AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नॉर्मल इन्स्टंट कॉफीमध्ये येईल कॅफेसारखी चव, कॉफीची टेस्ट वाढवण्यासाठी ट्राय करा ‘या’ 4 सोप्या ट्रिक्स

तुम्हालाही कॅफेस्टाईल इन्स्टंट कॉफीसारखी चव घरच्या घरी बनवायची असेल तर काही सोपे घरगुती टिप्स आहेत‍ ज्याच्या मदतीने तुम्ही सहज बनवू शकता. चला तर मग आजच्या लेखात जाणून घेऊयात.

नॉर्मल इन्स्टंट कॉफीमध्ये येईल कॅफेसारखी चव, कॉफीची टेस्ट वाढवण्यासाठी ट्राय करा 'या' 4 सोप्या ट्रिक्स
coffeeImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Edited By: | Updated on: May 20, 2026 | 11:18 AM
Share

चहा पिणाऱ्यांप्रमाणे हल्ली कॉफी पिणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे. तर कॉफीप्रेमींना कॉफी कोणत्याही स्वरूपात प्यायला आवडते. सध्या कॉफीमध्येही अनेक चवी आहेत आणि काही प्रकार देखील आहे. अशातच इन्स्टंट कॉफी बनवण्यासाठी खूप कमी वेळ आणि साहित्य लागते. ज्यामुळे कॉफीप्रेमी मोठ्या उत्साहाने या कॉफीचा आस्वाद घेतात. पण तुम्हाला माहित आहे का, की नॉर्मल कॉफी बनवताना जर तुम्ही काही घरगुती पद्धतीने कॉफीची चव बदली तर ती एखाद्या नामांकित कॉफी शॉपइतकीच चवदार लागते. चला तर मग इन्स्टंट कॉफीला आणखी चविष्ट बनवण्यासाठी सोपे टिप्स जाणून घेऊयात.

इन्स्टंट कॉफी अधिक चवदार कशी बनवायची

फ्लेवर्ड सिरप: तुम्ही तुमच्या इन्स्टंट कॉफीमध्ये व्हॅनिला, कॅरॅमल किंवा हेझलनट यांसारखे तुमच्या आवडीचे कोणतेही सिरप मिक्स करू शकता . यामुळे कॉफी केवळ चविष्टच होणार नाही, तर तिला एक अनोखी चवही मिळेल.

मसाले: चहाप्रमाणेच तुम्ही इन्स्टंट कॉफी बनवताना दालचिनी, जायफळ किंवा वेलची यांसारख्या मसाल्यांनी कॉफीला स्वाद देऊ शकता. सुगंधित इन्स्टंट कॉफीसाठी यापैकी कोणताही मसाला फक्त चिमूटभर कॉफी बनवताना टाका.

आवडीनुसार गोडवा: तुमची कॉफी गोड करण्यासाठी तुम्ही नेहमीच्या साखरेऐवजी मध किंवा मेपल सिरपसारखे नैसर्गिक गोड पदार्थ वापरू शकता . यामुळे गोडवा आणि चव दोन्ही वाढतील.

दूध : नेहमीच्या दुधाव्यतिरिक्त किंवा क्रीम व्यतिरिक्त, तुम्ही तुमची कॉफी अधिक दाट, क्रीमी आणि आरोग्यदायी बनवण्यासाठी बदामाचे दूध, नारळाचे दूध किंवा ओट्सच्या दुधासारख्या प्लांट बेस्ड दुधाचा पर्याय देखील निवडू शकता.

यापद्धतीनेही इन्स्टंट कॉफीची चव आणखी चांगली लागेल

पाण्याचे तापमान: कॉफी बनवण्यासाठी उकळत्या पाण्याऐवजी कोमट पाणी वापरा. ​​यामुळे इन्स्टंट कॉफीची चव अधिक चांगली येईल.

कॉफीचा दर्जा : जर तुम्ही नियमितपणे कॉफी पीत असाल, तर चांगल्या दर्जाच्या कॉफीचा वापर करा. उत्तम ब्रँडच्या कॉफीची चव अधिक समृद्ध असते.

थंड कॉफी: उन्हाळ्यात गरम कॉफी पिण्याऐवजी, तुमच्या इन्स्टंट कॉफीमध्ये बर्फ मिक्स करा. मात्र कॉफी विरघळवण्यासाठी तुम्हाला फक्त कोमट पाण्याची गरज लागेल. तयार कॉफीमध्ये फक्त बर्फ आणि तुमच्या आवडीचे दुध मिक्स करून प्या.

मीठामुळे चव वाढते

बहुतेक इन्स्टंट कॉफीची चव कडू असते, त्यामुळे चिमूटभर मीठ टाकल्याने कडूपणा कमी होण्यास मदत होते. तसेच यामुळे आम्लता टाळण्यास आणि संतुलित चव टिकवून ठेवण्यासही मदत होते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
मोठी बातमी! वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा आक्रोश
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण!
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा Video समोर
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिया सुळेंनी पक्षातील Inside Story सांगितलीच
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले...
थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
मोठी बातमी! थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?