ्या त्याचे फायदे तोटे

बीएनपीएल कार्ड ग्राहकांना प्रथम खरेदी करण्याची आणि नंतर पैसे देण्याची परवानगी देतात. या प्रकारच्या कार्डद्वारे तुम्ही उत्पादने खरेदी करू शकता आणि ठराविक कालावधीत हप्त्यांमध्ये पैसे देऊ शकता.

बीपीएनएल कार्ड म्हणजे काय? जाणून घ्या त्याचे फायदे तोटे
Follow us
| Updated on: May 18, 2022 | 5:30 AM

मुंबई : वनिता वीकेंडला शॉपिंगसाठी (Shopping) मॉलमध्ये गेली होती. ती मॉलमध्ये फिरत असताना एका कार्डच्या सेल्स स्टाफने तिला थांबवले आणि विचारले, ‘मॅडम तुम्ही बीएनपीएल (BNPL) कार्ड घ्याल का? वनिताला वाटले की तो क्रेडिट कार्ड (Credit card) विकतोय म्हणून ती म्हणाली, “नाही, माझ्याकडे आधीच क्रेडिट कार्ड आहे. मला ते नकोय.” त्यानंतर कर्मचाऱ्यांनी तिला सांगितले, मॅडम हे क्रेडिट कार्ड नसून बीएनपीएल कार्ड आहे, म्हणजे आता खरेदी करा नंतर पेमेंट करा असे कार्ड आहे. हे ऐकून वनिताला धक्काच बसला. तिने विचारलं हे कसले कार्ड आहे? कर्मचार्‍यांनी बीएनपीएल कार्डबद्दल समजावून सांगितल्यावर वनिताला क्रेडिट कार्ड चांगले आहे की हे बीएनपीएल कार्ड आणि तिने हे कार्ड घ्यावे की नाही असा प्रश्न पडला होता.

BNPL कार्ड काय आहे ?

नावाप्रमाणेच BNPL कार्ड ग्राहकांना प्रथम खरेदी करण्याची आणि नंतर पैसे देण्याची परवानगी देतात. या प्रकारच्या कार्डद्वारे तुम्ही उत्पादने खरेदी करू शकता आणि ठराविक कालावधीत हप्त्यांमध्ये पैसे देऊ शकता. बहुतेक कार्ड ग्राहकांना तीन महिन्यांच्या कालावधीत तीन व्याजमुक्त हप्त्यांमध्ये थकित बिल भरण्याची परवानगी देतात. Amazon आणि Flipkart सारख्या ई-कॉमर्स कंपन्या आधीच देशात BNPL कार्डची सुविधा पुरवत होत्या, आता काही फिनटेक कंपन्यांनी BNPL कार्ड जारी करण्यास सुरुवात केली आहे.

हे BNPL कार्ड कोण देते ?

सध्या Uni, Slice, PayU Finance सारख्या अनेक फिनटेक कंपन्या भारतात BNPL कार्ड ऑफर करत आहेत. BNPL हे डिजिटल पेमेंटचे सर्वात वेगाने वाढणारे माध्यम आहे. विशेषतः तरुणांमध्ये ते अधिक लोकप्रिय होत आहे. एका अहवालानुसार, सध्या देशातील बीएनपीएलची बाजारपेठ 3 ते 3.5 अब्ज डॉलर्सची आहे आणि 2026 पर्यंत ती 45 ते 50 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.

हे सुद्धा वाचा

BNPL कार्ड आणि क्रेडिट कार्ड मधील फरक

BNPL कार्ड आणि क्रेडिट कार्डमधील मुख्य फरक म्हणजे फी आणि रिवॉर्ड्स. बहुतेक BNPL कार्ड ग्राहकांना थकबाकीची बिले तीन समान व्याजमुक्त हप्त्यांमध्ये भरण्याची परवानगी देतात. काही कार्ड ग्राहकांना महिन्याच्या शेवटी किमान रक्कम भरण्याची परवानगी देतात, उर्वरित रक्कम पुढील महिन्यापर्यंत नेली जाते. या रकमेवर तीन ते चार टक्के कॅरी-फॉरवर्ड शुल्क आकारले जाते. याउलट, क्रेडिट कार्ड्स किमान देय रक्कम भरल्यानंतर शिल्लक रकमेवर व्याज आकारतात.

फायदे आणि नुकसान

बीएनपीएलमध्ये, तुम्ही तीन महिन्यांच्या शेवटी पूर्ण रक्कम भरण्यास सक्षम नसल्यास, थकबाकीची रक्कम दीर्घ कालावधीसाठी EMI मध्ये रूपांतरित करू शकता. त्यावर स्वतंत्रपणे व्याज आकारत नाहीत, परंतु डिफॉल्टच्या बाबतीत विलंब शुल्क आकारतात. क्रेडिट कार्ड परदेशात वापरले जाऊ शकते परंतु BNPL मध्ये अशी सुविधा उपलब्ध नाही. याशिवाय, बीएनपीएल कार्ड्स वापरकर्त्यांना 2,000 रुपयांपासून कमी क्रेडिट लाइन ऑफर करतात. याउलट, क्रेडिट कार्डमधील क्रेडिट मर्यादा साधारणपणे 20,000 रुपयांपासून सुरू होते. BNPL कार्ड सहज उपलब्ध आणि वापरण्यास सोपी आहेत. परंतु BNPL कार्ड्सने खरेदी केल्यावर, तुम्हाला कॅश बॅक, क्रेडिट कार्ड सारखे पॉइंट्स मिळत नाहीत. परंतु आरोग्यसेवा गरजा, शाळेची फी भरणे इत्यादी मोठ्या खर्चाचे रूपांतर BNPL कडून तीन व्याजमुक्त पेमेंटमध्ये केल्याने रोख तुटवडा झाल्यास खूप मदत होऊ शकते.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.