AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

व्हॉट्सअ‍ॅप युजरसाठी महत्वाची बातमी, जुने अ‍ॅप बंद होणार…लवकरच करा असा बदल

whatsapp new update: जुने अ‍ॅप बंद होणार असल्याची माहिती WaBetaInfo मार्फत दिली आहे. त्याचबरोबर आता जुन्या सिस्टीमवर व्हॉट्सअ‍ॅपला सपोर्ट मिळणार नाही. मेटाने पुष्टी केली आहे की व्हॉट्सअ‍ॅप आता मॅकओएस ॲपमध्ये चालणार नाही.

व्हॉट्सअ‍ॅप युजरसाठी महत्वाची बातमी, जुने अ‍ॅप बंद होणार...लवकरच करा असा बदल
whatsapp
| Updated on: Sep 09, 2024 | 10:57 AM
Share

जगभरात इंस्टेट मेसेजसाठी व्हॉट्सअ‍ॅप हे अ‍ॅप वापरले जाते. कोट्यवधी युजर या अ‍ॅपचा वापर करतात. व्हॉट्सअ‍ॅपकडूनही आपल्या युजरसाठी नवनवीन फिचर्स आणि अपडेट दिले जातात. व्हॉट्सअ‍ॅपचे अपडेट मोबाईल युजरसोबत डेस्कटॉप युजरलाही मिळतात. आता कंपनी आपल्या Apple Mac युजर्ससाठी बदल केला आहे. त्याचे जुने अ‍ॅप बंद होणार आहे.

अन्यथा होणार नुकसान

तुम्ही Apple Mac युजर्स असतील तर व्हॉट्सअ‍ॅपचे अपडेट जाणून घेणे महत्वाचे आहे. तुम्ही जर त्याकडे दुर्लक्ष केले तर तुमचा जुना डाटा जाणार आहे. तुमचा पर्सनल डाटाही जाणार आहे. तसेच तुमची प्रायव्हेसी ब्रीच होऊ शकते. कारण व्हॉट्सअ‍ॅप आता इलेक्ट्रॉन बेस्ट असलेले डेस्कटॉप अ‍ॅप आणत आहे.

जुने अ‍ॅप बंद होणार

जुने अ‍ॅप बंद होणार असल्याची माहिती WaBetaInfo मार्फत दिली आहे. त्याचबरोबर आता जुन्या सिस्टीमवर व्हॉट्सअ‍ॅपला सपोर्ट मिळणार नाही. मेटाने पुष्टी केली आहे की व्हॉट्सअ‍ॅप आता मॅकओएस ॲपमध्ये चालणार नाही. नवीन अपडेटमुळे macOS ॲपमध्ये WhatsApp चालणार नाही. WABetaInfo ने X वर त्याचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे, ज्यामध्ये कंपनी म्हटले आहे की, मॅकवरील इलेक्ट्रॉन ॲप 54 दिवसांनंतर काम करणार नाही. मॅक डेस्कटॉपवर व्हॉट्सॲप वापरण्यासाठी नवीन कॅटॅलिस्ट ॲपवर स्विच करावे लागेल. नवीन ॲपवर स्विच करताना, चॅट किंवा कॉन्टॅक्ट लिस्टचा डेटा सेव्ह केला जाईल.

नवीन अ‍ॅप डाउनलोड करा

मेटानुसार macOS युजर्स व्हॉट्सअ‍ॅप वेबसाइटवरुन नवीन अ‍ॅप डाउनलोड करु शकतात. तसेच मॅक अ‍ॅप स्टोरवरसुद्धा नवीन व्हर्जन उपलब्ध आहे. ते डाउनलोड करुन त्याचा वापर करु शकतात. निर्धारित वेळेपूर्वी तुम्हाला हे नवीन व्हॉट्सअ‍ॅप डाऊनलोड करावे लागणार आहे. कॅटॅलिस्ट ॲप युजरला अधिक चांगली कामगिरी आणि सुरक्षा देणार आहे. यामध्ये युजर्सला Mac OS चे फीचर्स मिळणार आहे.

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.