AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

5G Network | घरापासून उद्योगापर्यंत तुफान वेग, 5G नेटवर्कने रहा अपडेट

5G Network News | देशात लवकरच 5G नेटवर्कवर सुरु होत आहे. आघाडीच्या सेवा पुरवठादार कंपन्यांनी त्यासाठी तयारी पूर्ण केली आहे. यामाध्यमातून काय बदल घडेल ते पाहुयात.

5G Network | घरापासून उद्योगापर्यंत तुफान वेग, 5G नेटवर्कने रहा अपडेट
5G चं वारंImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Aug 30, 2022 | 6:33 PM
Share

5G Network News | देशात 5G चं वारं येऊ घातलं आहे. 5G स्पेक्ट्रमच्या (Spectrum) लिलावात (Auction) सरकारला अपेक्षेपेक्षा बक्कळ पैसा मिळाला आहे. जिओसह एअरटेल, व्होडाफोन आयडिया, (JIO, Airtel, Vodafone IDEA) गौतम अदानी यांच्या डेटा नेटवर्क (Data Network) या कंपनीने ही त्यात सहभाग घेतला होता. या लिलावातून कंपन्यांना 5G स्पेक्ट्रमचा परवाना मिळाला. आता देशात लवकरच 5G सेवा सुरु होणार आहे. आघाडीच्या सेवा पुरवठादार कंपन्यांनी त्यासाठी तयारी पूर्ण केली आहे. त्यामुळे तुमचा मोबाईल आता सुसाट वेगाने पळणार आहे. एका रिपोर्टनुसार, 5G सेवेसाठी ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहे. 5जी हे टेलिकॉम क्षेत्राचे नवे युग म्हटले जात आहे. आता 5G मुळे घरापासून ते उद्योगापर्यंत सर्वच ठिकाणी कमालीची गती येणार आहे. अमुलाग्र बदल तुमचे जीवन पालटून टाकल्याशिवाय राहणार नाही. यामाध्यमातून काय बदल घडेल ते पाहुयात.

पापणी न लवती तोच डाऊनलोड

सध्याच्या घडीला आपण 4G आणि 3G नेटवर्कवरही फाईल्स, व्हिडिओ, फोटो, पीडीएफ डाऊनलोड करतो. पण 5G नेटवर्कचा डाऊनलोडिंग स्पीड खूप सुसाट आहे. 5G नेटवर्कवर काही मिनिटांत हेवी गेम्स आणि व्हिडिओ डाऊनलोड करू शकाल. एका रिपोर्टनुसार, 5G चा डाऊनलोडिंग स्पीड 4G पेक्षा 100 पट अधिक वेगवान असेल. 4Gचा कमाल वेग 45 एमबीपीएस(Mbps) इतका मानला जातो, तर 5G चा वेग 1000 एमबीपीएस (Mbps)पर्यंत असू शकतो. त्यामुळे पापणी न लावती तोच तुमची फाईल डाऊनलोड झालेली असेल.

ऑनलाइन गेमिंग अगदी लोण्यासारखं

तुम्हाला ऑनलाइन कन्सोल गेमिंगची (online console gaming)आवड असेल तर 5G तुमच्यासाठी वरदान असेल. यामाध्यमातून तुम्हाला लोण्यासारखा मऊ अनुभव येईल. 5G नेटवर्कवर तुम्ही न अडकता हाय ग्राफिक्स व्हिडिओ गेम खेळू शकाल. 5G नेटवर्कवर जर आपण गेममध्ये कमांड दिली तर ते त्वरित कार्य करेल. त्याचबरोबर 5G नेटवर्कवरील गेमिंगचा दर्जाही जबरदस्त असेल.

ऑटोमोबाईल क्षेत्रात क्रांती

टेस्लासारख्या कंपन्या सेल्फ ड्रायव्हिंग कारवर काम करत आहेत. अशा परिस्थितीत या चारचाकीला नेटवर्कची गरज भासणार आहे. त्यामुळे डेटा वेगाने पाठवता येईल आणि प्राप्त ही करता येईल. 5G नेटवर्कवर हे काम सहज साध्य होईल. जसा घरात प्रवेश करताच आपोआप दिवा लागतो, सेन्सरच्या करामतीमुळे उजेड पडतो. तसाच उपयोग ऑटोमॅटिक कार चालवण्यासाठी होणार आहे.

स्मार्ट होम (Smart Home)

स्मार्ट होमची स्वप्नं आता प्रत्यक्षात उतरेल. पण त्यासाठी 5G इंटरनेटची गरज भासेल. सिनेमांमध्ये स्मार्ट होम्समध्ये स्मार्ट लाइट, स्मार्ट गेट्स आदी गोष्टी तुम्ही पाहिल्या असतीलच, ज्या फक्त 5G नेटवर्कवर शक्य आहेत. येत्या काळात 5G नेटवर्कच्या मदतीने लाइटपासून ट्रॅफिकपर्यंतची कामे रिअल टाइममध्ये पूर्ण होतील, अशा स्मार्ट सिटीजही पाहायला मिळतील. स्मार्ट सिटीमध्ये आपल्याकडे अशी सुविधा असेल की जेव्हा रस्त्यावर कोणीच नसेल तेव्हा पथदिव्यांचा प्रकाश आपोआप कमी होईल.

8K व्हिडिओ स्ट्रीमिंगमध्ये (Streaming)

आतापर्यंत फोर जीवर तुम्ही फक्त 4K व्हिडिओ पाहू शकलात. पण 5G नेटवर्कवर तुम्ही 8K रिझॉल्यूशन असलेले व्हिडिओ पाहू शकाल आणि तेही बफरिंगशिवाय आणि न अडकता. खरं तर, 5G नेटवर्कमधील डेटा ट्रान्सफर खूप वेगवान आहे आणि यामुळे, व्हिडिओ वेगाने लोड होईल. सॅमसंगसारख्या कंपन्यांच्या 8K स्मार्ट टीव्ही बाजारात आणले आहेत. त्याची किंमत सुमारे 10 लाख रुपये आहे.

Follow Us
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!